ब्रेक इव्हन-१९

Submitted by sushant zadgaonkar on 31 December, 2018 - 22:19

ब्रेक इव्हन. .१९ .
सुशांत झाडगांवकर.
१.१.१९
सर्वच माझे आवडते जुने सोबती,तुमच्या सारखी काही ताज्या वयाची आणि आमच्या सारखी काही ताज्या मनाची आणी बाकीची सर्व माझ्याच सारखी सामान्य मंडळी माझ्या मंदीकरणाच्या लौकीक सोहळ्यात सामील झाली असून स्मरणीय वाटणारा एक क्षण मला अर्पण करायला मनापासून आलात त्याबद्दल तुमचं स्वागत करतो.
फक्त माझे वाटावे असे दोन प्रसंग लक्षांत आहेत.पैकी माझं बारसं,जे फक्त माझ्यासाठी खर्ची घातलेला पुढे नावाच्या अनुषंगाने मला लोकानी ओळखावं म्हणून केलेला खटाटोप होता.आणी आजचा एकसष्ठीचा प्रसंग जिथून ते देऊ केलेलं नावं हळू हळू पुसट व्हावं,त्याचा कदाचित आजपासूनच उच्चार हवेत विरावा हेही प्रयोजन असल्याने मीच ही संधी निवडली त्यामुळे आज पहिल्यांदा आणी येस शेवट्यांदा मी बरळू शकतो. .करेक्शन . .मी अगणीत संध्याकाळच्या त्या सेशन्स मधून ता-हयात कधीही तोल सुटला आणी बरळलो हे माझ्या सत्यवचनी, सुविद्य पत्नीच्या तोंडून कधीही ऐकलं नाही.
आत्तापर्यंत तुम्हा लोकांच्या तोंडून माझ्याबद्दल भरपूर सुखद उल्लेख ऐकून अजीर्ण होईल असं वाटत असतानाच आमची सौ.खूप परखड बोलली.तिलाही ह्यापेक्षा चांगली संधी मिळणं अवघड होतं. .नक्कीच.माझ्याभोवती सतत सावलीसारखी असते त्यामुळे मी काय हे तिला संपूर्ण कळंलं ह्या गैरसमजाचा पुरेपूर फायदा घेत तुमच्या साक्षीनं बॉटम्सअप करायच्या तयारीनिशी येथेच्छ रसप्राशन केलं.त्यातलं अक्षर अन् अक्षर खरं होतं. .पण ते तेवढंच नसतं हे ईथला प्रत्येक पती ओळखून आहे.
अशाप्रसंगी इतरांची What I am हे न सांगता what I should have been ह्या थाटात सांगायची कॉंपिटिशन असते तर Actually What I have been हे सांगायचा सभ्य प्रयत्न तिने केला .कदाचित तुम्ही म्हणताय तेव्हढा मी चांगला किंवा माझ्या बायकोला वाटतो तितका मी असह्य नाहीये.
मी सुसह्य होण्या ईथपतच आहे हे माझ्या मुलांना माहितीये. .आणि तुम्हांलाही ह्यापेक्षा वेगळा मी असेन असं वाटत असावं हे मला पटेल कारण शेवट पर्यंत लाभलेल्या आपल्या ह्या देह ह्या सिस्टम मधे दडलेल्या पॅकेजची माहिती आपल्यासोबतच जाते. . न उलगडल्या गुपिता सारखी.ती झाकून किंवा सांगून ह्या आधीच्याच क्लिष्ट सभोवताली काही फार फरक पडणार नाहीये.गॉसिप तेवढं सम्रृद्ध होत असतं आणि ते करायचं काम इथल्या काही जणांचं आद्य कर्तव्य आहे हे ती जाणकार माणसं जाणतात तसा माझ्यातला मल्टिनॅशनल कंपनीचा कालच रिटायर झालेला एक्झिक्युटिव्ह जाणतोच.
साठी गाठली की माणसं व्रृद्ध,सम्रृद्ध,क्रृद्ध,बुद्ध होतात आणि इतरांना हे ह्रृद्द असतं हे त्यांना येणाऱ्या अनुभवावरून जाणतो मी. मघा आलेल्या कित्येक उपदेशांमधे सिक्स्टी टू नाईंटी प्रवास करायचा असल्यास सिक्स्टी नंतर नाईंटी सुध्दा प्रमाणात सिक्स्टी वर आणावी ही अनुभव असलेल्यांची कळकळ कळली पण हे प्रमाण अबोध दोस्तांकडून का यावं आणी माझ्याच वेळी ह्याचं सूतोवाच ईतक्या प्रकर्षांनं व्हावं एवढा मी माजलोय काहो?
तुम्हा मंडळींच्या सर्वच सजेशन्स ह्या अनुभवी असल्या तरी एकतर मी तरी खूप ज्युनिअर आहे किंवा त्या तशाच्या तशा स्वीकारायची माझी तयारी अजूनतरी व्हायला अवकाश आहे.

