नियतीपुढे जिद्द चं श्रेष्ठ

Submitted by mrunal walimbe on 13 January, 2019 - 06:46

अनघा खूपच versatility घेऊन जन्माला आली होती. तिच्या कडे असलेल्या वेगवेगळ्या गुणांमुळेच ती सर्वांची लाडकी होती चं अन् सर्वांना हवीहवीशी सुध्दा वाटायची.भगवंताच्या दरबारी सर्वगुणसंपन्न असा कोणीचं नसतो काही तरी त्याच्यातं वैगुण्य असतेचं.तसचं अनघाच्या बाबतीत सुध्दा होतं या तिच्या हरहुन्नरी असण्याला एका छोट्या वैगुण्याची काळी किनारं होती. ती स्पष्ट बोलू नाही शकायची. तिची जीभ लहानपणापासून चं जड होती.तिच्या आई वडीलांनी खूपं speech therapy, doctor असे प्रयत्न करुन पाहिले होते पण त्यांना यश मिळाले नव्हते.शेवटी तिला कळायला लागल्यापासून तिनेचं आई बाबांना समजावले होते की तुम्ही माझ्या बोलण्याची चिंता सोडा मी बोलता येत नाही म्हणून अडून बसणाऱ्यातली नाही तर माझ्या लिखाणातून अन् कृतीतून चं मी इतकी मोठी होईन की सगळी दुनिया माझं कौतुक करेल. माझी ही जिद्द आहे बघालचं तुम्ही...
ती शालेय शिक्षणातं खूप हुशार होती. खरं तर या नामांकित शाळेत अँडमिशन मिळवण्यासाठी तिला खूप झगडावे लागले होते. शाळेच्या अँडमिशन interview ला ती अडखळत बोलते हे तिथल्या बाईंच्या लक्षात आले होते त्यामुळे चं त्यांच्या मते या शाळेत तिला अँडमिशन दिली तर इतर मुले तिची खिल्ली उडवतीलं आणि मग ती frustrate होईल. पण तिच्या वडिलांनी खूप request केली तेव्हा त्यांनी तिला अँडमिशन दिली या अटीवर की तिने परिक्षेत चांगले मार्कस् मिळवले पाहिजेत. ती उत्तम चित्रं काढायची.तिचे निंबध हे शाळेतील इतर वर्गातून वाचून दाखवले जायचे तिची् स्मरणशक्ती जबरदस्त होती आणि ती एकपाठी होती त्यामुळे चं ती जेव्हा दहावीला बोर्डातं आली तेव्हा शाळेत सत्कार च्या वेळेस मुख्याध्यापिका बाईंनी तिचे विशेष कौतुक केलं होतं अन् म्हणाल्या होत्या तुला या शाळेत अँडमिशन देताना मीचं घातलेली अट तू अगदी तंतोतंत पूर्ण केली.
त्यानंतर ती काँलेजमधे गेली सायन्य घेतले. तिला डॉ क्टर होऊन रिसर्च करायचा होता. त्यामुळे चं तिने MBBS झाल्यावर त्याची शोधाशोध सुरु केली.तेव्हा तिला पँरिसमधील एका काँलेजमधे फेलोशिप वर अँडमिशन मिळाली. तिच्या रिसर्च चा विषय हा तिच्या जीवनाशी फारच निगडीत होता. कारण तिने speech therapy मधेचं रिसर्च करायचे ठरवले होते. तिला स्वतःच्या वैगुण्यावर मेडीसन किंवा उपाय असे काहीतरी शोधायचे होते.
दरम्यानच्या काळात तिचे आई वडील म्हातारे झाले होते. वडील तर तिच्या विचारांनी खूपचं खचले होते.आपली मुलगी एवढी हरहुन्नरी असूनही एखाद्या नाँर्मल मुलींसारखं आयुष्य जगू शकत नाही याची त्यांना फार खंत वाटायची. त्यामुळे चं खरं तर त्यांना दोन हार्ट अँटक येऊन गेले होते. ती वडिलांना खूप समजावायची पण त्यांच्या मनातील भिती insecurity ती कशी कमी करणारं होती ना...
तिच्या रिसर्च ला आता दिशा सापडली होती असं म्हणेपर्यंत चं तिचे बाबा गेले.. शेवट नियतीने आपला डावं साधला होता. ती भारतात आली. वडिलांचे सर्व क्रिया कर्म उरकल्यावर तिने आईला आपल्याबरोबर पँरिसला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला

आज तिला हे सारे जुने आठवतं होते.जेव्हा तिच्या रिसर्च ला मान्यता मिळाली होती अन् त्याचा चं हा समारोह होता. तिने साऱ्या slide show द्वारे आपला रिसर्च जगातील दिग्गज लोकांसमोर ठेवला अन् त्याला मान्यता मिळाली होती. ती खूपचं आनंदातं होती. अन् जेव्हा तिच्या चं क्षेत्रातील दिग्गज सरांनी तिचे नाव पुकारले डॉक्टरअनघा great work done Congratulations now each and every child who has difficulty in talking can talk clearly because of your research. Bravo my child. तिला काय बोलावे ते सुचतं नव्हतं तिने फक्त भारतीय संस्कृती प्रमाणे त्यांना वाकून नमस्कार केला अन् समारंभाला आलेल्या आईला जाऊन घट्ट मिठी मारली.
त्याचं रात्री तिने आईला सांगितले की आपणं भारतात परत जातो आहोत.
भारतात परतल्यावर तिने पहिल्यांदा आपल्या जुन्या MBBS ला शिकवायला असणाऱ्या डॉक्टरांची भेटं घेतली. त्यांना रिसर्च बद्दल सांगितल्यावर त्यांनी तिला तिथल्या एका मोठ्या हाँस्पिटल च्या डीनना भेटण्याचा सल्ला दिला.
नंतर काही चं दिवसातं तिने त्या चं हाँस्पिटल मधे सरकारी मदतीने एक विनामूल्य speech therapyचं नवं दालन चालू केलं. ज्या गोरगरिबांच्या मुलांना जीभ जड असल्यामुळे बोलता येत नाही अशांना डॉक्टर अनघा आपल्या नवीन रिसर्च च्या speech therapy ने बऱ्याकरु लागल्या.
आणि दोन वर्षांनी तिने अशा अडखळतं बोलणाऱ्या मुलांसाठी special school चालू केले अन् त्याच्या उद्घाटनाला तिच्या लहानपणी च्या शाळेतील मुख्याध्यापिका बाईंना बोलावले.
त्यांना तर तिचे हे सारे काम बघून भरून आले त्या म्हणाल्या मानलं तुला मी अनघा तू जिद्दीने तुझ्या वैगुण्यावर मात नाही केलीसं उलट अशा इतरांना एक मायेचा आपुलकी चा दिलासा तर दिलासचं आणि कणखरपणे भक्कम आधार देऊन बरा करण्याचा सुध्दा चंग बांधला... खरचं तू माझी विद्यार्थिनी आहेसं याचा मला फार अभिमान वाटतो.
तिने शाळेच्या आँफिसात बाबांचा फोटो लावला अन् हार घालताना ती बाबांना म्हणाली बघा बाबा तुमची अनु किती मोठी झाली जरी बोलता आलं नाही तरी तिने आज समाजात स्वःतचे स्थान निर्माण केले तुम्हाला promise केल्याप्रमाणे... अन् तिच्या डोळ्यातून आसवे गळू लागली.

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगलं लिहीलत Happy
पण अजून फुलवता आली असती कथा!