हेल्मेट्सक्ती का नको?

Submitted by शरद on 11 January, 2019 - 07:51

हेल्मेट्सक्ती का नको?
दोहे

.......................................................
कबिराच्या दोह्यांच्या चालीवर म्हणा. मजा येईल!!
......................................................

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर एक.
सुन्दर मुखडे झाकले तर, झुरेल मग प्रत्येक
माणुस, झुरेल मग प्रत्येक!

हेल्मेटसक्ती का नको? कारण नंबर दोन,
मोबाइल आवडे मला, कसा करू मी फोन?
आता कसा करू मी फोन?

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर तीन.
डोक्यावरती भार किती, मला येतसे शीण,
त्यामुळे, मला येतसे शीण!

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर चार.
स्कूटर चालवताना मी नळी कशी फुकणार?
सिगारेट, नळी कशी फुकणार?

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर पाच.
सक्ती मी मानत नाही, नको कोणता जाच,
मजला, नको कोणता जाच!

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर सहा.
नजर वाकडी करू नये, सरळ दिशेला पहा,
आपण सरळ दिशेला पहा!

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर सात.
कसा पहावा मी त्याला, पोलिस करतो हात
थांबण्या, पोलिस करतो हात!

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर आठ.
कोण मला अडवू पाहे? मी इथला सम्राट,
दादा, मी इथला सम्राट!

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर नऊ.
केसांची स्टाइल बिघडे, उगाच तुमचा बाऊ,
भाऊ, उगाच तुमचा बाऊ!

हेल्मेट्सक्ती का नको? कारण नंबर दहा.
डोक्यामध्ये काहि नसे, फुटल्यानंतर पहा,
डोके, फुटल्यानंतर पहा!

Group content visibility: 
Use group defaults

आपण स्कूटर वापरायचीच नाही असे ठरवूनच टाकले आहे, लहानपणी!! म्हणून ,काही फरक पडत नाही; हेल्मेट सक्तीने ,आपल्याला तर!!!!!