जॉर्ज फर्नांडिस श्रद्धांजली

Submitted by टवणे सर on 29 January, 2019 - 20:34

भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते, कामगार चळवळीतील अग्रणी नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या भाषणांनी लोकसभा राज्यसभा ते नाक्यावरच्या, कॉलेजातल्या सभा गाजवलेल्या आहेत. त्यांचे राजकारण आंतर विरोधाने भरलेले होते. काँग्रेस विरोधात जनता पार्टि स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता, पक्षांची युती ना करता विलीनीकरण करून नवीन पक्ष स्थापन करावा या मताच्या गटात ते होते त्यानुसार जनता पार्टिची स्थापना झाली. दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावरून जनताचा अंत करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पुढे याच पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांसोबत त्यांनी एकत्र येऊन एनडीएचे सरकार वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 6 वर्षे चालवले.
कारगिल युद्धाच्या वेळी जॉर्ज रक्षामंत्री होते. त्यांच्यावर कॉफीन घोटाळा भ्रष्टयाचाराचे आरोप झाले व त्यांना लोकसभेत जवळजवळ दोन वर्षे बोलू दिले गेले नाही. जॉर्ज सैन्यदलात लोकप्रिय रक्षामंत्री होते हे त्यांच्यावर लिहिलेल्या ज्येष्ठ सैन्याधिकार्यांच्या लेखांवरून लक्षात येईल.
त्यांच्याबरोबर समता पक्षाची स्थापना करणारे नितीश कुमार हे आज एक कुशल प्रशासक व बिहार सारख्या आर्थिक मागास राज्याचे कायापालट करणारे म्हणून ओळखले जातात.
जॉर्ज रक्षामंत्री असतानासुद्धा त्यांच्या घराचे दरवाजे ब्रह्मदेशातील लष्करी राजवटीविरोधात लढा देणार्‍या ब्रह्मदेशातील विद्यार्थी व ब्रह्मदेशातून बाहेर काढल्या गेलेल्या व पळून बाहेर निघू शकलेल्या राजकीय विरोधकांसाठी नेहेमी उघडे राहिले. कितीतरी जण त्यांच्या घरातच राहत असत असा उल्लेख काही लेखात वाचल्याचे आठवते.

आयुष्यातली शेवटली काही वर्षे दुर्दैवाने आजारात गेली. त्यांची एक पिढीजात जमीन बंगलोरमध्ये मोक्याची रिअल इस्टेट झाली. लग्नानंतर काहीच वर्षे एकत्र राहिलेली व नंतर अमेरिकेस गेलेली त्यांची पत्नी भारतात परतली. घटस्फोट झाला नसल्याने त्याच जॉर्ज यांच्या कायदेशीर पत्नी होत्या. अनेक वर्षे राजकीय जीवनात साथ दिलेल्या जया जेटलीना त्यांच्याबरोबर शेवटी राहू दिले नाही. हे सर्व फार दुर्दैवी होते.

कोका कोला आणि आयबीएमना भारताबाहेर घालवणारा, रेल्वे संप घडवून आणणारा, बहुभाषा जाणणारा, कर्नाटक ते बिहार असा भारातव्यापी पडद्यावर राजकारण करणारा आणि पुढे वैचारिक विरोधकांबरोबर आयुष्याची महत्वाची वर्षे व्यतीत करणाऱ्या या नेत्यास विनम्र श्रद्धांजली.

त्यांच्यावर लिहिले गेलेले हे काही लेख:

https://indianexpress.com/article/opinion/columns/george-fernandes-defen...

https://www.ndtv.com/blog/when-i-flew-george-fernandes-defence-minister-...

https://theprint.in/opinion/george-fernandes-never-interfered-in-defence...

https://theprint.in/opinion/no-worries-i-am-not-pedigreed-how-i-discover...

https://m.rediff.com/news/special/we-never-had-a-raksha-mantri-as-sharp-...

https://indianexpress.com/article/india/firebrand-political-rebel-to-def...

https://twitter.com/ShekharGupta/status/1090299092985470977?s=19

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजलीच्या धाग्यावर मी ऑलरेडि लिहिलंय, इथे परत लिहितो. फर्नांडिस हे सच्च्या समाजवादि घडणीचे शेवटचे नेते; नाथ पै, जोशी, गोरे, दंडवते एकेक करुन सगळे आता पडद्याआड गेलेले आहेत. आता समाजवादि आचारांचे, विचारांचे कोणिहि राहिलेले नाहि, जे सो कॉल्ड समाजवादि आहेत ते सगळे माणसाच्या रुपातली गिधाडं आहेत.
बाळासाहेबां पाठोपाठ मुंबई बंद करण्याची ताकद केवळ फर्नांडिस यांच्यात होती. गुगल, विकि वाचुन मतं बनवणार्‍यांना फर्नांडिस कधिच झेपणार नाहित...

आणि कोकण रेल्वेचं श्रेय दंडवते यांच्या इतकच फर्नांडिस यांनाहि जातं.

विनम्र श्रद्धांजली.

@राज - सॉरी पण
जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर मुंबई बंद करण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती.
मुंबई सगळ्यात आधी बंद खऱ्या अर्थाने बंद करून दाखवली जॉर्जनी. मुंबईचा सिंहच म्हणा ना...
विनम्र श्रद्धांजली!

Sad

रक्षा मंत्री ते सिमेवर (प्रतिकूल परिस्थितीत) नियमाने भेट द्यायचे, त्यांच्या समस्या जाणायचे. चीन बद्दल खरे बोलून खुप टिका झेलली..... स्पष्ट, पारदर्शक व्यक्ती पण साधी रहाणी.

विनम्र श्रद्धांजली !
चीन बद्दल खरे बोलून खुप टिका झेलली.....>>>> चीनबद्दल ते बोललेले खरेच आहे. चीन विश्वासघातकी देश आहे.

श्रद्धांजलीचा धागा आहे याचे भान ठेवून लिहित आहे. फर्नांडिस आणि ठाकरे दोघांनीही मुंबई बंद पाडली. पण "मुंबई बंद पाडणे" हि कौतुकाची गोष्ट आहे अशा अर्थाचे प्रतिसाद वर आलेले आहेत. ते योग्य वाटत नाही. नेतृत्वाचे थोरपण ते काय बंद पाडू शकत होते ह्यावर ठरवले जाऊ नये.

>>नेतृत्वाचे थोरपण ते काय बंद पाडू शकत होते ह्यावर ठरवले जाऊ नये.<<
मुद्दा पटला. पण राजकिय पक्ष/नेते यांची ताकद त्यावरुनच ठरवली जाते/जायची. बंद यशस्वी करण्यात त्या नेत्याचा लोकाश्रय दाखवण्याचा उद्देश असायचा. मग ते आपल्याला आवडो किंवा न आवडो...