तू माझ्या आयुष्यात-कविता

Submitted by बिपिनसांगळे on 16 January, 2019 - 12:26

तू माझ्या आयुष्यात
ठेविले पाऊल पहिले
तूच माझी दुनिया आता
मागे सारे जग राहिले

शांत रानातली
वाऱ्याची सळसळ
कि आषाढातली
तू धोधो कोसळ

जरी असे अजाणता
आयुष्य तुजसी वाहिले
तू माझ्या आयुष्यात
ठेविले पाऊल पहिले

असो सहवास हा
तुझिया विभ्रमांचा
मीपणा जावो अंता
फुगा फुटो भ्रमांचा

येवो अर्थ सहजीवना
आधी एकांत किती साहिले
तू माझ्या आयुष्यात
ठेविले पाऊल पहिले
-------------------------
बिपीन सांगळे

Group content visibility: 
Use group defaults

मीपणा जावो अंता
फुगा फुटो भ्रमांचा
या ओळींत विरोधाभास वाटला मला. भ्रम नेमका काय झालाय? दोन्ही बाजूंनी प्रेम/ओढ आहे तर मीपणा मध्ये कसा काय आला. बाकी सुंदर रचना. कोसळ शब्द खासच. तुमच्या गद्य लेखनाच्या प्रतिक्षेत.

मन्या
अजय चव्हाण
खूप आभारी आहे

माझी कविता असं नाही तर
माबो वर कवितांना एकुणात प्रतिसाद कमी दिला जातो

जे फक्त काव्यलेखन करतात , त्यांनी तरी इतर कवींना प्रतिसाद द्यावा असं मला मला वाटत .
चुकत असेल तर क्षमा असावी

प्रतिसाद कधी कधी लेखनासाठी ऑक्सिजनसारखं काम करत असत.त्यामुळे बिपिनदा तुमचं काही चुकतंय अस मला तरी वाटत नाही. Happy