मौन

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 9 January, 2019 - 07:28

मौन.

खूप दिवसांनी भेटले ते दोघं ... गप्पा टप्पा झाल्या... ख्याली खुशाली कळली... इकडचं-तिकडंच... सगळंच शेअर केलं... हसून हसून पोट भरलं...अन मग एक क्षण आला.... नि:शब्द झाले दोघेही... असाच गेला बराच वेळ ... आणि एकाने मौन तोडलं... " खूप बोललॊ ना ? आता थोडं रडूयात ? " ....... अन मग कितीतरीवेळ गेला कुणास ठाऊक... चिंब भिजेपर्यंत सरी कोसळतच राहिल्या... माहित नव्हतं दोघांनाही पुन्हा किती दिवस बांध टिकवून ठेवावा लागेल ते ...........

©मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users