"अभी अभी आया हूँ मैफिलमे दोस्तो,समा बांधनेको अभी समय लगेगा। . .
मैफिल तो बंध जाएगी,
बंदिशे रास नही आयी,
तो मतला जचने में समय लगेगा।
मुद्दत्ते गुजर चुकी है,
खौफ सहने मे समय लगेगा।"

ह्या ओळी आमच्या सौ.साठी खर्या ठरल्या तर तुम्हाला तिला सांभाळावं लागेल. .
आज माझी काही गुपितं उकलून मी मुक्त होऊ इच्छीतो.
तसा तुम्हा सर्वांनाच बंधनातून मी मुक्त करणार आहे. मी आत्तापर्यंत जे काही बोललो ते किंवा आत्ता जे सांगणार आहे ते खोटं नाहीये. .पण कधी विषयच निघाला नव्हता म्हणून चर्चा झाली नसेल.त्यानी फारसा फरक तुम्हाला किंवा मला पडत नाहीच आहे. .
पण माझ्या अत्यंत जवळ राहणारी,माझा श्वास न् श्वास जोखणारी,काही क्षण तिच्याजवळ नसताना अचूकपणे माझ्या गैरहजरीवर प्रश्नांत पडलेली आणि आशंकांनी बेभान होणारी,संभ्रमात पडलेली माझी बायको. .तिच्या सर्व भावना दडपून पुन्हा मला वरकरणी साथ देत होती.पण पडलेलं खिंडार तिला दिसत होतं आणि त्याचं प्रतिबिंबं मीही कुतूहलानं मी तिच्या डोळ्यात बघत होतो.
येस.व्रृंदा. .गेली पाच वर्षँ आमच्या सेटअप मधे प्रोग्रामर म्हणून काम करायची.दोन वर्षापूर्वी चक्कर येऊन ऑफिसात संध्याकाळी कोसळली तेव्हा मी एकटा हजर होतो.तोपर्यंत तिचा माझा छत्तीसचा आकडा होता.टाळायची ती मला.तिच्या कामात गती नव्हती म्हणून नेहेमीच वाद व्हायचे आणी कारणं सांगायची गरज नाही असं मी नेहमी ठणकावून सांगत असे.
डॉक्टर कडे नेताना तिला आधीच एक गंभीर आजार होता हे कळंलं.त्यानंतर इलाजासाठी पैसे गोळा करण्या पासून ते तिला हवी असलेली सगळी मदत मी केली.ती सर्वांसोबत तुसडेपणाने वागायची म्हणून इतर हळुहळू बाहेर पडले आणी मनापासून मदत करता करता मी तिचा जवळचा मित्र कधी झालो ते कळलंच नाही.
तरीही निव्वळ मैत्री पलीकडे मी कधी गेलो नाही.तिच्या स्वभावामुळे घरच्यांकडूनही तिने उपेक्षाच अनुभवली.लग्न केलं नाही. .तिची आणी हिची भेट घालून ओळख करून द्यायची योग्य वेळ येईना .मुद्दाम बायकोची ओळख करून देऊन कारण नसतांना एक नवीन वाद निर्माण करणं झेपलं नसतं कारण मी कुठल्याच वाईट हेतूनं हे करत नव्हतो तरीही आपले घरातले सामान्य वाद अकारण कुठपर्यंत जातात हे तुम्हा सर्वांना वेगळं सांगायला नकोच. आणी ही बाब साधी असली तरी घरी सांगताना काय वादळ उठलं असतं तेही तुम्हाला पटू शकतं.दुर्दैवानंआज व्रृंदा ह्या गोष्टी बोलू शकणार नाहीये.सुरूवातीला तिला बोलायला त्रास व्हायचा आणी ट्रीटमेंट्दरम्यान तिची वाचा गेलीये. .गेलं वर्षभर ती लिहूनच किंवा खुणांनी वाचेची जागा भरून काढतेय.
