व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग ७ (क्रमश:)

Submitted by समई on 18 January, 2019 - 21:37

तिसऱ्या दिवशी म्हणजे हो ची मिन्हच्या शेवटच्या दिवशी गाईडने पहिले आम्हाला चायनीज बाजार मध्ये नेले.तिथेही अन्य ठिकाणच्या चिनी बाजाराप्रमाणे सर्व दुकाने वेगवेगळ्या वस्तूंनी खचाखच भरली होती.नकली झाडे ,फुले,वेगवेगळ्या दिव्यांची,कपड्यांची दुकाने होती.एक झाड फळांसकट अनपेक्षितपणे दिसले.आपण विशेष हे स्वयंपाकात वापरत नाही,ह्याला करंबळ( हिंदीत कमरक)म्हणतात.
20190117_114850.jpg
मग गाईडने आम्हाला पायीच जवळच्या चिनी मंदिरात नेले.तिथे जाताना एक माणूस उसाचा रस विकणारा दिसला. अर्थात आम्ही थांबून व्हिएतनामी उसाचा रस प्यालो.आपल्याकडे मिळतो तसाच गोड पण थोडा पातळ होता
IMG-20181209-WA0114.jpg
मंदिर एका चिनी समुद्री देवता माझुचे होते.देवळाच्या छतावर पोर्सलींनच्या सुंदर मूर्ती होत्या.तिथे टांगलेल्या कोनाच्या आकारातल्या जळत्या उदबत्त्या पाहून गंमत वाटली
IMG-20181209-WA0111.jpg
माझू मंदिर
माझू देवी
20190117_114323.jpg
जळत्या टांगलेल्या उदबत्त्या
IMG-20181209-WA0108.jpg
बाहेर पडल्यावर लगेच रस्त्यावर सामान विकणाऱ्या मुलींनी घेरले.विशेष म्हणजे त्या भारतीय नोटा घेत होत्या.अगदी 100 रुपीज,200 रुपीज म्हणत होत्या.म्हणून पहिल्यांदाच तिथेआपल्या नोटा देऊन खरेदी झाली.तिथेच रिक्षेवाले उभे होते.तिथे रिक्षाला मागून सायकल जोडलेली असते.
तिथे असलेल्या व्हिएतनामी रिक्षा,माझे मिस्टर बसलेत आणि दीर रिक्षेवाला
IMG-20190117-WA0019.jpg
जेवणाची वेळ झाली असल्यामुळे आज गाईडने आम्हाला तंदूर नावाच्या भारतीय restaurant मध्ये नेलेIMG-20181209-WA0102.jpg

हे आमचे व्हिएतनाम मधले बाहेरचे पहिले भारतीय जेवण होते.इथे इतरही भारतीय लोक दिसले.असली पंजाबी अगदी लस्सीसकट जेवण जेवलो.
नन्तर आम्ही तिथले प्रसिद्ध war remanant museum
पहायला गेलो.हे म्युझियम १९७५साली बांधले.ह्या मध्ये अमेरिकेने युद्धात वापरलेली विमाने,शस्त्रे,बॉम्ब,बंदुका आणि अशीच बरीच अस्त्रे शस्त्रे आहेत.त्याबरोबर युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांचे ,लहान मुलांचे,कुटुंबांचे फोटो आहेत.
आज इथली तिसरी पिढीही रासायनिक हल्याचे दुष्परिणाम भोगत आहेत.कू ची tunel च्या भागात मी युध्दाबद्दल सविस्तर माहिती दिलीच आहे.इथल्या सौव्हेनिअरच्या दुकानात अशी रासायनिक हल्यात मारली गेलेली,किंवा जखमी झालेल्या लोकांची तिसर्या पिढीतली मुले काम करतात.ती मुले अजूनही ते दुष्परिणाम भोगत आहेत हे सर्व पाहिल्यावर अगदी खिन्न मनाने आपण बाहेर पडतो.आम्ही इथल्या व्हिएतनामी नागरिकांना विचारले की तुमचा अमेरिकेवर राग आहे का?तेंव्हा त्यांनी उत्तर दिले नाही,आम्ही केंव्हाच त्यांना माफ केले आहे.
IMG-20190118-WA0022.jpg
हा एक फोटो आहे,सैनिकांनी त्यांना मारण्याच्या आधीचा,त्यांच्या डोळ्यातले भीतीचे भाव अंगावर काटा आणतात
IMG-20190118-WA0016.jpgIMG-20190119-WA0012.jpg
ह्या फोटोत ही रासायनिक हल्याच्या परिणामाची तिसरी पिढी

तिथून आम्ही Reunification palace पहायला गेलो.हे हो ची मिन्हच्या मध्यवर्ती भागात आहे. दक्षिण व्हिएतनामी राष्ट्राध्यक्षांचे घर नि ऑफिस युद्धाच्या वेळेस इथे होते. उत्तर व्हिएतनामी सैन्याचा रणगाडा इथल्या गेटमधून आत घुसला आणि उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम युद्ध संपले असे जाहीर करण्यात आले.त्यामुळे ही वास्तू युद्ध समाप्तीचे प्रतीक आहे.IMG-20190119-WA0013.jpg
ह्यानन्तर आम्ही शॉपिंगला मुख्य बाजारात गेलो.तिथे हुआ पण पोचली.तिने व्हिएतनामी भाषेत भाव कमी करवून आम्हाला खरेदी करण्यात मदत केली.इथे सर्व वस्तू फळे,भाज्या ,कपडे,इतर अन्य किराण सामान मिळत होते.तेवढ्यात मला व्हिएतनामी चिंच आठवली.हुआच्या सासूने
माझ्याकडे आल्या असताना मला दिली होती.आपल्या कडची चिंच अगदी आंबट असते,पण ही चिंच चवीला अगदी गोड असते. त्यामुळे त्याचीही खरेदी झाली.
IMG-20190119-WA0016.jpg

मग हुआ सगळ्यांना मनिषच्या ऑफिस मध्ये घेऊन गेली.मानिषचे ऑफिसही प्रशस्त आहे.हुआ पण मानिषला ऑफिसमध्ये मदत करते.
तिथून आम्ही घरी परतलो.आजची आमची इथली शेवटची रात्र होती.उद्या सकाळी हनोईला निघायचे होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान माहिती ...आपल्या जवळच्या देशावर साधारण समान संस्कृती व्हा प्रभाव जाणवतो .....रासायनिक हल्ल्याचे दुष्परिणाम भोगणारी तिसरी पिढी पाहून सुन्न व्हायला होते .....वाट पाहतोय नवीन लेखाची !!!