ध्रुव बाळं श्रावण बाळं

Submitted by mrunal walimbe on 4 March, 2019 - 21:42

अद्वैत आजं जवळपास दहा वर्षांनी भारतात येतं होता.. आता इतकी वर्ष US ला राहून ही कुठेतरी आपली नाळं भारताशी जोडलेली आहे हे त्याच्या मनात खोलवरं घरं करून होतं.... खरं त्याच्या जोरावरचं तरं तो आज परतं आपली मुळे घट्ट रोवायला परतत होता... नाही म्हणायला हे त्याला तेवढं सोपही नव्हतं आणि सहजासहजी एक शहर बदलून दुसऱ्या शहरात वास्तव्यास जाण्यासारखं ही नव्हतं.. पणं तरीही त्याने हा निर्णय बराचसा कुटुंबातील सर्वच सदस्यांचा विरोध असताना ही घेतला होता... त्याची बायको नमिता तरं त्याने हा निर्णय सांगितल्यापासूनं ते आज flight मधे बसस्तोवर चक्रावून गेली होती... एवढं bright भविष्य US मधे असताना हा कसा काय असा काहीतरी विचार करु शकतो... पहिल्यांदा जेव्हा त्याने हे नमिताला सांगितले तेव्हा तिला वाटले होते हा चेष्टा करतोयं.. पणं नंतर हळूहळू ती समजून चुकली याने हा निर्णय ठाम केला आहे... ती म्हणाली होती त्याला अरे मुलांचे काय? पणं मोठा मुलगा सुधांशु तसंही Singapore university join करणारं होता त्याने तिथल्या online exams देऊन already scholarship मिळवली होती... धाकटी मुलगी सुचित्रा आधीच भरतनाट्यम आणि classical संगीत यातचं करिअर करणारं होती... त्याला भारतात खूपच वाव होता.... या साऱ्या पार्श्वभूमीवर तो तिला म्हणाला तशी मुलं मोठी आहेत स्वतंत्र आहेतं त्यांचे निर्णय तो घेऊ शकतातं.. इथे US ला राहयचे का भारतात त्याचा...मी त्यांना आमच्या आप्पांसारखं माझ्याचं डोक्याने चाला असं कधीच म्हणणारं नाही.... आपली मते मुलांवर लादल्याने काय काय होते याचा मी अनुभव घेतला आहे... तसं मी माझ्या मुलांच्या बाबतीत कधीच नाही वागणारं....
तेव्हापासून नमिता गप्प बसली उगीचच त्याच्या जुन्या जखमेवरची खपली निघायला नको....

