दुधाचे पांग

Submitted by mrunal walimbe on 17 January, 2019 - 11:10

सुजाता हाँलच्या एका कोपऱ्यात बसली होती. तसं फारसं कुणाचं तिच्या कडे लक्ष नव्हतं. तिला त्याचं फारसं काही वाटतं नव्हतं. तिला मात्र मनोमन खूपं समाधान वाटतं होतं.त्या समाधानाने तिचा चेहरा खूपं खुलला होता.
सुजाता लहान असताना चं तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. तिच्या आईला करिअर करायचे असल्याने अन् या छोट्याशा गावातं तिचा जीव घुसमटत असल्याने तिला शहरात जायचे होते.परंतु उच्च शिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अन् दुग्धव्यवसाय करण्याकडे तिच्या बाबांचा ओढा होता. तसं तर त्यांनी लग्नाच्या वेळेस तिच्या आईला सांगितले होते. परंतु तिला वाटले होते एवढा शिकलेला माणूस प्रगती करायची म्हणून इथून बाहेर पडेलचं .... तिची ही अटकळ अगदीच फोल ठरली... अन् मग ती सुजाताचाचं सारखा रागराग करु लागली.... अखेर घटस्फोट झाला चं आता प्रश्न सुजाताचा होता. कारण तिच्या आईला करिअर मधे तिचे लोढणे नको होते अन् तसंही सुजाताला बाबांचाचं जास्त लळा होता.
अशा अडचणीच्या वेळी सुजाताची आत्या पुढे आली. गावातचं असल्याने ती म्हणाली भाऊ मी करीन हिचं सगळं तू काही काळजी करु नकोसं. खरं तर आत्याचं घर मोठ्या खटल्याचं होतं. तिची तीनं मुलं, तिची धाकटी नणंद,धाकटा दीर अन् कमवणारा एकटा माणूस म्हणजे आत्याचे यजमानं. पण त्यांनीही सुजाताला आपलं म्हणलं ते तर म्हणले आमच्या तिघांत ही चौथी...
हळूहळू सुजाता बाकीच्या भावडांबरोबर मोठी होत होती. दिवसामाजी वाढत होती. बाकीच्या भावांत ही एकचं बहिणं म्हणून खूपचं सगळ्यांची लाडकी होती. त्यातचं तिचा मोठा दादा पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला. तिला वाटलं त्यानं इथेच राहून शिक्षण केलं असतं तरं.. मग तिला आत्यानेचं समजवले की अग तो हुशार आहे त्याला त्याची भरारी घेऊ दे आज त्याला आपण मागे ओढणे बरोबर नाही. ...
तीही दहावी झाली तिला पुढे शिकायचे होते पण गावात काँलेज नसल्याने तिलाही शहरात चं पुढच्या शिक्षणासाठी जावे लागले पण त्या दिवशी तिने निर्धार केला की या गावात एक चांगले काँलेज बांधायचेचं.
तिचे शिक्षण पूर्ण होताहोताचं तिचा मोठा दादा परदेशी गेला उच्च शिक्षणासाठी. ती ही सायन्स graduate झाली. तिला microbiology मधे पीएचडी करायची होती पण आधी तिला तिचं गावातल्या काँलेजचं स्वप्न खुणावतं होतं . गावी गेल्यावर तिने तिच्या बाबांना आपली जी बंजर जमीन आहे त्यावर काँलेज उभारायचा मानस असल्याचे सांगितले. बाबांना खूप भरून आले आपली मुलगी इतकी मोठी झाली की समाजासाठी काहीतरी करु पाहते आहे. ते म्हणाले तुझं स्वप्न सत्यात उतरवण्याची जबाबदारी माझी. डेअरी तल्या एक दोघांना हाताशी घेऊन हे काम पूर्ण होईल.
आता तिला पीएचडी चे वेध लागले होते.मग तिने काँलेजातं जाऊन तिला कोणं professor मिळणारं याची छाननी केली अन् तिच्या समोर एक भयंकर सत्य आले. तिला ज्या professor मिळाल्या होत्या तिच्या thesis साठी त्या दुसऱ्या कोणी नसून तिचीचं आई एकेकाळी तिला टाकून जाणारी... ती फारच हिरमुसली तरीही तिने त्या बदलून मिळतील का याची चौकशी केली पण दुर्दैवाने तसं काहीच होऊ शकतं नव्हतं... तिने दोलायमान परिस्थितीतं आत्याला फोन केला... आत्याने तिला धीर दिला की शेवटी ती तुझी आई आहे सत्य आपणं नाही नाकारु शकतं नाही बाळं पण तू मात्र तुझ्या अभ्यासा शिवाय जास्त काही बोलूचं नको. तुला पीएचडी झालेलं बघण्याचं भाऊचं स्वप्न आहे हे विसरू नकोसं.
तिने जोरदार अभ्यास करून thesis लिहिला. चार प्रोफेसरांसमोरं आत्मविश्वासाने सादर केला अन् तो सुंदर दिवस उजाडला ज्या दिवशी तिला पीएचडी मिळण्याचा कार्यक्रम होता. तिची आत्या अन् बाबा दोघेही आले होते.जेव्हा तिला पीएचडी degree मिळाली तेव्हा तीची आई खूप अपेक्षेने तिच्या कडे बघत होती. परंतु तिने तीचा उल्लेख फक्त professor guide असा केला. नतंर समारंभ संपल्यावर तिचे आई बाबा आत्या सगळे समोरासमोरं आले. तिची आई म्हणाली पूर्वीच्या चं आढ्यतेपणाने सुजाता अगदी माझ्या सारखीचं हुशार आहे.अन् शेवटी तिनेही पीएचडी ला माझाचं विषय निवडला. तसं कुणी काही बोलायच्या आतं सुजाताचं पटकन म्हणाली हो माझा subject जरी तुझाचं असला तरी ही माझी आत्युचं माझी खरी आई आहे. ...
आज तिच्या गावातल्या तिने उभारलेल्या काँलेजचा उद्घाटन सोहळा होता. तिने खूप काळजीपूर्वक सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर मंडळीना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. तिच्या आईलाही तिने आमंत्रण दिले होते.परंतु उद्घाटन कोणाच्या हस्ते ते मात्र तिने गुलदस्त्यात चं ठेवले होते.आणि आता काहीच क्षणात कार्यक्रमाला सुरवात होणार होती. कार्यक्रमाची सुरवात तिच्या वडिलांनी दिप प्रज्वलन करून झाली.थोडी फार मातब्बर लोकांची भाषणे झाल्यानंतर ती स्टेजवर गेली अन् तिने उद्घाटनाची फितं कापण्यासाठी आत्याला स्टेजवर बोलावले अन् खूप साऱ्या भुवया उंचावल्या गेल्या....
सुजाताने बोलावयास सुरवात केली अन् सगळा हाँल तिचं हे करण्यामागचं कारणं जाणून घेण्यासं उत्सुक होता. सुजाता म्हणाली मी अवघी पाच वर्षाची असताना माझी आई मला सोडून गेली पण या माझ्या आत्युनेचं मला यशोदेसमं हाडाची काडे करून वाढवले. याच बाईने तिच्या घरच्या adverse परिस्थिती तं नुसतं साभांळलं नाही तरं आईचं प्रेमही दिलं जिने जन्म न देताचं जन्मदात्रीची भूमिका निभावली आणि त्यामुळेच जन्मदात्रीच्या नाळेपेक्षा सांभाळ करणाऱ्या या यशोदामाईच्या दुधाचा रंग खरा ठरला म्हणूनच या प्रसंगी मला तिला हा बहुमान द्यायचा होता इतकचं...
सगळा हाँल उभा राहून टाळ्यांचा कडकडाट करत होता अन् तिच्या आत्युच्या डोळ्यांना जलधारा लागल्या होत्या....

