काव्य-गीतांचा खेळ- कवितांचा ऋतु हिरवा

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2019 - 23:11

मराठी काव्य विश्वात ऋतू आणि महिने वेगवेगळ्या भावनांशी घट्ट निगडित झालेले आहेत.
कोणतीही भावना अधोरेखित करायला कवी निसर्गातील प्रतीके वापरतो.

कठीण परिस्थिती सांगताना वैशाखवणवा, ग्रीष्म आठवतो.
विरहिणीची अवस्था सांगताना कवीला रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा आठवतात, तर फर्मास लावणीतला शृंगार माघाची थंडी असेल तर अधिक खुलतो.

आज आपण ऋतू आणि मराठी महिन्यांच्या उल्लेख असणारी गाणी/ कविता घेऊन एक खेळ खेळणार आहोत "कवितेतील ऋतू"

खेळाची पद्धत नेहमीचीच,

पहिला भिडू ऋतू / महिना चा उल्लेख असणाऱ्या ओळी लिहील , हे झाले आपले कोडे
पुढचा भिडू त्या गाण्याचा/ कवितेचा मुखडा लिहील आणि वरच्याप्रमाणे पुढचे कोडे घालेल.

भिडू १ :-
ग्रीष्माची नाजूक टोपली , उदवावा कचभार तिच्यावर
गर्द विजेचा मत्त केवडा , तिरकस माळावा वेणीवर

भिडु २ :-
रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

नवीन कोडे:-
कुहू गाऊनि कोकिळा, करी वसंत स्वागत.
तिलाही मी विनविते , शिकव ना मला गीत.

पण नियमांशिवाय खेळ कसा खेळता येईल!
दोनच नियम पाळायचे.
१.नुसताच पाऊस, ऊन, थंडी असा उल्लेख नको. शिशिर, हेमंत ,वसंत, ग्रीष्म, वर्षा , किंवा उन्हाळा पावसाळा असे स्पष्ट ऋतू चे नाव हवे.
२.मराठी १२ महिन्यांची नावे चालतील.

तर मंडळी , स्मरणशक्तीला ताण द्या आणि ऋतुवैभव मिरवणाऱ्या कविता/ गाणी येऊ द्या.

पहिले कोडे:-
कुहू गाऊनि कोकिळा, करी वसंत स्वागत.
तिलाही मी विनविते , शिकव ना मला गीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचं कोडं >>
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

फार साजूक कविता झाल्या
आता एक लावणी होऊन जाऊ द्या,

मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा हिवाळी रात

पुढचं >> सोप्प >> Wink
ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरते
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

पुढचं कोडं

अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल
हवेत जाती मिसळून दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा

हे कोडं नाहीच Lol
उगाच आठवलं म्हणून

पुढचं कोडं >> हे पण सोप्प
खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें

पुढचं कोडं

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?

Happy

पुढलं कोडं

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या नेणत्या जिवाला हे गुज आकळेना

शोधीत गाव आलो स्वप्नात पाहिलेले
किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले

गूगल बाबा की जय Wink

पुढचं कोडं

क्षणभर श्रावण स्रवला रे

हा अंतरा नाही, ध्रुवपदाची दुसरी ओळ आहे

संपलाय का हा खेळ ?

भरत चे कोडं:

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या नेणत्या जिवाला हे गुज आकळेना
>>
आला वसंत देही मज ठाउकेच नाही...
---------------------
वावे चं कोडं:

घन लवला रे, घन लवला रे
क्षणभर श्रावण स्रवला रे!
जरतारांचा खुलून मांडव
अनल जिवींचा निवला रे!

Pages