दारू पिताना तुम्ही कोणती गझल ऐकता??

Submitted by कटप्पा on 2 February, 2019 - 23:02

प्यायला बार मध्ये बसलो होतो आणि ही गझल लागली -
झूम के जब रिंदो ने पिलाई.. एक कमी थी ताजमहल मे हमने तेरी तस्वीर लगा दी.
एक कमी थी ताज महल मे??? 'तेरी तस्वीर लगा दी... वाह
काय लाईन आहे, मी रिपीट करायला लावली आणि रिपीट वर रिपीट होत राहिले, नंतर बार मधले बाकीचे पण वाह वाह करायला लागले..पेग्स वर पेग्स होत राहिले

नंतर मुन्नी बेगम चे लझ्झते गम बढा दिजिये लावली,मजा आला..

नंतर चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..

तुम्ही कोणती गझल ऐकता पिताना?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारू पिताना तुम्ही गझल का ऐकता? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, यासारखी गाणी का ऐकत नाही?

उबोशी सॉर्ट ऑफ सहमत. (सॉर्ट ऑफ कारण मला मुन्नी गाणे आवडत नाही ;))

दारू आणि गझल हे फार डिप्रेसिंग कॉम्बो आहे. त्यामुळे दारू पिताना उडत्या चालीची, ठेका धरायला लावणारी गाणी ऐकावीत.

बादवे तुमचं नवीन वर्षाच रिझोल्युशन एक महिना टिकलं की! अभिनंदन Lol

२. गझल ऐकताना कुठली दारू पिता ?
पुधा (पुढचा धागा)

३. सॅड साँग ऐकताना कुदापि ?
४. फडकते गाणे ऐकताना कुदापि ?

बरेच धागे दडलेत यात.

दारू पिताना भजन ऐकणारी मंडळी माझ्या महितीतली आहेत.

दारू पिताना गझल ऐकणारी मंडळी लाईव्ह म्युझिक असलेल्या रेस्टॉरंट्स मध्ये गझल गायकाला दाद, फर्माईश आणि टिप्स देत पिताना आढळतात.

हे ललितलेखन आहे?

नवीन Submitted by वावे on 3 February, 2019 - 03:37

>>>तुम्ही हायझेनबर्ग आहात का?

दारू आणि गझल हे फार डिप्रेसिंग कॉम्बो आहे
> चूक, चांगल्या गझल पण असतात नॉन डिप्रेसिंग. जसे की होश वालो को खबर क्या.

मी दारू पीत नाही पण आपले पंकज उधास ह्यांचा एक अतिशय चांगला अल्बम आहे त्याचे नावच पैमाना असे आहे. सर्व गाणी सॉर्ट ऑफ दारू , नशा पेला साकी सोडून गेलेली प्रेमिका वगैरे वर आधारित आहेत. आपण का पितो वगैरे. पण संगीत म्हणून छान आहेत. पन ह्या गायकाची माझी टॉप फेवरिट सावन के सुहाने मौसम मे एक नार ... आणि चांदी जैसा रंग हय तेरा सो ने जैसे बाल एक तुही धनवान .... अस्सल पियक्क ड लोक वेडे होता त ही गाणी ऐकताना. पैमानाची प्लेलिस्ट शोधुन लिहीते इथे. एकदम बाफाला साजेशी आहेत गाणी.

ते प्रेमाचे क्षण आपल्या जीवनात आले तरी म्हणून एका सुखद आठवणीं च्या बुकेला जिवंत करता येते कि. डिप्रेस व्हायची गरज नाही.

गझल ऐकताना दारू लागत असेल, तर गझलेची नशा काय ते समजलंच नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

कोणती गझल कोणत्या दारूसारखी नशा आणते वगैरे आल्ट रिअ‍ॅलिटी बोल्ला अस्तात तर तुमच्या हिस्ट्रीला साजेसे झाले असते, हे मावैम.

दारु पित नसलो तरी मित्रांबरोबर बसतो.... तो माहौल आवडतो)
>> चकना पण आवडत असणार नक्कीच ...☺️

भरत, तुम्ही हायझेनबर्ग आहात का? असा प्रश्न झेलायची तयारी ठेवा.

कटप्पा - हा धागा विरंगुळा / माहिती हवी आहे अशा विभागात हलवा, कृपया धन्यवाद.

मी हाब नसेन किंवा असेन ही कोणी सांगावे Wink पण कटप्पा तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायच्या ऐवजी प्रतिप्रश्न विचारताय म्हणजे विशिष्ट शहरातले आहात अशी शंका येण्यास वाव उत्पन्न होते आहे. शोनाहो

घरापासुन दोन हजार मैलांवर एखाद्या स्पोर्टस बार मधल्या गोंधळात एअरपाड वर अपनी धुंन मे रहेता हुं हे नासिर काझमी साहेबांचे अल्फाझ, घुलाम अलींचं रेंडिशन हृदयात कसं झिरपतं हे शब्दात नाहि मांडु शकत...

Pages