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान !

तुमच्या कथा नायिकप्रधान असतात आणि खलनायक पण स्त्री असते, पुरुषद्वेषा कथा नसतात तुमच्या... अवडली ही पण !

तुम्ही त्या गृहशोभिका वगैरे मासिकात लिहता काय ओ?

आत्याच्या हुशार मुलाला शहरात, परदेशात जाऊन भरारी घेऊ द्यावी, सुजातालादेखील शहरात जाऊन पीएचडी करू द्यावी पण सुजाताच्या हुशार आईलामात्र हे सगळे करायला बंदी आहे कारण तिने लग्न करायची आणि मुल जन्माला घालायची 'चूक' केली आहे.
पण तेच जर सुजाताच्या वडलांना शहरात जाऊन शिकायचे असते तर ते बायकोमुलीला गावात ठेऊन स्वतः एकटे शहरात जाऊ शकले असते. कुटुंब हे काही त्यांच्या पायातली बेडी झाली नसती!

हां मुलाने स्पष्टपणे 'मी गावातच राहणार आहे' हे सांगितलं असताना पुढे विचार बदलेल असे अझ्युम करून लग्न केले ही सुजाताच्या आईची चूकच झाली म्हणा.
पण समजा जर उलटं झालं असत की मुलीला गावातच राहायचं होत मुलानेदेखील तेच लग्नाआधी सांगितलं आणि लग्नानंतर काही वर्षांनी तो शहरात जायचं म्हणू लागला तर?

बरं अन एवढा लळा असलेल्या बाबांनीतरी कुठे सुजाताला सांभाळले आहे? बहिणीकडे आणि तिच्या नवऱ्याकडेच देऊन टाकले ना?

> माझा subject जरी तुझाचं असला तरी ही माझी आत्युचं माझी खरी आई आहे. > अन् मामाच माझे खरे बाबा आहेत हेपण हवं पुढे....

अन हे 'दुधा'चे पांग कसे झाले? आत्याने दूध पाजलंयका सुजाताला?
आता पुढचा लेख गाई, म्हशीच्या झालंच तर बकरी, गाढव, उंटाच्या दुधाचे पांग सगळ्या मनुष्यप्राण्यांनी कसे फेडायला हवे यावर येऊद्या.

ती ही सायन्स graduate झाली. तिला microbiology मधे पीएचडी करायची होती >> ग्रॅजुएशन नंतर लगेच पी एच डी करता येत नाही. आणि ती पूर्ण होणे पण इतके सहज सोपे नाहीये.
थोडी माहिती घेवून लिहीत जावे.

लिहीत रहा Happy

अवो झक्कास पोस्ट graduate म्हणायचं असेल त्यांना. लगेच काy हडकवताय त्यांच्यावर... माफ करा की नवीन लेखकाच्या चुका

च्रप्स, पोस्ट ग्रॅजुएशन नंतर पण लगेच पी एच डी करता येत नाही. नको त्या चूकांसाठी पांठींबा देवू नका.

अशा चूका माफ करणे म्हणजे काय? चूकीच्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचे का? तुम्हीच द्या मग.

ही माझी ह्या कथेवर शेवटची पोस्ट!