मी हे जेव्हा तुम्हाला सांगतोय त्यावेळी तुम्हाला आज जे प्रश्न भेडसावताहेत ते मला कित्येकदा गेली दोन वर्षँ क्लेश देताहेत.ह्या दोन वर्षात माझे माझ्या पत्नी सोबतचे संबंध माझ्यातर्फेच नॉर्मल होते.
पण आमच्या हिचा सिक्स्थ सेन्स प्रचंड अॅक्टीव्ह आहे. .तुमच्या ही कडे असंच आहे नं. .? म्हणजे सिक्स्थसेन्स हो?. .त्यामुळे हिची घुटमळ मला नवीन नव्हती पण मी काहीही गैर करीत नसल्यामुळे समर्थपणे सहजच हा विषय टाळत आलोय.
हे हॅंडलींग स्किल मी हिच्याकडूनच शिकलोय.कुठलीही गोष्ट ठरावीक वेळीच करावी हा हिचाच आवडता नियम आहे.
कागं?. .(माय गुडनेस केव्हढी लाल बुंद झाली आहे)आणि बोलताना वेळ अत्यंत महत्वाची असते. .तीच साधण्यात कसब असतं हे हिनंच सांगितलं आहे.
दोस्तहो तुम्हांला फार ज्यास्त पीडणार नाही मी. आज मुहूर्त कुठला आणी मी बोलतो काय. .पण मी गॉसिप ला प्रचंड घाबरतो.
सद्य परिस्थितीला मी घाबरत नाही.आणी म्हणून व्रृंदा संबंधी माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींना एकाच वेळी सगळा व्रृत्तांत सांगून मोकळं व्हावं हे ठरवून आज प्रांजळपणे हे मी समोर मांडतोय.हे तिच्या हस्ताक्षरांत तिनं लिहीलेलं तिचं निवेदन आहे. .मला आत्ता ते मिळालं . .वाचू?. .गुड.
नमस्कार . .मी व्रृंदा जोशी.साहेब आत्तापर्यंत जिच्याबद्दल बोलले ती मीच.दुर्दैवी वगैरे अजिबात नाही.पण एका बाबतीत मी उणी होते.माझ्या विक्षिप्त स्वभावामुळे मला मित्र नव्हते.मला कुणाचंच बॉसिंग किंवा हस्तक्षेप चालत नसे.नोकरी करणं मान्य नव्हतं पण सुरुवातीला विरंगुळा म्हणून नंतर जीवन शैली म्हणून,ती जी चिकटली ती कायमची.बदलल्या.कितीतरी नोकर्‍या वेगवेगळ्या ठिकाणी केल्या.बोलताना संयम नसल्यामुळे आणि कुणाचंच कधी न पटल्यामुळे मी वाद घालायची.तुटून पडायची.सतत प्रत्येक गोष्टीत वाद घालून संबंध ताणून तुटायचे. .मला पर्वा नसायची.
एक लेबल म्हणून मी सतत वावरायची.सॉफ्टवेअर मधे काम करताना हवं असलेलं लॉजीक,सटीक आणि स्पष्ट विचार आणि निर्भिडपणे सगळं हातावेगळं करायचा आत्मविश्वास ही अस्त्र होती माझी.
पण हा सगळा टेचका,टेंभा,अंगलट आलाच.
