Submitted by द्वैत on 12 January, 2019 - 12:49
गोड पापा
होतो पहाटे गजर
चिऊ चिवचिव करी
आई दाणा देते तिला
मग घराला आवरी
सकाळची न्हाणीधुनी
एकापाठोपाठ होती
बाबा दादा ताई आजी
संगे न्याहरी करती
कसे आईला ठाऊक
कोणा काय आवडे ते
प्रत्येकाच्या साऱ्या वस्तू
त्यांना जागेवर देते
बाबा ऑफिसला गेले
दादा ताई कॉलेजात
थोडा वेळ आजीसंगे
आई बोलते निवांत
माझे नशीब चांगले
माझी शाळा उशिराची
आई झोपू देते मला
नको लुडबुड माझी
आता आवाज येईल
"उठ वाजले बघ किती"
बस शाळेची चुकेल
तिची रोजचीच भीती
भराभर उरकते
माझी शाळेची तयारी
मग उजळणी घेते
देते खाऊ काहीतरी
निघालो मी शाळेला की
माझे केस गोंजारते
दृष्ट काढते मग माझी
अन गोड पापा देते
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलंय! असं गोड गोड
छान लिहिलंय! असं गोड गोड वाचायला मिळणं आजकाल विरळ झालंय!
मस्तच वाटलं कवीता वाचून.
मस्तच वाटलं कवीता वाचून.
खुप छान कविता.
खुप छान कविता.
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद