हॅण्डओव्हर

Submitted by ऋयाम on 3 February, 2019 - 11:43

बेहती हवा सा था वोऽ, उडती पतंग सा था वोऽ
गेला वाटतं, उसे मत ढूंढो !

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एका नव्या प्रोजेक्टमधे काम सुरु केले, तिथे हा रँचो भेटला. मला साहेबांकडून हॅण्डओव्हर घ्यायचा होता. नीट प्लॅनिंग करून, त्याप्रमाणे रोज काम केले, तर फार तर महिन्याभरात काम पूर्ण होईल, असा माझा "भरम" का "वहम" होता, हे एकदोन भेटीतच समजले.

आमची पहिली भेट त्यांच्या व्हॉट्स-अ‍ॅपच्या प्रोफाईल पिक्चर वरून झाली. त्यांचा फोटो पहाता, आजकाल ९९% पुरुष घालतात तसा आडव्या पट्ट्यांचे प्रिंटवाला टीशर्ट घातलेले, त्यांचे दोन फोटो तिथे लावलेले होते. डाव्या अंगाच्या फोटोवर लाल रंगात "BEFORE", तर उजव्या अंगाच्या फोटोवर हिरव्या रंगात "AFTER" असे लिहिलेले होते. सुप्रसिद्ध चामखीळ दोन्ही फोटोंमधे दिसत होते, म्हणजे माणूस तोच होता. नीट पाहिल्यावर समजलं, की उजव्या अंगाच्या फोटोमधे, साहेब काहीसे बारीक झालेले आहेत..

आजकाल भारतीय लोक स्थूलपणाबद्दल जागरूक होत आहेत. मॅरेथॉन पूर्ण केल्यावर मिळणारी डॉलरवाली चॉकलेटे दाताने तोडताना फोटो काढत आहेत. ह्या साहेबांनी असेच कष्ट घेतले असावेत असे मला वाटले. असले कष्ट जमणार्‍या लोकांबद्दल मला आदर वाटतो. तो मी साहेबांना बोलून दाखवला, आणि अलगद जाळ्यात सापडलो - "हॅहॅ हॅहॅ... न्यूट्रलाईट!", साहेब हसत म्हणाले.

"काय?" - मी. हे नाव मी बहुतेक पहिल्यांदाच ऐकत होतो.
"अरे हां. मतलब, वैसे मैं थोडा एक्ससाईज करता हूं. थोडा खानेपे कंट्रोल है. " साहेब चेहेरा अगदी सिरियस वगैरे करत म्हणाले. "But if you ask me < INSERT NAME>, I must say, Neutrilite has helped me a lot in my journey. "
"अरे वा!, छान. मलाही जमेल तसा व्यायाम करायची सवय आहे. पूर्वी जीमला जात असे, पण हल्ली वेळ कुठे असतो?" मी हसत हसत म्हणालो.
"वो तो है. वो तो है... < INSERT NAME> मगर हमारे लाईफ की जिम्मेदारी (का जिम्मेवारी?) तो ... "
पुढचे काही मी ऐकले नाही. small talk करता करता गाडी एकदम "जीवन" वगैरेवर कशी आली काही समजेना.

मी तरीही हसलो, आणि हॅण्ड-ओव्हरचा विषय काढायचा प्रयत्न करू लागलो.
वैसे.... "What's your age?" साहेबांनी पुढे विचारलं.
विषय वाढू नये, म्हणून मी पटकन वय सांगितलं : X years.
साहेब क्षणार्धात बोलले, "अच्छा? डोण्ट माईंड, पर आप X+४/५ लगते हो. थोडेसे डार्क सर्कल्स भी आ रहे हैं. बाल... ".
"X+४/५ तुझा बा साल्या.. फुल्या फुल्या. फुल्याफुल्या! फुल्या फुल्या. फुल्याफुल्या! फुल्या फुल्या. फुल्याफुल्या!" मी मनात म्हटले, कारण नव्या कंपनीत पहिल्याच प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा खून करणे रेझ्युमेवर तितकेसे बरे दिसले नसते.

खरे सांगायचे तर "वयापेक्षा मोठे दिसतो" हे अगदी लहानपणापासून ऐकायची मला सवय आहे. बसमधे माझ्यापेक्षा मोठी मुले, उंची कमी असल्यामुळे अर्धे तिकीट काढत असत, आणि केएमटी वाले कंडक्टर मला "पुरावा" मागत. स्वीमिंग पुलावरही तेच. लहानपणी आईने सांगितलेल्या "डबल हाड", वजन, उंची वगैरे गोष्टी ह्या डेढफूट्याला कशा समजून सांगायच्या?

