अ अक्षरा पासुन सुरू होणारे नाव मुलासाठी सुचवा

Submitted by Namrata Siddapur on 4 January, 2019 - 00:58

माझे नाव नम्रता
नवरयाचे कृष्णा
मुलाचे अराधय (नीट लिहता आले नाही )

छोट्या मुलासाठी अ अक्षरा पासुन सुरू होणारे 3 अक्षरी नाव सुचवा. आमचे तिघांचे नाव वापरून एकत्र काही नाव सुचवा. धन्यवाद

आरव
अनुज
अनय
अरणव
आऋष

नको. घरात आधीच ही नावे आहेत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अब्द म्हणजे मेघ. अप् म्हणजे पाणी. द म्हणजे देणारा. दोघांचा संधी झाला की अप् मधल्या प चा ब होऊन अब्द शब्द बनतो. (अब्द-शब्द ही जुळी नावे कशी वाटतात?तसा एक धागा निघालाय म्हणून..) वारिद, अम्बुद, वरद, सुखद तसे. अब्धि म्हणजे समुद्र. पाण्याचा साठा. "ते स्वातीच्या अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके, जाणा उत्तममध्यमाधमदशा संसर्गयोगे टिके!" अब्धिज म्हणजे चंद्र. (समुद्रातून निघालेला.)
अब्दचा एक अर्थ वर्ष असाही आहे. शताब्द वगैरे.

अर्पित
अविचल
अधिरथ
अधिराज
अंबरीष
अनाहत
आदि
अनुवेद

Atul

हीरा !!
पाय इकडे करा! दंडवत घ्या!!
अश्या हिरा-मोत्यासारख्या व्यक्तिंचे ज्ञानकण काजव्यासारखे पटकन चमकून जातात पण एखाद्या विद्द्युल्लतेसमान डोळे 'दिपवून' जातात!
अगम्य, अतर्क्य अश्या भावना हिंदोळतात!
अक्षय, अमर......विचार रुंघळत राह्तात!!

अव्यय
अभ्युदय
अभंग
अभंग - ओवी जुळ्या मुलगा-मुलगी साठी मस्त कोंबिनेशन आहे

@ हिरा,

तुमच्या अनेक सुंदर नावांच्या यादीत माझेही नाव बघून आनंद झाला.
- अनिंद्य
= ज्याची निंदा होऊ शकत नाही असा जो तो ; बहुव्रीही समास Happy

यक्ष, अहो काहीही काय? अर्थात त्यात अगम्य अतर्क्य,अक्षय, अमर अशी 'अ'नावे आली आहेत म्हणून ठीक!
अनिंद्य, आपले नाव हा बहुव्रीहि समास आहे की कसे याविषयी शंका आहे. उपपद तत्पुरुष किंवा नञ तत्पुरुष असू शकेल. कॉलिंग चिनूक्स!

Pages