नशिब

Submitted by सचिन पगारे on 3 February, 2019 - 10:07

च्यायला, वैताग आलाय ह्या जिंदगिचा एक काम धड होईल तर शपथ. बस आता शांत बसलो तर असच गरीबीत जिणं जाईल आणी सरकारी हाँस्पिटलमध्ये टाचा घासत मराव लागेल.आता काहीतरी दोन नंबरच काम करावच लागेल. आता कामालाच लागतो.

आयला,तो प्रभुणे बिल्डर फँमिलीसकट फाँरेनला गेलाय. बंगल्याची रेकी केली. एक वाँचमन गेटला असतोय. त्याला संपवावच लागेल. पण खुन केला तर त्याच कुटुंब उघड्यावर पडेल.मरु दे,आपल्याला पैसेवाल व्हायच तर अस भावनिक होता कामा नये नाही तरी त्या वाचमनची कमाई किती असणार. एखादा गरीब त्याच्या लाचार आयुष्यातुन सुटेल. सारा प्लँन रेडी केलाय..

रात्री सामसुम होताच घरातुन निघालो. मी आधी वाँचमनच काम केल होत तो ड्रेस माझ्याकडे होता. तो अंगावर चढवला. मित्राची रिक्षा आधिच आणली होती रात्री तालुक्यात जाउन भाडे मारतो अस त्याला पकवल होत. वाँचमनची खबर काढली होती अट्टल बेवडा होता. बायको धुणीभांडी करायची त्यात चार पोरी. सारा पगार दारुतच उडवायचा.प्लँन थोडा चेंज केला त्याच्या पोराटोरांची दया आली.उलाढाल्या करुन एक माणसाला बेशुध्द करायचे औषध घेतले होते.रिक्षा बंगल्यापासुन थोडी लांब लावली. चालतच  वाँचमनकडे गेलो त्याला रामराम घातला. बोलघेवडा होता त्यात माझा ड्रेस बघितला आपलाच नोकरबंधु म्हणुन खुश झाला.गप्पा रंगल्या मागच्याच बंगल्यात वाँचमन म्हणुन रुजू झाल्याची त्याला थाप ठोकली.
त्याला म्हटल, 'थोडी घेणार का? गडी खुश झाला त्याला दोन लार्ज पेग दिले. नशा चढु लागली मी मात्र बेताने पित होतो मोठ्या खुबिने औषध त्याच्या पेगमध्ये टाकले. गडी तिसऱ्या पेगनंतर बेहोश झाला. सावधतेने उठलो आजुबाजुला नजर टाकली.सर्वीकडे निजानिज झालेली.
'साल, आपल नशिब कुणी घडवल कुणास ठाउक,अत्यंत बेकार हे ठाउक असल्याने सावधतेने वागत होतो. वाँचमनच पार्सल उचलल आणी नेउन आवारातल्या एका मोठ्या वडाच्या झाडामागं टाकल. गडी काय लवकर उठणार नव्हता. बरोबर आणलेल्या पिशवित सार उपयोगी सामान होतो. आरामात कडीकुलुप तोडल आणी एकदाचा बंगल्यात दाखल झालो. हा प्रभुणे बिल्डर आमच्या शेजारच्या गावचा बडा असामी. मुंबईत रहायचा. हा बंगला त्याने ते काय शेकंड होम का काय म्हणुन बांधला होता. 'आयला, इथ आम्हाला राह्यला स्वताच घर नाही नि हे शेकंड होम बांधतायत लेकाचे मनात विचार आला.वर्षातले दोन महिने तो इथे येउन रहायचा.आता इथ येउन दोन दिवस राह्यला नि गड्याच्या काय मनात आल कुणास ठाउक फँमिलीला घेउन फाँरेनला गेला.
माझी आयटम पर्वता त्याच्या घरी हे दोन महिने साफसफाईला यायची. तिच्याकडुनच ही बातमी सहज बोलण्यात म्हणुन आली होती.आपल तिच्यावर लै प्रेम पण नशिब बेकार आपली दरिद्री अवस्था बघुन तिन आपली कन्नी काटली होती. व डायवर पक्याच्या नादाला लागली होती. पण माझी नि तिची दोस्ती कायम होती. आपण फाटक्या नशिबाचे हे मला शंभर आणे ठाउक होत म्हणुन मी हे चालायचच म्हणुन सोडुन दिल होत. ती आपल्याला थोड्या दिवसांसाठी पटली हीच मोठी गोष्ट होती. चला ते जाउ द्या ठरल्याप्रमाणे बंगल्यात घुसण्याचा माझा प्लँन यशस्वी झाला होता. आता.माझ्या थर्डक्लास नशिबाने काही दगा द्यायच्या आत घाई करण जरुरी होत.हातात हातमोजे घालुन तयारच होतो कपाट फोडल, सार घर पालथं घातल. पण काही पैसा नव्हता. तिजोरीत काही कागदपत्र होती. पण माझ्यासाठी ती रद्दीच. शेवटी माझ्या दुष्ट, खत्रुड नशिबाने दगा दिलाच होता. थकुन, भागुन डोक्याला हात लावुन पलंगावर बसलो. डोक्यावरचा हात काढुन पलंगावर ठेवला अचानक सणकन डोक्यात विज चमकली. झपाट्याने उठलो गादी हाताला कडक लागली होती.धारदार चाकुने गादी फाडुन काढली नि आनंदाने वेड व्हायला झाल. पाचशे पाचशेच्या नोटांचे बंडल. साला ब्लँक मनी असणार प्रभुणे कंप्लेटही करु शकत नाही. झपाट्याने बंडल गोणीत टाकु लागलो. गोणी भरली पण बंडल संपेनात. तशीच काही खिशात कोंबली गोणी घेउन निघालो. रिक्षात गोणी टाकली सुसाट वेगान घरी आलो. पलंगाखाली गोणी लपवली. उर धपापत होता पण मिशन फत्ते झाल होते.

