बाहुबलीचा विक्रम तोडणारा चित्रपट -Accidental Prime Minister

Submitted by कटप्पा on 29 December, 2018 - 15:49

होय हा चित्रपट येतोय, आणि निवडणुकीच्या वेळेस येतोय.
अनुपम खेर ममो च्या भूमिकेत आहे.
योगायोग म्हणजे संजय बारु यांचे हे पुस्तक देखील बरोबर २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते.

सर्वांना माहीत आहे अनुपम बीजेपी चा माणूस आहे.

चित्रपट कोणत्याही अजेंडा ने असू दे मात्र प्रचंड धंदा कमवेल हे निश्चित. काँग्रेस च्या 5 करोड लोकांनी हा चित्रपट जरी पहिला तरी ५०० cr आणि बीजेपी वाले नक्कीच बघणार, त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्रेलर प्रोमोट झाला आहे.
१००० करोड कुठे जाणार नाहीत. बाहुबली चा रेकॉर्ड तुटणार.

ट्रेलर -
https://youtu.be/q6a7YHDK-ik

Group content visibility: 
Use group defaults

मनमोहन सिंग यांच एक वाक्य आहे, साधारण अशा अर्थाचं - भविष्यात इतिहास मला क्षमा करेल पण मिडिया नाहि. आय्रॉनिकली, पुस्तकं हा मिडियाचाच भाग असुनहि, संजय बारुंचं पुस्तक मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ लिहिलं गेलेलं आहे. त्याचा वापर (टाइमिंग?) भाजपाने पोलिटिकल गेन्ससाठी केला यात नवल नाहि, कारण दुसर्‍या टर्ममध्ये मनमोहन सिंग यांची झालेली कुचंबणा जगजाहिर आहे...

https://www.ndtv.com/elections-news/huge-violation-of-trust-pms-daughter...

संजय बारू हे २००४-२००८ या काळात मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते. त्यामुळे युपीए २ चा काळ त्या पुस्तकात आलाय का, आला असेल तर कसा याबद्दल कल्पना नाही.
चित्रपट पुस्तकावरच बेतलाय का याचीही कल्पना नाही.

{{{ होय हा चित्रपट येतोय, आणि निवडणुकीच्या वेळेस येतोय.
अनुपम खेर ममो च्या भूमिकेत आहे.
योगायोग म्हणजे संजय बारु यांचे हे पुस्तक देखील बरोबर २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते.}}}

अगदी स्सेम. जसा अमिताभचा इन्किलाब पुन्हा पुन्हा दाखवित होते सर्वच मूव्ही चॅनेल्सवरुन २००९ च्या लोकसभा निवडणूकीच्या काळात.

द गेम इज ऑन.
सरदार पटेलांवरही चित्रपट येतोय... परेश रावलचा...

सरदार पटेलांवरही चित्रपट येतोय... परेश रावलचा...
>>
आँ ? ' सरदार पटेलांच्या जीवनावर परेश रावल चा ' सरदार ' नावाचा चित्रपट १९९३ लाच येऊन गेलाय ना?

पुस्तकावर बेतलाय म्हणजे पुस्तकात जेवढं आहे, तेवढंच दाखवणार की त्यापलीकडे जाऊनही.
नवीन Submitted by भरत. on 30 December, 2018 - 16:32
<<
ते आता चित्रपट पाहिल्यावर कळेलच. मात्र सिनेमॅटिक स्वातंत्र्य दिग्दर्शकांने घेतले असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर तसे नसते तर ट्रेलर मधे दाखविल्या प्रमाणे बंद रुमच्या आत मनमोहन व सोनिया गांधी यांच्यात होणारी चर्चा संजय बारुला कळण्याची काहिच शक्यता नव्हती. आता अशी काही चर्चा झाल्याचे मनमोहन सिंग यांनी संजय बारुला सांगितले असेल तर प्रश्न वेगळा.

सरदार पटेलांवरही चित्रपट येतोय... परेश रावलचा...
>>
आँ ? ' सरदार पटेलांच्या जीवनावर परेश रावल चा ' सरदार ' नावाचा चित्रपट १९९३ लाच येऊन गेलाय ना?
नवीन Submitted by बाबा कामदेव on 30 December, 2018 - 16:22

आजच्या काळातले सरदार अर्थात नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील चित्रपटात परेश रावल त्यांची भूमिका करणार आहे.

आजच्या काळातले सरदार अर्थात नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील चित्रपटात परेश रावल त्यांची भूमिका करणार आहे.>>>>
एकपात्री प्रयोग असणार आहे का मग? कारण ते कुणालाच बोलू देत नाहीत

असे आधीच भविष्य काढू नका हो, नजर लागायची व चित्रपट पहिल्या आठवड्यातच कोसळायचा. रिलीज तर होऊ दे आधी.

इंदू सरकारचा ट्रेलर बघून मला वाटले होते इंदिरा गांधी , आणीबाNइ व संजय वर चित्रपट आहे.

काँग्रेस च्या 5 करोड लोकांनी हा चित्रपट जरी पहिला तरी ५०० cr आणि बीजेपी वाले नक्कीच बघणार, त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्रेलर प्रोमोट झाला आहे.
>>>>>>

१) सामान्य जनता काँग्रेस वा बीजेपी अश्या कोणत्याही पक्षाचे सहसा नसतात. खिश्यातले पैसे खर्च करायची वेळ आली तर मुळीच नसतात.

