असा अचानक समोर येतो विचार एखादा

Submitted by मी अभिजीत on 31 March, 2009 - 06:09

वैभव जोशी यांच्या सुंदर गझलेचं हे स्वैर विडंबन. (वैभवची क्षमा मागून)
मूळ गझल इथे वाचा..!

असा अचानक मनात येतो विचार एखादा
मिळेल का सासरा कुणी सावकार एखादा

किती किती जायचे तडे बंद तावदानांना
समोरच्याने लगावताच षटकार एखादा

कधी कधी वाकतात मूर्खापुढे शहाणेही
असेल का त्यातलाच हाही प्रकार एखादा

अजून महिना सरायला वेळ केवढा आहे
कसा मिळावा मला अगोदर पगार एखादा

उगाच बिलगून एवढेही रडू नको वेड्या
करेल अपुल्याबद्दल भलता प्रचार एखादा

उगाच शोधत बसू नको त्या चुकार अर्थाला
हजार शब्दात येत असतो "भकार" एखादा

कधीतरी लोक बंड करणार बाटलीसाठी
कितीक डे ड्राय नुसते ढकलणार एखादा

-- अभिजीत दाते

मूळ गझल -- असा अचानक समोर येतो विचार एखादा
गझलकार -- वैभव जोशी

गुलमोहर: 

Lol सहीच

छान.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

मी माझत्वं घालवु शकत नाही.<<< माझं त्वं कसं असेल ? काहीतरी घोळ होतोय तुमचा Happy

मस्त विडंबन... Happy
षटकार, पगार भकार एकदम आवडले...