केस नं. तीनः दोन मित्र

Submitted by संदीप डांगे on 16 January, 2019 - 01:09

केस नं. तीनः दोन मित्र

अजय अतुल दोन सख्खे मित्र. लहानपणापासून एकत्र वाढलेले, एकाच शाळेत शिकले. एकाच कॉलेजातून पदवीधर झाले. पुढचे उच्चशिक्षणही एकत्रच केले आणि एकाच बँकेत दोघेही मोठ्या हुद्द्यावर नोकरीस लागले. मनासारखा, प्रचंड पगार दोघांनाही. लाइफ तो जैसे सेट हो गयी. ह्याचा दोघांनाही मनस्वी आनंद झालेला. आता जरा हायफाय लाइफ जगू शकतो असा कॉन्फिडन्स आला. ही लाइफ एन्जॉय करायची दोघांनी ठरवले. दर महिन्याला एकदा कोण्यातरी फाइवस्टार हॉटेलमध्ये जाऊन दोघांनी फस्सक्लास डिनर करावा असे ठरले.

पहिल्या महिन्याला ते डिनरला गेले. मनासारखे खाऊन पिऊन झाल्यावर बिल आले. अजयने आपले वॅलेट काढले आणि झर्रकन क्रेडिट कार्ड काढून वेटरला दिले. वेटरने स्वाइप मारुन जे काही तीन साडेतीन हजार बिल झाले ते कॅश करुन घेतले.

दुसर्‍या महिन्याला असेच आणखी एका ठिकाणी दोघे डिनरला गेले. तेव्हा अतुलने आपले कार्ड सफाईने वॅलेटमधून काढले आणि स्वाईप करुन जी काही तीन साडेतीन हजार रक्कम झाली ती देऊन टाकली. दोघेही बँकेत होते. बँकेने दोघांना भरपूर मर्यादेचे क्रेडिट कार्ड दिलेले होते.

असेच एक दोन महिने आणखी गेले. एकदा डिनरला अजयची बिल द्यायची पाळी होती. त्याने वॅलेट काढले तर त्यात क्रेडिट कार्ड नव्हते. मग त्याला आठवले की तो घरीच विसरुन आला आहे. तेव्हा अतुलने त्याला म्हटले, "त्यात काय झाले, मी देतो बिल माझ्या कार्डने..." पण अजयने त्याला नको म्हटले आणि त्याच्याजवळ असलेल्या रोख नोटांनी त्याने बिल चुकते केले.

पुढच्या महिन्यात अतुलने अजयला विचारले की आज कोणत्या हॉटेलला जायचे?, त्यावर अजय म्हणाला, नको यार. नको जाऊया. अतुलला वाटले की मागच्या महिन्यात क्रेडिट कार्ड नसल्याने बिल देण्यावेळी ह्याला ओशाळवाणे वाटले असावे म्हणून नाही म्हणत असावा. त्याने तसे विचारले. तर अजय म्हणाला, "नको रे... काय दर महिन्याला इतके पैसे घालवायचे. खूप पैसे जातात यार..."

---- अजयमध्ये अचानक हा बदल का घडला?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फक्त अजयमध्येच नाही तर माझ्यामधेही बदल घडलेला आहे. क्रेडिट कार्ड ने पेमेंट करताना त्या वेळेला अक्चुअली अकाउंट मधून पैसे कट होत नाहीत. क्रेडिट कार्ड चे बिल पे करताना त्याची आठवण येते.दोन तीन वेळेला क्रेडिट कार्डचे बिल पे केल्यावर अजयला खर्च होणाऱ्या पैशांची झळ पोहोचते. आणि जेव्हा क्रेडिट कार्ड नसताना रोख नोटांनी बिल पे केल्यावर एका वेळच्या जेवणासाठी तीन साडेतीन हजार हि रक्कम खूप मोठी आहे हे समजते कारण त्याच्या पाकिटातून ते पैसे तेव्हा वजा झालेले असतात. बायकोबरोबर शॉपिंग ला जाताना मी बहुतेक वेळेला क्रेडिट कार्ड घरीच ठेवतो Happy