इथे मला लहानपणीच्या आमच्या सोसायटीमधली १२-१३ मुलांची मोठी गँग आठवली. त्यात आमच्याच वयाचा, थोडासा स्थूल असा एक मुलगा होता. त्याला सगळे जाड्या-बिड्या म्हणत. त्याला त्याच्या घरच्यांनी का कोणीतरी एक वाक्य शिकवले होते. आम्ही त्याला जाड्या/ ढोल्या/ योकोझुना वगैरे म्हटलो, की तो आम्हाला "तुझ्या बापाचे खातो काय रे?" म्हणत असे. आज वीसेक वर्षांनंतर त्याचे ते वाक्य आठवून त्याच्याबद्दल फार आत्मियता वाटू लागली. अर्थात ऑफिसबिफिसमधे असल्या गोष्टी शोभत नसल्याने, तोंडावर हसू ठेवावेच लागले. तरी साल्याच्या चहाचे पैसे मीच दिलेले होते.

"आपको वेटलॉस की जरूरत है. आप चाहे, तो मैं आपको गाईड कर सकता हूँ!" साहेब म्हणाले. तेव्हा माझ्या लक्षात आले, की हे साहेब म्हणजे "lose weight now, ask me how" टाईप आहेत.. आता परतीचे दोरही कापले गेले होते. काय करावे सुचेना. त्यामुळे पुढची १५-२० मिनिटे वाया जातील, अशी मनाची तयारी सुरु करून मी चहा पिऊ लागलो.

* * *

साहेब बिजी असल्यामुळे, पुढचे दोनतीन दिवस भेट झाली नाही. नंतर मग मेसेंजरवर साहेबांचा पिंग - "अभी बिजी हो?"
मी तर साहेबांची वाटच बघत होतो. काम लवकर संपवायचे होते. "बिझी कसला? लगेच येतो".
"ऐसा किजीये, टपरीपे आईये", साहेब.
लगेच निघालो, आणि चहाच्या टपरीजवळ पोचून त्यांची वाट पाहू लागलो.
"तुम्ही चहा की कॉफी?"
"हां, चाय. और थोडी भूक लग रही है. ये खाएंगे?" तिथले सोया चकली चे एक पाकिट उचलत साहेब.
"मला नको, तुम्ही खा" पैसे देत मी म्हणालो.

तिथे बाजूला ऑफिसच्या लोकांनी उगाचच खुर्च्या टाकून ठेवलेल्या आहेत. रिकामटेकडे लोक तिथे सदानकदा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, अप्रेजल, मॅनेजर, पॉलिटीक्स, क्रिकेट इत्यादी विषयांवर गप्पा मारताना दिसतात. आज शुक्रवार असल्याने अजूनच दिवाळी. नशिबाने तिथे दोन खुर्च्या दिसल्या, आणि साहेब म्हणाले, "चलो, वहाँ बैठते हैं"
"चला, आज ह्या खुर्च्यांचा सदुपयोग होईल.. आज इथे हॅण्डओव्हरच्या गप्पा होणार", असे मी मनातल्या मनात म्हणणार, एवढ्यात let me tell you the secret.", साहेब म्हटले.
" 'द सिक्रेट' कसे? 'अ सिक्रेट' तरी म्हणावे?? "
प्रोजेक्टमधले काय सिक्रेट दाखवतोय म्हणून पाहतो, तर साहेबांनी खिशातून त्यांचा मोबाईल बाहेर काढला. त्यातल्या एका डब्याच्या फोटोकडे दाखवून ते म्हणत होते. "This is the secret." "my weight loss secret! "

अरे चोंग्या.. एकदा ठिक आहे. ऑफिसच्या वेळेत सांगितलेले काम करायला तुला वेळ नाही म्हणतोस, आणि आता माझा वेळ, माझे पैसे (किती का असेनात) घालवून स्वतःची डर्टी सिक्रेट्स मला कशाला सांगतोयस?

"I personally recommend that you use this." साहेब.
"ये कैसा है, एक बार आप इसे use करना शुरु करेंगे, तो आपको पता चलेगा. ये वेट लॉसमे मदद करेगा. वो तो है ही. और तो और आपको बहुत फ्रेश फिल होगा..." इसमे जो एकदम नेसेसरी व्हायटामीन्स होते हैं, जैसे ई, बी है, फिर प्रोटीन्स, मिनरल्स. स्किन के लिये भी अच्छा है, बालोंके लिये भी. हेहेहे.. आप तो जानते ही होंगे. सब है इसमे. सिर्फ एक बार सुबह मे पिना है. एकदम फ्रेश हो जाते हैं. मैं भी पिता हूं. मैं रेकमेंड करता हूं, आप दो चम्मच रोज लिया करो, और दो महिंनो बाद मुझे रिपोर्ट बताना" साहेब शेकहँडसाठी हात पुढे करत.
त्यांच्या सोया चकल्या खालेल्या हाताला धरून मी काही शेकहँड केले नाही, नुसती मान हलवली आणि "चला उशीर होतोय, ऑफिसमधे जाऊ" म्हटले.

