नकळत सारे घडले ४

Submitted by शाम भागवत on 6 March, 2019 - 01:39

हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!

दुसरा: सर, आपलं एफ१६ जरी पडलं असलं तरी त्या अगोदर आपल्या वैमानिकाने भारतात जाऊन तिथे मिझाईल डागलं याचा मला अभिमान वाटत होता.
पण त्याचाही नेम चुकला.

फुरफुर: कुठे धरला होता:
दुसरा: धरला नव्हता. धरणार होता.

फुरफुर: (जरा ओरडून) अरे पण कुढे?
दुसरा: भारतीय ब्रिगेडच्या मुख्यालयावर.
फुरफुर: पुढे

दुसरा: ती मिग२१ अपेक्षेपेक्षाही लवकर आली. जणू भुताटकी झाली.
फुरफुरः ?????

दुसराः श्रीनगर विमान तळावरून सुखोई, मिराज व मिग२१ आली.
आता सुखोई प्रथम यायला पाहिजे. नंतर मिराज पोहोचायला पाहिजे शेवटी मिग२१ यायला पाहिजे.
फुरफुर: बरोबर आहे.

दुसरा: त्याप्रमाणे आपण आपली योजना ठरवली होती. सुखोई यायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात मिझाईल सोडून एफ१६ आरामात परत येऊ शकणार होत.
फुरफुर: हो असच ठरलं होत.

दुसरा: पण सुखोईच्या कितीतरी आधी मिग२१ पोहोचलं.
फुरफुर: हे कस शक्य आहे?

दुसरा: हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण तसं झालंय खरं.
मिग२१ लवकर आल्याने एफ१६ला नीट नेम धरायला जेवढा वेळ मिळायला पाहिजे होता, तेवढा मिळाला नाही.
त्यात परत चालत्या विमानातून नेम धरायच्या सरावाची बोंब.
शेवटी घाई घाईत कसतरी डागलं मिझाईल.

फुरफुर: कुढे पडलं मग ते?
दुसरा: मोकळ्या आवारात पडलं. त्यामुळे काहीच नुकसान झालं नाही.

फुरफुर (स्वगत): अर‍रर्र. निदान कंपाउंडवर तरी पडलं पाहिजे होत रे.
छे. साधं कंपाउंड पण नाही पडलं.

तिसराः सर, मला अस वाटायला लागलंय की, गोंधळ वाढतच जायला लागलाय. काहीच मनासारखे होत नाहीये.

फुरफुरः त्या तिसऱ्या पॅराशूटचं काय झाले ते पण काही कळतं नाहीये.
दुसराः सर, दोनच पॅराशूट होती. पण एफ१६ मध्ये दोन वैमानिक असताना एकाच पॅराशूटच्या साहाय्याने दोन वैमानिक कसे बाहेर पडले? असा लोकांना संशय आला असता म्हणून मी दोनाची तीन पॅराशूट केली.

फुरफुर (स्वगत) : अरे हा तर घरभेदाच निघाला.
चक्क माझ्याशीच खोटं बोलायला लागलाय व कारण देतोय देशहिताचं.
म्हणे लोकांना संशय आला असता.
पण तो जे कारण देतोय ते नाकारताही येत नाही आहे म्हणा.

फुरफुरः याचा अर्थ दोनच पॅराशूट असतील व दोनच वैमानिक असतील व त्यातील पहिला आपला असेल, तर दुसरा भारतीय असला पाहिजे.
दुसराः होय सर.

फुरफुर : मग तो प्रथम चालत व नंतर पळत का जायला लागला? आपण त्यावर विनोद करून हसलो, पण आता आपलंच हसू झालंय.
तिसरा : सर, मला जी माहिती मिळाली त्यावरून अस लक्षात येतंय की, तो सुरवातीला चालत होता पण एकीकडे तो खिशातून कागदपत्र काढत होता. एकीकडे फाडत होता. ती कागदपत्रे नष्ट करण्याची त्याची धडपड चालू होती.

पण जेव्हा त्याच्याकडे लोकं धावत यायला लागली तेव्हा तो पळायला लागला.
पण घाबरून नव्हे. ती कागदपत्रे नष्ट करायला आणखी वेळ मिळावा म्हणून. त्यात त्याला यशही आलंय.
जेव्हा रेंजरनी त्याचा ताबा घेतला तेव्हा त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती.

तिसरा (थोडं थांबून पण ठामपणे) : सर, खोट बोला पण रेटून बोला या आपल्या पद्धतीचा आपल्याला सुरवातीला खूप फायदा झाला.
पण आता नुकसान व्हायला लागलंय.
मला तर वाटते खोटे बोलण्यामुळे आपण आपला वैमानिक गमावला. तो ही आपल्याच माणसांकडून.
आपली माणसं आपल्याच वैमानिकाला मारताहेत आणि आपण त्यावर विनोद करून हसतोय.

तर शत्रूच्या वैमानिकाला लोकांनी मारू नये म्हणून आपण धडपड करतोय.
त्यासाठी तो लवकरात लवकर रेंजरांच्या ताब्यात कसा येईल ते पाहतोय.

सर ही गोबेल्स पद्धत आपण बंद करायला पाहिजे.
ही पद्धत आपल्याला विनाशाकडे घेऊन जातीय.

फुरफुर (स्वगत) : हम्म. तिसरा खरं बोलतोय. नुकसान वाढतच चाललंय.
युद्ध सुरू झालं तर हे नुकसान आणखीनच वाढणार आहे.
खरं बोलायला सुरवात केल्याने युद्ध टळताय का हे एकवार पाहायला काय हरकत आहे?

फुरफुर (ट्विटरवर) : आम्ही भारताचे एकही विमान पाडलेले नाही तरी भारताचा एक वैमानिक आमच्या ताब्यात आहे.

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults