EPF बद्दल माहिती

Submitted by रमेश रावल on 21 February, 2019 - 01:17

मी माझी जुनी कंपनी सोडून दोन महिने झाले. मला माझा PF पूर्ण विथड्रॉव करायचा आहे.
जुनी कंपनी म्हणते कि आता online झाले आहे तिकडे पहा.. online वर ऍडव्हान्स withdraw option दाखवत आहे ज्यात मी काही ठराविक रक्कमच काढू शकतो. पण मला संपूर्ण रक्कम काढायची आहे.
जुन्या कंपनी ला EPF ला मी जॉब सोडल्याचे इन्फॉर्म करावे लागते का.. मी संपूर्ण रक्कम कशी काढू शकतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही नविन जॉब सुरु केला आहे, तुम्हाला संपूर्ण रक्कम काढता येणार नाही. संपूर्ण रक्कम फक्त निव्रुत्ती नंतरच काढता येते.

जर तुम्ही नवीन नोकरी स्वीकारली नसेल तरच पूर्ण रक्कम काढू शकता. ( यात परत एक गोची आहे. जर जुन्या कंपनीने PF भरताना त्यातील काही रक्कम पेन्शन स्कीम करता नमूद केली असेल तर तेवढी वगळून उर्वरित काढता येते.)

पण या साठी कंपनीने EPF वर employer login करून तुमच्या नोकरीतून बाहेर पडण्याची तारीख अपडेट केली पाहिजे ( Field name: DOE (Date Of Exit)).

तुम्ही UAN लॉगिन करून ही तारीख जुन्या कंपनीने अपडेट केली आहे की नाही ते बघू शकता. नसल्यास जुन्या कंपनीला विनंती करून अपडेट करवून घ्या, हे काही मिनिटांचेच काम असते त्यांच्या करता.

ती अपडेट झाली की तुम्हाला पूर्ण रक्कम काढण्याचा ऑप्शन येईल, अन्यथा ऍडव्हान्सचाच येईल.

@ मानव पृथ्वीकर, अचूक माहितीकरिता आभार.

आपण दुसरी नोकरी धरली असता EPF त्याच regd. नंबरने नवीन नोकरीत ट्रान्सफर करता येतो ना!!?

नवीन कंपनीत PF अकाउंट नंबर वेगळा मिळेल.
आपण त्यांना आपला UAN नंबर द्यायचा.
मग एकाच UAN मध्ये आपले दोन PF account दिसतील.
जुन्या कंपनीने आपली Date of Exit अपडेट केली की जुन्या PF अकाउंट मधले पूर्ण पैसे नवीन PF अकाउंट मध्ये ट्रान्सफर करता येतात. हे आपण ऑनलाईन करू शकतो, पण ही ट्रान्सफर जुन्या किंवा नव्या कंपनीने अप्रुव करावी लागते.
आपण ऑनलाईन ट्रान्सफर रिक्वेस्ट देताना कुठल्या कंपनीने ट्रान्सफर अप्रुव करावी हे नमूद करू शकतो. मग आपली ऑनलाईन रिक्वेस्ट पूर्ण केली की कंपनीला सांगायचे अप्रुव करायला.

<< हे काही मिनिटांचेच काम असते त्यांच्या करता.>>
पण ती काही मिनिटे ते त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून काढणे त्यांना दोन तीन महिने तरी जमणार नाही. पण बरोबर थोडी लाच दिलीत तर जमेल लवकर.

<पण ती काही मिनिटे ते त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून काढणे त्यांना दोन तीन महिने तरी जमणार नाही. पण बरोबर थोडी लाच दिलीत तर जमेल लवकर.>
अनुभवतोय, तीन वेळा मेल वर देऊन हि अजून रिप्लाय नाही.. यांचा काही फायदा असतो का date update न करण्यामागे

काहीही फायदा नसतो. डेट अपडेट केली की ती DSC च्या माध्यमातून अप्रुव्ह करावी लागते. जर एन्ट्री करणारी व्यक्ती वेगळी आणि अप्रुव्ह करणारी वेगळी असेल तर कसे कोऑर्डीनेशन आहे त्यावर अवलंबून आहे.
तुम्ही तुमच्या इमेल्स आणि रिमाइंडर्सच्या कॉपीज नीट ठेवा म्हणजे वेळ पडलीच तर तुम्हाला तक्रार करण्यास उपयोगी पडेल.

फोनवर बोलून बघा. जर काही कारणास्तव त्यांना ऑनलाईन अपडेट करणे शक्य नसेल तर एक जॉईंट डिक्लेरेशनचा फॉर्म भरून (ज्यावर कंपनी HR ची सही शिक्का लागेल) तो EPF ऑफिसमध्ये जाऊन देणे आणि त्यांच्या करून अपडेट करणे हा एक पर्याय आहे. पण यात किती हेलपाटे पडतील सांगता येत नाही.
शक्यतो कंपनीकडूनच गोडी गुलाबीने अपडेट करवून घ्या.