तासभर हॅण्डओव्हर सदृश बोलणी झाल्यावर रात्रीच्या बसची वेळ झाली, तसे मी साहेबांना सांगितले, की मी आता जातो. तसे साहेब हसले, आणि म्हणाले, "अरे, आप भी बससे आते हैं? What a coincidence? I also travel by bus! " हेहेहे.. "चलो, साथही चलते हैं"
"बोम्बला!"
बस स्टॉपपर्यंत जाता जाता हॅण्डओव्हरच्याच गोष्टी सुरु होत्या. स्टॉपला शंभर मीटर अंतर उरल्यावर साहेब अचानक म्हणाले, "अच्छा < INSERT NAME>, आप कल क्या कर रहे हैं?"
"उद्या? उद्या तर सुट्टी आहे ना? उद्या मी हिमालयात जाऊन नागा साधूंसोबत बिड्या फूकीन. तुज्या बाचं काय जातंय?" मी मनात म्हटलं.
"अ‍ॅक्च्युली, मैं और मेरी वाईफ (मंद हसून), Saturdayको हमारे स्वारगेट ऑफिसमे जाते हैं. I recommend you come to our office tomorrow morning. I will give you a full body scan. "
मी चूकून massage ऐकलं.
"उसमे आपको पता चलेगा, के बॉडीका सिच्युएशन क्या है, किस चीज की कमी है?"
"चीज मी भरपूर खातो. कधीकधी पोळीत चीझ सिन्गल घालून मायक्रोव्हेव्ह ओव्हनात गरम करून खातो. पिझ्झा तर चीजबर्स्ट् असल्याशिवाय तोंडच लावत नाही. चीझकी कोई कमी नही हैं." मी मनात.
त्यानंतरही ते बरंच काही बोलले, पण मी लक्ष दिले नाही.
"तो आप कल आ रहे हैं ना?", "तो मैं बात पक्की समझू?" च्या धर्तीवर साहेब बोलले, आणि शेकहँडसाठी हात पुढे केला.
"वाईफ को पुछके बताता हूं" असे म्हणून त्यांना बायबाय करून आजचे मरण उद्यावर टाकून एकदाचा सटकलो.

<?काल्पनिक?>
< ? क्रमश: ? >

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
मस्त रे! मजा आली वाचताना. नागा साधू, शुक्रवार असल्याने अजूनच दिवाळी वगैरे धमाल आहेच पण "द सिक्रेट" टोटल लोल.

'किस चीज की कमी है?' Lol सगळाच लेख Lol क्रमशः आहे का?

आणि तुम्ही शब्द निळ्या रंगात रंगवून, लिंका आहेत असे भासवून वाचकांची फसवणूक का बरे करता?

जवळची मैत्री तोडावीच लागली अश्याने. ते अम्वे. असे पिच्छा पुरवत की बस. सकाळी नाश्ता माझ्याच घरी कर सांगून आमच्याकडे मिटींगला येच असे सांगून त्रास देणारी मैत्रीणशी शेवटी सांगितले की जमणार नाही. पकावु असतात आणि सतत बकरा शोधत फिरतात.

आमच्या एका मित्राने मी कामासाठी बाहेर गावी गेले असताना, माझ्या नवर्याला जेवायला बोलावले होते. आणि जेवण झाल्यावर त्याच्या गळ्यात असाच एक डब्बा मारला होता पन्चवीसशे चा, दोन तास पकवून. नवर्याने पीछा सोडवण्या साठि घेतला तो, पण तो मित्र कायमचा सुटला..

धमाल लिहिलंय
माझा एक भूतकाळी साहेब न्यूट्रिलाईट असल्याने वेदना अगदी हृदयापर्यंत पोहचल्या.
त्याला मी एकदा(काम संपल्यावर आणि टीम बदलणार हे माहिती झाल्यावर) म्हटलं होतं की एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगून सगळ्यांनी मेम्बर्शीप घेऊन सगळेच अमवे झाले तर पिरॅमिड स्कीम चालणार कशी?

Lol

भारी आहे लेख.
>>तुम्ही शब्द निळ्या रंगात रंगवून, लिंका आहेत असे भासवून वाचकांची फसवणूक का बरे करता?>> हो ना. एकदा नाही तर दोनदा.