रोमँटिक नवरा

Submitted by mrunal walimbe on 29 December, 2018 - 11:11

आज खूप दिवसांनी तिचा नवरा फारचं रोमँटिक झाला होता. सकाळी उठल्यापासून चं त्यानं 'बाईसाहेब आपली काय सेवा करु 'असेचं डायलॉग चालू केले होते. ती पार गोंधळून गेली होती. सकाळी तर त्याने चक्क मुलांचं आवरायला मदत केली आणि सर्वात क्लायमॅक्स म्हणजे त्याच्या नावडीचं कामं म्हणजे मुलांना शाळेच्या बसमध्ये ही बसवून आला होता तो. तिला काही चं कळत नव्हते. आज याचा मूड इतका कसा कायं छानं...
तिने आठवायला सुरवात केली आज सासरच्या जवळच्या नात्यातल्या कोणाचा वाढदिवस आहे का की कोणी येणारं आहे का त्याच्यांपैकी जेणेकरून त्याला ते आपल्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तरं नाही ना!...
मनातले हे सारे विचार झटकून तिने रोजच्या सारखीचं कामं करायला सुरवात केली. इतक्यात तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं अन् तिच्या लक्षातं आले आज मूड रोमँटिक असल्याने महाराजांनी ऑफिसला दांडी मारलेली आहे....
मग फारचं मनाची चलबिचल होऊ लागल्याने तिने स्वयंपाक घरात टेबलशी बसलेल्या त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून विचारले काय आज स्वारी फारचं खुशीतं आहे काय स्पेशल.. ऑफिसला आज सुट्टी वाटतं... तसं ती ओट्यापाशी उभी राहून कढईत ढवळत असलेल्या पदार्थांची पर्वा न करता त्याने चक्क तिला मागून मिठी मारली.. ती तर ओरडलीचं अहो काय हे माझी एवढी छान नारळाची वडी... जळेलं ती... सोडा मला... तसं तो म्हणाला बाईसाहेब ती नारळाची वडी जळू नये म्हणून तुम्ही या पामराला जळवणारं तसं तिनं अस्त्र चं काढलं बघा हं नंतर म्हणू नका आईसारखी पांढरी शुभ्र जमली नाही म्हणून...
तसा तो झटक्यात electric shock बसावा असा बाजूला सरकला...तिला ही थोडीशी रुखरुख लागली. पण काय करणार तिच्या schedule मध्ये त्याची सुट्टी धरलीचं नव्हती ना..
पाचंच मिनिटात वडी झाली तिने ती थापली अन् मग मात्र तिला रहावेचं ना छोटसं तोंड केलेल्या त्याच्या समोरं ती खुर्ची ओढून बसली अन् त्याला म्हणाली हं बोला आता मघा काय म्हणतं होता तसा तो तिला म्हणाला आज मुद्दामच रजा घेतली मी. आजचा दिवसं खूप़ special आहे ना... तिने प्रश्नार्थक नजरेने बघितलं तसं तो तिच्या डोळ्यात पहातं म्हणाला तुला आठवतं का आजच्याचं दिवशी वीस वर्षापूर्वी तू माझ्या friendship ला हो म्हणलीसं अन् माझं सारं आयुष्य चं बदलून गेलं... मग आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो लग्न केलं पण तो दिवसं चं या सगळ्या नंतरच्या घडामोडींना कारणीभूत...
इतके दिवस या संसाराच्या रामरगाड्यातं काही हे जमतं नव्हतं त्यामुळे यावेळेसं आधीच ठरवलं होतं...
ती मात्र एखाद्या ने हिप्नॉटिझ केल्यासारखी मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे बघतं होती अन् तिला जाणवतं होती ती त्याच्या त्या प्रेमाची माया आणि ऊब.....

मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त