घोट्याची सूज

Submitted by Ashwini_९९९ on 7 March, 2019 - 00:57

मुलाचा उजवा घोटा फ्रॅक्चर झाला आहे..७ दिवस झाले..ऑपरेशन करायचं आहे...पण घोट्याची सूज कमीच होत नाहीये..पाय सतत वर उंचावर ठेवलेला असतो तरीही.. सूज उतरल्याशिवाय ऑपरेशन शक्य नाही..
सूज कमी होण्यासाठी काही उपाय असेल तर कृपया सांगा .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉ.ची औषधे चालू असतीलच.त्यांच्याच सल्यानुसार आईस बॅगने शेका.
हा एक उपाय करून पहा.रक्तचंदन,तुरटी,आंबेहळद उगाळून जरासे गरम करून लेप सुजेवर लावा.
नवर्‍याच्या फ्रॅक्चरवेळी केलेला उपाय आहे.नंतर हॉस्पिटलमधे जाऊन सूज होती त्या जागेत साचलेले रक्त काढले होते.

iIe bagne sheku naka ase sangitale ahe dr.ne
Pan ha upay karun pahate devaki. Thank you.

खात्रीचे आणि बिनधोक्याचे उपाय आहेत .. वाटल्यास करून पहा

अडुळशाची पाने गरम करून गरम असतानाच बांधा. काही तासात फरक पडेल

चिंचुके पावडर (गोरख चिंच असेल तर उत्तम) आणि नाचणीचं पीठ रुई व एरंडाच्या पानाच्या रसात कालवून लेप केल्यास १००% सूज उतरेल

जखम असेल तर पहिलाच निर्धोक उपाय करा आणि नसेल तर दुसरा उपाय खात्रीचा आहे

अश्विनी, कुठल्याही मेडीकल मध्ये दु:ख दबाव नावाचा लेप मिळतो तो लावुन बघ कारण त्यात या पावडरी असतातच. तो त्या पॅकवरच्या सुचना वाचुन लाव.

चालेल कि . तसाही अडुळसा जखमेवर पण वाटून लावतात. त्याचा गरम करून वाटल्यावरच चांगला रस निघतो. पण तुम्ही एक करा- उकळत्या पाण्यात काही काळ पानं बुडवून मग ती बांधा. तासाभराने नवीन पानं तशीच गरम करून बांधा. उद्यापर्यंत फरक न वाटल्यास दुसरा उपायतर काम करणारच. माझ्या माहितीतील काही ठाकराची लोकं यासाठी सागरगोटा, रुई आणि एरंडाची पानं गरम पाण्यात वाटून लावतात.

Opration zal mulach 12 tarkhela. vyavsthit zal.Tumhi sangitalelya upayani suj baryapeki utarali hoti.
Saglyana dhanyawad.

vyavsthit zal.>>>>> हे छान झाले.आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद!