गेले द्यायचे राहून

Submitted by शिवाजी उमाजी on 11 February, 2019 - 02:34

गेले द्यायचे राहून

त्या स्वप्निल कवडशांचे
गहिरे नितळ आरसे
तुझ्या स्वप्नांना खिळवून
गेले द्यायचे राहून...

भ्रमर प्रिय वेडावणाऱ्या
रंग भरल्या फुलांना
गंधित श्वासांना फुलवून
गेले द्यायचे राहून...

ओढ जीवास लावणाऱ्या
प्रेम पिसे भरलेल्या
मनात भावनांना गुंतवून
गेले द्यायचे राहून...

नाजूक मोहक कमनीय
आरस्पानी न् लाघवी
कोमल यौवना सजवून
गेले द्यायचे राहून...
©शिवाजी सांगळे 10-02-2019 YQ
मो.९५४५९७६५८९

Group content visibility: 
Use group defaults