ज्यावेळी माझ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आली तेव्हा मला पश्चात्ताप झाला पण माझ्या त बदल होणं आवश्यक होतं.मला मनापासून वाटायचं ते. .माझा अहंकार आणि वाचा एकाच वेळी लुप्त झाल्या. .माझ्याकडे सर्व गोष्टी असूनही कशाचाही उपभोग घेण्या सारखी परिस्थिती आता नव्हती. .मी एवढी खचले होते की आज वाचा असती तरी बोलायचं त्राण नव्हतं. .पुढे सरसावून सर्वांची माफी मागायची सोय नव्हती. .साहेब सोडले तर मला कुणीही समजून घ्यायला तयार नव्हतं. .कजाग माणसांचं भविष्य काय ते माझं वर्तमान होवून बसलंय आणी साहेबांकडून कधीही वाच्यता झाली नसली तरिही माझ्याकडे इतकं जातीनं लक्ष देताना त्यांच्या घरी उद्भवणारी परिस्थिती मी समजू शकते. .नव्हे आज मी ह्यांच्या पत्नीच्या जागी असते तर मीही ह्यापेक्षा वेगळं नसते वागले. .
खरं म्हणजे मी त्यांची ऋणी आहे असं म्हंटलं तर नवीन वादाला तोंड फुटायचं. .इतकी काचेसारखी नाजूक परिस्थिती आहे.पण साहेब ग्रेटच.माणुसकी काय असते,मर्यादा काय असतात आणि बोभाटा न करता केलेली निर्व्याज मदत काय असते हे मी मुकाटपणे अनुभवते आहे.
माझ्यात आणि त्यांच्यात मैत्री सुद्धा सुरुवातीला एकतर्फी असायची कारण कुणासोबत मैत्री करणं सुद्धा मला मान्य नसायचं.पण नातेसंबंध,मैत्री असे सामान्य लेबल मला मान्य नाहीत इतकी उच्च पातळी आहे साहेबांची.मला आज तुमच्या पुढे भिक मागायची आहे. .मैत्रीची.माझ्या परीने शक्य असेल तशी मी निभवीन ती.सर्वांसोबत.आमच्या साहेबांच्या सानिध्यात आलेली आपण सर्व मंडळी सह्रृदय आहात. आजपासून मला सगळे मित्र म्हणून मान्य कराल!कुणालाही इतरांची गरज केवढी असते ते कळायला अर्ध आयुष्य गेलं माझं आणि हे सगळ्यांना सांगायचा खटाटोप सुद्धा अपरोक्ष करतेय तशी वेळच आलीये. .बघा मी कधी नीट बोलली नाही त्याची शिक्षा दिली काहो देवानी?
पण आज मी इथेच ह्या हॉलमधे शेवटच्या रांगेत ,पांढरी जॉर्जेटची साडी नेसून तुम्हा सर्वांना भेटायला आली आहे कारण मला ह्यानंतर तुम्हाला भेटायचा सराव करायचा आहे.चांगल्या मैत्रीचा सराव करायचा आहे. .
वहिनी काय,फार वेळ घेणार नाहीत.
मी त्यांच्या शेजारी खुर्ची वर त्यांची भेट घ्यायला निघतेय..
तुम्हा सर्वांची मैत्रिण ,व्रृंदा.
दोस्तहो, या. आता . . हिचा म्हणजे अर्थात सौ च्या चेहरा खुललाय.समाधानी रिलॅक्स वाटतोय.
Can we add her?. .तुम्हा सर्वांसोबत आज मला व्रृंदाला introduce करुन बरं वाटतंय.मैत्री व्रृद्धींगत करायला नवीन वर्षाची सुरुवात,ह्यापेक्षा चांगला मुहूर्त असू शकत नाही.आज आपण तो गाठला.
चला तर माझी सेकंड इनिंग सेलीब्रेट करायला. .

सुशांत झाडगांवकर.
8600104764 .
1.1.2019.

Group content visibility: 
Use group defaults

मन: पूर्वक धन्यवाद .
माझं गुलमोहर वर लेखन वाचून प्रतिक्रिया देत रहा.