अमेरिकेच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलत कि हो तुम्ही !... २००८ च्या आर्थिक संकटांनंतर अमेरिकेत अनेक "आर्थिक सल्लागार" आता सल्ला देऊ लागले कि कार्ड न वापरता कॅश द्या. आणि कॅश बाळगायची नसेल तर डेबीट कार्ड वापरा, क्रेडीट कार्ड वापरू नका.
"अदृष्य" स्वरुपात पैसे देत राहिल्यामुळे आवकेपेक्षा जावक जास्त आहे हे अनेक अमेरिकनांना कळतच नाही. मोठ्या खरेदीच्या वेळी "मला परवडत नाही" असे म्हणल्यास लगेच "सुलभ हफ्त्यात" पैसे द्यायची सोय उपलब्ध असते. आणि असे अनेक हफ्ते साठले कि उधारीचे पैसे देण्यासाठी उधार घ्यायची वेळ येते.
गंमत म्हणजे, तुम्हाला खरच कर्ज हवे असेल तर तुमची पात्रता तुमच्या खात्यातल्या शिल्लकी वरून नाही तर तुमच्या "घेतलेले कर्ज परत करण्याच्या इतिहासावरून" ठरते (अर्थात क्रेडीट हिस्टरी). म्हणजे ५०,००० चे कर्ज घ्यायला गेल्यास, तुमच्या बचत खात्यातील ५०,००० हजाराला (तारण म्हणून) अर्थ नसतो किंवा मी एवढे पैसे साठवू शकतो ह्या म्हणण्याला अर्थ नसतो. कारण ते म्हणतात तुम्ही तुमचे ५० आणि आमचे ५० घेऊन पसार झालात तर? मग तुम्ही आधी एखादे कर्ज परत केले आहे का असे विचारतात आणि तसे नसल्यास दणदणीत व्याज लावतात. (हे स्वानुभवाने सांगतोय बर का)
त्यामुळे अनेक वेळा बरेच अमेरिकन आई वडील मुलं सज्ञान झाली कि त्यांच्या नावाने क्रेडीट कार्ड काढतात आणि कसलेतरी कर्ज घेऊन त्यावरून हफ्ते भरत रहातात म्हणजे मुलांची क्रेडीट हिस्टरी तयार होते. तसे नसल्यास मुले स्वतंत्र झाल्यावर एक दोन छोट्या खरेद्या (जसे कि फर्निचर, टीव्ही, फ्रीज) कर्ज घेऊन करा आणि ते वेळेत फेडून टाका असे सांगतात. म्हणजे हिस्टरी तयार होते आणि मोठे कर्ज घ्यायची वेळ येते तेव्हा उपयोगी पडते.
आता मला सांगा, (अमेरिकेतल्या) अजयने क्रेडीट कार्ड का वापरु नये?

क्रेडिट कार्ड ने आपल्या नकळत खूप खर्च होतो
हे खरे आहे. स्वानुभवातून सांगतेय हे (तरी शॉपिंग चे व्यसन सुटत नाही)☺️

पुढील केस टाका...
उत्सुकता आहे सगळ्या गोष्टी एकात कश्या गुंफणार आहात हे जाणून घ्यायची

नोटा/पैसे जेव्हा म्हणजे स्पर्श करून जातात. तेव्हा त्याची किंमत जास्त कळते.
आणखी एक म्हणजे पैसे गेल्यावर बँक अकाऊंट मध्ये सेव्हिंग बघितले गेले असेल . एटीमवर परत थोडे पैसे काढायला गेल्यावर.
इथे जवळ कॅश ठेवण्यासाठी काढली असेल तर महिनोन महिने ती तशीच वॉलेट मध्ये रहाते. त्यामुळ जवळची कॅश संपल्यावर बरेच दिवसानी कॅश काढायला गेला असेल तो.