२) कार्यकर्ते हे त्या त्या पक्षाचे असले तरी बहुतांश कार्यकर्ते फुकटे असतात. खिश्यातले पैसे खर्च करून बघणार नाहीत. त्यांना फार तर तो दाखवला जाईल. त्यामुळे कमाई कागदावर दिसेल पण प्रत्यक्षात ती कमाई नसून आर्थिक नुकसानच असेल. राजकीयदृष्ट्या मात्र फायदा असेल.

३) चित्रपट बघायचे थिएटर हे एकमेव माध्यम नाही. पायरेटेड कॉपी पहिल्या दिवसापासूनच उपलब्ध व्हायला सुरुवात होते.

..

अर्थात, मी काही मुद्देसूद लिहिल्याचा आव आणला तरी धागाकर्त्यालाही हे माहीत असावे. आणि त्याचा हेतू केवळ या चित्रपटावर चर्चा घडत चित्रपटाला प्रसिद्धी मिळावी असाच असावा. मी सुद्धा शाहरूखच्या चित्रपटांबाबत असेच करतो Happy

ज्या व्यक्तीवर पिक्चर बनतो, ती व्यक्ती जर हयात ( जिवंत ) असेल तर तिला हे सर्व आधी सांगीतले जाते का? त्या व्यक्तीची परवानगी घेतली जाते का? त्या व्यक्तीला तो सिनेमा सर्वात आधी दाखवला जातो का? आणी त्यातली दृष्ये त्या व्यक्तीला पसंत नसतील तर काटली जातात का?

या सिनेमाचं माहित नाहि पण पुस्तकाच्या वेळेला डाॅ. सिंग यांची परवानगी घेतली नव्हती; तसा उल्लेख आहे पुस्तकात. आणि त्यामुळे सत्यपरिस्थिती मांडण्याची त्यांची नैतिक जबाबदारी वाढली असं संजय बारु यांनी म्हटलेलं आहे...

डॉ.मनमोहन सिंग यांच्या ज्येष्ठ कन्येने या पुस्तकाचं वर्णन करताना पाठीत खंजीर खुपसणे, विश्वासघात, खोडसाळ, अनैतिक हे शब्द वापरले होते.

While I am not speaking on behalf of the Prime Minister, we are extremely angry at the exaggerated level of access the author has ascribed to himself,” she said. “It is an audacious account with so-called quotes, of even the Prime Minister, which have been recorded as facts. Reported speech has been used as direct speech. Is this ethical?’’

नैतिक जबाबदारी? हं.

हे अवांतर आहे, पण बातमीतल्या शेवटच्या परिच्छेदातू न She added that as Prime Minister, her father never took time off for holidays. (१५ एप्रिल २०१४)

आजच्या काळातले सरदार अर्थात नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील चित्रपटात परेश रावल त्यांची भूमिका करणार आहे. >> बाल नरेंद्रची भूमिका कोण करत आहे? मगर वगैरे बाकी बालपणीचे चमत्कारपण आहेत का त्यात?

संत तुकारामांची भूमिका करणारे श्री. विष्णुपंत कुलकर्णी यांच्यावर तुकारामांचा इतका प्रभाव पडला की त्यानंतर तेही असेच संतसम जीवन जगू लागले. अनुपम खेर यांच्याबाबतही काहीसे असेच झाले आहे असे त्यांचे स्वतःचे म्हणणे आहे. कट्टर भाजप समर्थक व स्वतःला मोदीभक्त असे म्हणवून घेणारे अनुपम खेर हे आता डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका करुन त्यांचे भक्त बनले आहेत. आधी मला हा मार्केटिंग तंत्राचा प्रकार वाटत होता पण ज्या तडकाफडकी त्यांनी FTII चा राजीनामा दिला त्यावरुन यात तथ्य असावे असे वाटत आहे.

विष्णूपंत पागनीस

International assignments मुळे वेळ नाही म्हणून राजीनामा दिला. अरविंद पानगरिया, अरविंद सुब्रमण्यम यांच्या रांगेत जाऊन बसले.
हे दोघेही मनमोहनसिंगभक्त झाले असल्यास कल्ऱ्यना नाही.

म्हणजे टोटल १५०० करोड कुठे गेले नाहीत..! ओव्हरसीज चे २०००-३००० करोड अजुन विचारातच घेतले नाहीत. मोदीनी गेल्या ४.५ वर्षात ९२ देशांचे दौरे केलेत.. त्या ९२ देशांतील जनतेने हा सिनेमा पहावा म्हणुन २-२.५ हजार करोडची जाहिरात पण करणारेत म्हणे.

दरम्यात यु ट्यूब ने या चित्रपटाचे ट्रेलर हटवले आहे अशी तक्रार अनुपम खेर यांनि ट्विट करून केली आहे

दरम्यात यु ट्यूब ने या चित्रपटाचे ट्रेलर हटवले आहे अशी तक्रार अनुपम खेर यांनि ट्विट करून केली आहे
या खेराचे नक्कीच डोके फिरले असावे किंवा भाजपया सारखा खोटे तरी बोलत आहे. अरे सरकार तुमचे. यू ट्यूब वरून हटवायला तुम्हीच दम देणार. काँग्रेस मुले हटले असेल तर काँग्रेसला काँप्लिमेंट्स दिल्या पाहिजेत त्यांची वट्ट वाढली म्हणून....

Pages