मतपरिवर्तन

Submitted by mrunal walimbe on 10 January, 2019 - 00:28

सुश्मिता आज रोजच्या प्रमाणेचं देवीच्या देवळाच्या पायऱ्यांशी घुटमळली तसं तिचं आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं ती आपल्याचं विचारात होती .... अन् तिच्या आठवणी तिला चार महिने मागे घेऊन गेल्या.
कोल्हापूरच्या एका नामांकित वकील घराण्यातला सुश्मिता चा जन्म.गर्भश्रीमंत घरात जन्मल्यामुळे ती खूप लाडाकोडात वाढली, कधीही कसलीही तिला ददातचं नव्हती. तशी शाळेतही ती फारशी हुशार नसली तरी प्रत्येक वर्षात पास होऊन पुढच्या वर्षातं नक्कीच जायची. पण या व्यतिरिक्त तिच्यातं अभिनयाचं नकला करण्याचं खूप छान अंग होतं.दरवर्षी च्या गँदरिंगमध्ये मात्र ती स्वतः नाटकं बसवायची त्यातं कामही करायची आणि बेस्ट परफॉर्मन्स award ही मिळवायची. तिचं हे सगळं अवांतर गोष्टी करणं तिच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हतं..... पण तिची या अभिनयाच्या क्षेत्रातील passion तिला गप्प बसू देत नव्हती.
शाळा संपून ती जेव्हा काँलेजातं गेली तिथेही तिने हौशी कलाकारांनी चालवलेला एक ग्रुप शोधून काढला. अन् त्यामधून तिने नाटकांचे दिग्दर्शन लिखाण चालूचं ठेवले.
तिच्या बाबांच्या इच्छेप्रमाणे तिने चांगली वकील व्हावे असे होते. त्यामुळे BA ची degree मिळाल्यावर तिने पुण्यातल्या ILS Law काँलेज मधे प्रवेश घेतला.तिचा कोल्हापूरचा ग्रुप मागे पडला. पण पुण्याने तर तिला मोठचं व्यासपीठ दिलं. पुरषोत्तम करंडक सारख्या नामांकित स्पर्धेसाठी त्यांच्या काँलेज तर्फे तिने नाटक लिहिले दिग्दर्शित केले अन् त्यात काम करुन उत्कृष्ट दिग्दर्शनाचे बक्षीस ही मिळवले. या साऱ्या दरम्यान चं तिला वकीलीची सनद मिळाली पण त्याला आपलं profession मानून ती काही practice करण्यात अजिबात तयार नव्हती....
बाबांचा तगादा मात्र तिला शांत बसू देत नव्हता. पुरषोत्तम मुळे खूप दिग्गज लोकांशी तिचा चांगलाचं परिचय झाला होता.त्यातल्याचं एका नामवंत दिग्दर्शकाने तिला tv daily soup साठी कथा लिहिणार का म्हणून विचारले. खरं तर समोरून विचारणा झाली हे तिच्यासाठी बहुमानास्पद होते. ती काही ही निर्णय घेणारं इतक्यात तिच्या आईचा फोन आला होता आणि आईने तिला तातडीने कोल्हापूर ला बोलावले होते तिच्या बाबांना हार्ट अँटक आला होता....