अद्वैत आणि अजय दोघी सख्खी भावंडं ... अजय मोठा तर अद्वैत धाकटा... दोघांच्या मधे अवघे दोनचं वर्षाचे अंतर अगदी दोघे पाठीला पाठं लावून या जगात आलेले.... पणं दोघांच्या मधे जमीन अस्मानाचा फरकं... एक प्रचंड हुशार करारी पणं थोडासा आत्मक्रेंदितं... तर दुसरा अभ्यासातं एवढा हुशार नाही पणं व्यवहार चतुर अन् मायाळू... सर्वांना नेहमी आश्चर्य वाटे एका आईच्या पोटी जन्म घेऊन हे एवढे भिन्न कसे... पणं शेवटी हाताची पाचही बोटं कधी सारखी नसतात मगं ही भावंड तरी कशी असतीलं....
यांचे वडील म्हणजे पंचक्रोशीतील एकं चांगलं व्यक्तीमत्व... सर्वजणं त्यांना आप्पा म्हणतं...आप्पांचा घरात खूप दरारा... आई मात्र मायाळू पणं सतत भेदरलेली...
अशाचं साऱ्या वातावरणात अद्वैत लहानाचा मोठा झाला... पणं तो जात्याचं हुशार असल्यामुळे आप्पांच्या म्हणण्याप्रमाणे इंजिनिअर झाला खरं त्याला मँथेमँटिशीयन व्हायचे होते पणं आप्पा म्हणे इंजिनिअर केवढा मान असतो.. त्याला झटकन नोकरी लागते वगैरे वगैरे... झाला बिचारा इंजिनिअर... पणं आता मात्र त्याने आप्पांचे बंधन झुगारले अन् मोठ्या शहरात नोकरी ला लागला... नंतर संधी मिळताच परदेशी गेला... तेव्हा तरं त्याचे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे आप्पांनी सूनबाई ला बोलं लावले तुझीचं फूस म्हणून हा असा वागला.. पुढे फार कधी त्याचा आणि आप्पांचा फारसा संबध आला नाही... कारण आप्पा कधी US ला आलेचं नाहीत ..नाही म्हणायला आप्पांच्या शेवटच्या आजरपणातं तो आणि नमिता आले पणं नंतर नाही चं..
अजय फारसा शिकला नाही त्याची बुध्दी ची झेपचं तेवढी म्हणतं आप्पांनीचं त्याला दुकान थाटून दिले... कायमं त्याची परिस्थिती वाईट, त्याला काही जमणार नाही म्हणतं शेवटपर्यंत त्याच्यासाठी खपतं राहिले... शेवटी तो आप्पांचा श्रावणं बाळं होता ना त्यांच्या होकारातं होकार भरणारा...
अद्वैत ला या गोष्टीचं कायमं वैषम्य वाटतं राहिलं की आप्पांनी कधी आपल्याला कुठल्याचं प्रकारे support केला नाही अन् अजयला मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळत राहिले... यावर एकदा माई (अद्वेतची आई)म्हणाल्याचे त्याला आठवतं राही... अरे जे मूलं थोडं परिस्थिती नी, बुध्दीनी डावं असतं ना आई बापांचा ओढा त्याच्या कडेचं असतं....

आज जेव्हा अद्वैत भारतात परतणारं हे त्याच्या मोठ्या भावाला अजयला कळलं त्याला वाटू लागलं की आता आप्पांच्या बंगल्याची वाटणी होणारं... मगं आपणं कूठे जाणार...
वास्तव फारं वेगळं होतं अद्वैत ला कुठल्याही बंगल्यात इस्टेटीतं रसं नव्हता... त्याच्या मते ज्या आई वडिलांनी जिवंत असताना मला दुजाभावाने वाढवले त्यांची इस्टेट घेऊन मी काय करु.. तसंही त्याला रहायला स्वतःचं घर होतचं ना ते त्याने एवढे दिवसं भाड्याने दिलं होतं... तो मुळात परत आला होता कारणं त्याला मायदेशातीलं त्याच्यासारख्या परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी काही तरी करायचं होतं.. अन् त्याने त्यासाठी चा प्लँन डोक्यात ठरवला होता...
आता हळूहळू अद्वैत आणि नमिता भारतात रुळू लागले होते... अद्वैत ने एक संस्था स्थापन केली की जी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या हुशार मुलांना साह्य करेलं... त्यांचा सर्व खर्च उचलेलं... तसंही अद्वैत ने भारतात भारताबाहेर बरीच वर्षे नोकरी केल्यामुळे त्याला अनुभव दांडगा होता, त्याच्याचं फायदा घेऊन त्याने आता स्वतः चा बिझनेस चालू केला.. अन् हुशार मुलांना रोजगाराची नामी संधी भारतातचं
उपलब्ध करुन दिली...
दरम्यानच्या काळात सुधांशु ही सिंगापूरहून designing ची degree घेऊन आला अन् त्याने स्वतःची आर्किटेक्ट ची फर्म काढली... सुचित्रा अद्वैत ची लाडकी लेक तिने भरनाट्ययम् चे क्ँलासेसं चालू केले...
एक दिवस अचानक अद्वैत ला अजयचा फोन आला , त्याचा स्वर खूप रडवेला वाटला अद्वैतला.. त्याचं झालं असं होतं की अजयचा
मुलगा इंजिनिअर होऊन ही बेकार होता... अद्वैत त्याला म्हणाला अरे त्याला पाठवं माझ्या कंपनीतं त्याला नोकरी मिळेल... थोडे कष्ट करावे लागतील पणं त्याचाचं फायदा होईल, पणं अजूनही अजयच्या डोक्यात जुने बुरसटलेले विचार असल्याने तो म्हणाला अरे पणं मगं सूधांशूचं काय... आता मात्र त्याला अजयची कीव आली सदैव आप्प्यांच्या डोक्याने चालून याच्या बुद्धिला गंज चढलायं बहुधा...जगं बघितलचं नाही तरं काय होणार...अद्वैत त्यालख म्हणाला, "अरे सुधांशुची वेगळी फर्म आहे त्याचा तो स्वतंत्र बिझनेस करतो...
आता मात्र अजय निःशब्द झाला... ज्या अद्वैत ला आप्पा सदैव बोलं लावतं आपणंही कधी फार चांगले वागलो नाही याच्याशी पणं हा मात्र अगदी मावशी म्हणायची तसा ध्रुव बाळं आहे आपलं अढळपद निर्माण केलेला मोठ्या मनाचा....

काही दिवसांनी अजयचा लेक खूप छान अद्वैत काकांचा बिझनेस सांभाळू लागला... अजयच्या मनातील अद्वैत बद्दलची अढी आताशा नाहीशी झाली होती परंतु अद्वैत मात्र आपल्या मतावरं ठाम होता की माई अन् आप्पांनी आपल्याशी दुजाभाव चं केला...
एक मात्र नक्की होतं की आता निदान दोन भावांतील अढी नाहिशी झाली होती... अन् सुचित्राने अद्वैत ला ही आता पटवले होते की जे जुने घडले ते उगाळण्यापेक्षा नवीन छान दृढ नाती तयार करा..
प्रत्येकाला इथून जायचेचं आहे कोणीही अजरामर नाही.. अनः जाताना बरोबर शेजारीलं मातीही नेता येतं नाही मगं कशाला हेवदावे अन् रुसवे फुगवे..तसंही मनुष्याने त्याचे हेवदावे वाउट कर्मे इथेच या पृथ्वीतलावरं सोडावीतं तरचं मुक्ती मिळते...
त्यामुळे आज आता खूप वर्षांनी अद्वैत स्वतःच्या मुलीच्या लग्नातं कुठलही टेशन कुठलाही आकसं कुणाबद्दलचा गैरसमज सारं बाजूला ठेवून आनंदाने वावरतं होता.. अन् मोठ्या झालेल्या आपल्या मुलीकडे कौतुकमिश्रीत नजरेने डोळ्यांच्या कडा पाणावतं बघत होता...

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
तेवढं अनुस्वाराचं बघा फक्त. मराठी वाचतोय की कानडी हेच कळत नाही.

कथा ठीके.
नको तिथं अनुस्वार दिलेत तेवढं सुधारा.

तेवढं अनुस्वाराचं बघा फक्त. मराठी वाचतोय की कानडी हेच कळत नाही.>>>>>>>> Rofl

अद्वैतचं पात्र कळलं नाही. इंजिनीयरिंगचा निर्णय सोडला, तर त्याने सगळं स्वतःला हवं ते केलं. लौकिकार्थानेही भावापेक्षा कितीतरी अधिक यश कमवलं. अधिक बुद्धीही आहे.
मग भाऊ, वडिलांबद्दल अढी का आणि परतण्याचा निर्णय का ते कळलं नाही.
स्वतःची मतं मुलांवर नाही, तरी बायकोवर लादलीच की.

कथा छान, पण नको तिथे नको तेवढे अनुस्वार आहेत, ते काढा, वाचताना खूप खटकतं...

लिहिलय छान .

तो जात्याचं हुशार असल्यामुळे आप्पांच्या म्हणण्याप्रमाणे इंजिनिअर झाला खरं त्याला मँथेमँटिशीयन व्हायचे होते पणं आप्पा म्हणे इंजिनिअर केवढा मान असतो.. त्याला झटकन नोकरी लागते वगैरे वगैरे... झाला बिचारा इंजिनिअर...

>> पण इंजिनिअर करूनही काहीच केल नाही , बिचारा इंजिनिअर . ?

चांगले लिहिले आहे.

नको तिथं अनुस्वार दिलेत तेवढं सुधारा.>>>>> +१.

ध्रुव बाळं श्रावण बाळं>>>> बाळं म्हणजे बाळे.जसं की मी लिहिलं म्हणजे मी लिहिले.