आजवर ज्या नशिबाला खत्रुड समजलो होतो तेच माझ्यावर आज मेहेरबान झाले होते.नशिबाला शिव्या घातल्याबद्दल मला पश्चाताप होत होता.नोटा मोजायला घेतल्या तिन करोडच्या आसपास रुपये होते. आता मला सरकारी हाँस्पिटलमध्ये टाचा घासुन मरावे लागणार नव्हते. साऱ्या अत्रुप्त इच्छा पुर्ण करता येणार होत्या.पर्वतासारख्या पोरीत आता मला इंटरेस्ट राहिला नव्हता. आपल्या हैसियतची एखादी पोरगी बघुन संसार करायचा विचार पक्का केला.

दुसऱ्या दिवशी तिन पाचशेच्या नोटा घेतल्या. घराला कुलुप लावले. वाईन शाँपमधुन खंबा घेतला. जेवणाचे पार्सल घेउन घरी आलो. आज खुशीत सारा खंबा उडवला.जेवुन मस्तपैकी ताणुन दिली. उशीरा उठलो डोक जड झाल होत. आजवर दिवसमर आराम करायचा ठरवल. दुपारी जाउन दोन क्वार्टर घेउन आलो. जेवन मागवलं. आतापर्यतच्या आयुष्यात माझे नशिब माझ्यावर रुसले होते पण आता मेहरबान झाले तर डायरेक्ट करोडपती झालो. अत्यंत हालाखीत आयुष्य गेल्याने नशिबावरचा नि देवावरचा विश्वास उडुन गेला होता. कोनाड्यात ठेवलेली देवाची तसबिर काढली निट पुसून पासुन घेतली तिला हार चढवला. मनोभावे नमस्कार केला.टिव्ही बऱ्याच दिवस नादुरूस्त अवस्थेत होता .आता नविन तो चपटा टिव्ही आलाय तो तर घ्यायचाच होता पण तोपर्यत आहे तो दुरुस्त करायचे ठरविले. मँकेनिकला बोलावले त्याने सांगितल, 'महाग पडेल,चारशे रुपये खर्च येईल'. हसलो त्याला म्हणालो, 'कर दुरुस्त'. गड्याने कायतरी खटाटोप करुन दुरुस्त केला. त्याला पाचशेची करकरीत नोट दिली.गडी म्हणाला,'सुट्टे नाहीत'. म्हणालो,'राहु दे तुला'. खुश झाला,'हो साहेब,हो साहेब करतच निघाला. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी साहेब म्हटले होते. अंगावरुन मोरपिस फिरल्यासारखे वाटले.आता 'साहेब' ह्या शब्दाची कानाला सवय करुन घ्यावी लागणार होती. रात्रिचे सव्वा आठ वाजले होते मी समोरच्या स्टुलवर क्वार्टर ठेवली.सोबतीला खारवलेले काजु घेतले. पेग भरता भरता विचार करु लागलो. थोडे दिवस असेच जाउ द्यायचे नंतर हे गाव सोडुन शहरात स्थायिक व्हायचे. पैसा तर भरपुर आहे आयुष्य मजेत घालवायचे. लग्न वैगरे करुन मस्त.सेटल व्हायचे.

पेग तयार झाला उठुन टिव्ही लावला. दोन काजु तोडांत घेतले बातम्या सुरु होत्या.दारुचा एक मोठा घोट तोंडात घेतला पण टिव्हीवरची बातमी ऐकुन त्याचा फवाराच बाहेर पडला. दारुचा काचेचा ग्लास जो हातात होता तो घट्ट धरल्याने हातातच फुटला साऱ्या काचा हातात घुसुन रक्ताने स्टुल माखला पण माझे कशाकडेही लक्ष नव्हते. मी सुन्न मनाने टिव्हीवरची बातमी तोंडाचा आ करुन पहात होतो. साऱ्या
अंगातुन घामाच्या धारा वहात होत्या.भितीने अंग थरथरत होते. साल्या खत्रुड नशिबाने पुन्हा एकदा दगा दिला होता.

टिव्हिवर भारताचे पंतप्रधान घोषणा करत होते,'मित्रो ,आज रात बारा बजेसे पुराने नोट बंद..

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पगारे, किती तो शिळ्या कढीला ऊत!! मायबोलीवर नव्हतात का तुम्ही जेव्हा ह्या विषयाने पानंच्या पानं भरली.
हा वॉट्सॅप फॉरवर्ड आहे का? त्यात प्लँन, अँप, फॅंमिली, फाँरेन असं चुकीचं लिहिलेलं असतं.

मोदींनी नोटाबंदीचा जो घणाघाती घाव घातला तो अनेकांच्या पचनी पडला नव्हता. हे सर्वच विरोधक म्हणत होते की काळा पैसा असा कोणी नोटांच्या स्वरुपात लपवून ठेवतो का? हा पैसा रिअल इस्टेटीत गुंतवलेला असतो इतकंही साधं कळत नाही का? पण या सार्‍यांच्या हे लक्षात आलं नाही की रिअल इस्टेटीत गुंतलेला काळा पैसा शेवटी बिल्डरकडे तरी नोटांच्याच रुपात सापडेल ना? हे गुपित मायबोलीकरांपुढे सर्वप्रथम उघड करुन दाखविल्याबद्दल पगारेंचं पुनश्च अभिनंदन.

<<मोदींनी नोटाबंदीचा जो घणाघाती घाव घातला तो अनेकांच्या पचनी पडला नव्हता. >>
--------- घाव घाणाघती होता का माहित नाही. पण अगदी साधे मुद्दे पण विचारात घेतले नव्हते उदा : ATM मशीन नव्या नोटा साठी तयार नसणे.

<< पण या सार्‍यांच्या हे लक्षात आलं नाही की रिअल इस्टेटीत गुंतलेला काळा पैसा शेवटी बिल्डरकडे तरी नोटांच्याच रुपात सापडेल ना? >>
------- काळा पैसा कशाला म्हणायचे ?
१: नोटबंदीच्या आधी किती पैसा नोटांच्या स्वरुपांत व्यावहारात होता?
२: नोटबंदीच्या नंतर किती पैसा जुन्या बाद झालेल्या नोटांच्या स्वरुपांत बँकात परत आला?
१ वजा २ = ?

कामाचे प्रचंड वाया गेलेले तास आणि सामान्य जनांना असामान्य त्रास हा वेगळा मुद्दा.

उदय तुम्ही कट्टर मोदी विरोधक आणि काँग्रेस धार्जिणे का ... नाही म्हणजे तुमचे पण पैसे असेच वाया गेले वाटतं...

<< उदय तुम्ही कट्टर मोदी विरोधक आणि काँग्रेस धार्जिणे का ... नाही म्हणजे तुमचे पण पैसे असेच वाया गेले वाटतं... >>
------ माझ्या प्रतिक्रिया वाचल्यावर तुम्ही या निष्कर्षावर आला आहात. येथे सांगितल्या बद्दल धन्यवाद.

माझे मत वेगवेगळे सोर्सेस वाचुन बनले आहे. २०१४ नंतर काही बदल अपेक्षित होता. तो काही झालेला दिसला नाही , किंवा त्या दिशेने कुठलेही एक छोटे पाऊलही उचलले गेले नाही. NDTV ( तुम्हाला आव डत नसेल, पण बनवलेला किंवा खोटा असेल तर सांगा - सध्या खोट्या गोष्टी वेगाने फिरतात) हा वर वेंकटरामन रामकृष्णन यांची मुलाखत, अनेक गोष्टी खटकल्या पैकी एक.
https://www.ndtv.com/india-news/internet-during-mahabharat-nobel-prize-w...

<< आणि (निवडणूकांच्या आधी) सचिन पगारे परत आले आहेत !!!! २ -३ वर्षांनी भेटलात पगारे साहेब... नमस्कार.. >>
----- वेलकम बॅक सचिन पगारे..... येथे फिरकत जा आणि अम्हाला मार्गदर्शन करत जा.

<नाही म्हणजे तुमचे पण पैसे असेच वाया गेले वाटतं>
हो हो. जे काही ०.७०% इतके प्रचंड पैसे परत आले नाहीत (त्यातले किती अजून नेपाळकडे आहेत, ते सोडून) तेच सगळे नोटाबंदीने होरपळलेले लोक शिव्या देताहेत.
अपना फंडा क्लिअर है भई! अपना अपना फंडा क्लिअर है!

वेलकम बॅक पगारे साहेब !
त्या बाप्पु ने गादी टराटरा फाडु पैका काढला, त्याच वख्ताला फुडचा प्लॉट कळला.... Wink Happy
आता हि कढि भी नाय र्हाय्ली तर कश्यापायी आन कश्याला उत आनुन र्हाय्ले बाप्पा !!!!!

<आता हि कढि भी नाय र्हाय्ली तर कश्यापायी आन कश्याला उत आनुन र्हाय्ले बाप्पा>

कढी नासली ना हो? सरकार सरकारी संस्थेचेच बेकारीचे आकडे लपवतंय ते उगाच का?