म्हाडा लॉटरी मधील नाव बदल करण्यास कोणी मदत करेल का?

Submitted by मया on 19 January, 2019 - 01:25

माझ्या बायकोला लग्नापूर्वी म्हाडा लॉटरी मध्ये फ्लॅट लागला होता त्याचे आता सर्व हौसिंग लोन पूर्णपणे संपलेलं आहे परंतु आता माझ्या बायकोला तीच नाव बदल करून घ्यायचं आहे (लग्नानंतरच). त्यासाठी काय करावे लागेल जेणे करून ते नावात बदल करून मिळेल तिच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत.
१)आधार कार्ड २) पॅन कार्ड ३)Marriage सर्टिफिकेट ४)रेशन कार्ड वर देखील नाव आहे

म्हाडा मधील नाव बदल करून घेण्यास काय करावे लागेल त्या बदल कोणी माहिती देऊ शकेल का.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हाडा ऑफिस कलानगर बाहेर एजेंट्स चा सुळसुळाट असतो,
त्या पैकी कोणीही तुम्हाला मदत करुन देऊ शकेल

टीपीकल म्हाडा वसाहतीत जे इस्टेट एजेंट्स असतात ते सुद्धा मदत करू शकतील

नमस्कार मया,
लॉटरी कुठल्या वर्षीची होती, तिचा संकेतांक क्रमांक , कुठला एरिया आणि कुठल्या category मध्ये लागली त्याचे डिटेल्स द्याल का? (पर्सनल मेसेज करून)
मी चौकशी करून सांगतो.