तेव्हापासून सुश्मिता कोल्हापूरातच होती. आता या घटनेला चार महिने उलटले होते.परंतु आजारपणात तिच्या बाबांनी काही त्यांच्या जुन्या आठवणी तिला सांगितल्या होत्या. त्यामुळे चं ती इतकी सैरभैर झाली होती की रोजचं ती देवीच्या देवळात येऊन देवीला एकचं प्रश्न विचारे माझे कुठे चुकले अन् जुनं जे घडलं तसचं परतं घडेलं ही बाबांची अटकळ का?
सुश्मिताला खरं तर एक आत्या होती ती आता मात्र कुठे आहे हे कोणासचं माहीत नव्हते. हे सत्य ऐकून तर सुश्मिता चकीतचं झाली होती. तिची आत्या तिच्या चं सारखी उत्कृष्ट अभिनय करायची. हौशीने कोल्हापूरातचं प्रायोगिक रंगकर्मींबरोबर नाटकात कामं करायची.त्यातील चं एकाबरोबरं तिचं प्रेम जुळलं परंतु तो जातीबाहेरीलं असल्यामुळे सुश्मिताच्या आजी आजोबांनी व बाबांनी त्याला कडाडून विरोध केला...... आणि मग एक दिवस नाटकाच्या प्रँक्टिसला गेलेली तिची आत्या परत घरीचं आली नाही... ती गेली ते आजतागायत काही परतली नाही. तिच्यामुळे सुश्मिताचे आजोबा लोकांत तोंड दाखवायला जागा नाही या धक्क्याने गेले आणि तिच्या चं आठवणी ने झुरुन आजी गेली त्यामुळे चं सुश्मिताच्या बाबांच्या मनात नाटकअन् रंगकर्मी याबद्दल एक प्रकारचा कडवटपणा तयार झाला आणि त्यातूनच हा विरोधही.....
इतक्यात सुश्मिताला आपल्याला कोणीतरी बोलवतं असल्याचा भास झाला पण तो भास नव्हता खरोखरचं एक तिच्या आईच्या वयाची बाई तिला शुकशुक करत होती. तशी सुश्मिताने तिच्या कडे पाहिले अन् आपण आपलीचं छबी आरश्यात बघतं असल्याचाचं तिला भास झाला. तसं भांबावलेल्या तिला ती बाई म्हणाली कमलची मुलगी ना तू तशी सुश्मिताच्या लक्षात आले ही बाई आपल्या बाबांना चांगली चं ओळखतं असणारं कारण
सुश्मिताच्या बाबांची ज्यांच्याशी
घसट होती ते सगळेचं त्यांना आपुलकी ने कमलकांत ऐवजी कमलचं म्हणायचे... सुश्मिताने
मान डोलावली तशी तिचं म्हणाली मी तुझी आत्या अगदी माझचं रुपडं घेऊन जन्मलीसं गं.
सुश्मिता जरा स्तब्ध झाली आणि मनात काहीतरी योजून पटकन म्हणाली आत्या बाबा हाँस्पिटल मधे आहेत तू येतेसं का भेटायला तशी ती म्हणाली नको बाळ मला बघून चं तो त्रागा करेलं सुश्मिता म्हणाली नाही ग ते ICU तं आहेत आधी हार्ट अँटक आला अन् आता complication मुळे kidney failure झाल्यातं जर योग्य donor मिळाला तरचं वाचतीलं. तीने दोन मिनिटं विचार केला अन् तिच्या बरोबर असलेल्या ड्रायव्हरला काही तरी सांगितले...
त्या दोघी जेव्हा हाँस्पिटल ला पोहचल्या तेव्हा तिची आई खूपचं upset होती. डॉक्टरांनी शेवटचेचं काही तासं सांगितले तं जरं donor नाही मिळाला तरं तशी सुश्मिताची आत्या म्हणाली वहिनी मी कमलला kidney donate करते गं....
पुढच्या काही तासात चं सगळे डॉक्टरी सोपस्कार करुन kidney transplant झाले. आता फक्त सुश्मिताला बाबा शुध्दीवर येण्याची प्रतिक्षा होती... तिकडे तिच्या आत्याचे मिस्टर ही आले होते ती ही हळूहळू शुध्दीवर येत होती...
अन् अखेर तो क्षण आला की सुश्मिताचे बाबा शुध्दीवर आले अन् त्यांनी पहिला प्रश्न विचारला donor कोणं सुश्मिता काही बोलणारं इतक्यात तिच्या आत्याला तिचे मिस्टर wheelchair वरुन घेऊन दरवाज्यातं उभे होते.
अन् सर्वच मंडळींनी एकचं आवाज ऐकला कमल मी आलीये मला माफ कर रे आतातरी..
सगळेजणं स्तब्ध झाले होते सुश्मिताच्या बाबांनी सुश्मिताकडे प्रश्नार्थक पाहिले तशी सुश्मिताने होकारार्थी मान हलवली अन् दोघा बहिण भावडांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या अन् बहिण भावडांच्या अजब मिलाफाचा तो हृदयद्रावक प्रसंग मात्र तिथे उपस्थित साऱ्यांनीचं अनुभवला....
थोड्या वेळाने सुश्मिता ने त्या दोघांना आनंदाची बातमी दिली की दोघेही आता medically ok असल्यामुळे चार सहा दिवसांत discharge नक्की. तसे सुश्मिता चे बाबा तिला म्हणाले मग आता तू पुण्याला जायच्या तयारीला लागं तुला ती daily soup ची कथा लिहायची आहे ना त्यांना होकार कळवून टाकं . आता कर सुरवात लिखाणालाअन् शुभारंभाला मात्र आम्हांला सगळ्यांना बोलावं मी वाट बघेन हो...
सुश्मिताला दोन मिनीटे हे सारे स्वप्नवतचं वाटले आता आपली कथा खूप मोठ्या audience समोरं जाणारं अन् बाबांच्या आशिर्वादाने यातचं तिला भरुन पावलं होतं.
अन् तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले....

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दोघेही आता medically ok असल्यामुळे चार सहा दिवसांत discharge नक्की. >> बापरे किडनी ट्रान्सप्लांट नंतर लगेच घरी Sad
खुप मेजर ऑपरेशन असते. असे लगेच घरी सोडत अन नाहीत. घरी आल्यावर पण बरेच महिने त्रास होतो.

चांगली कथा लिहिली आहे. विशेषकरून कथासूत्र (Plot) खूप आवडले. प्रसंग निर्मिती सुद्धा चांगली केलीत.
पण लिखाणशैली थोडी वृत्तपत्रीय पद्धतीची आणि धावती वाटली. त्यात अजून नाट्यमयता हवी होती असे वाटले.