व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग 3 पूर्ण

Submitted by समई on 29 December, 2018 - 03:43

एअरपोर्टच्या बाहेर मुख्य रस्त्याला गेल्यावर असे वाटले की भारतात तर परत नाही आलो?रस्त्यात गर्दी खूप होती.ऑफिस मधून घरी परतणाऱया लोकांची गर्दी होती.
IMG-20181227-WA0053_0.jpg
सगळीकडे दोन लेन असल्यामुळे दोन्हीकडून वाहनांचे एकमेकांवर आक्रमण होत नाही एव्हढेच.तिथेही स्कूटर हेच जाण्या येण्यासाठीचे मुख्य वाहन आहे.सिटी बसेस दिसल्या नाहीत.त्यामुळे मोटारींच्या मधून शिताफीने आपली स्कुटर बायका,पुरुष काढत होते .आपल्याच सारखे सम्पूर्ण 4 जणांचे कुटुंब बसून जात होते.
IMG-20190115-WA0014.jpg
असेही सामान घेऊन जाणारे लोक दिसतात
IMG-20190115-WA0016.jpg

रस्त्याच्या दोन्ही कडेला इथल्या सारखीच दुकाने होती.अधून मधून मोठी मोठी हॉटेल्स होती.विमानातून दिसलेला उंच टॉवर अधून मधून डोकावत होता.सुंदर रंगीबेरंगी लाईट्स मुळे आकर्षक दिसत होता.तो ८1 मजली आहे अशी गाईडने माहिती पुरवली.गाईडने हेही सांगितले की मानिषचे घर सायगॉव नदीला लागूनच आहे.रस्त्यात अधूनमधून दिसणारा रंगीबेरंगी टॉवर
IMG-20190115-WA0018.jpgIMG-20190115-WA0015.jpgIMG-20190114-WA0010.jpg

हो ची मिन्ह चे नाव पहिले सायगॉव होते.हे शहर सायगॉव नदीच्या भोवती वसलेले आहे.ही विशाल नदी शहराच्या मध्यातून वहाते.इथले दळणवळण मोठ्या,छोट्या नावेतून नदीतूनच होते.
त्याबद्दल अशी माहिती मिळाली की सायगॉवचे आजूबाजूच्या
Gia Dinh Province मध्ये विलीनीकरण केले गेले,त्यामुळे दक्षिण व उत्तर व्हिएतनामचे एकत्रीकरण केले गेले आणि शहराचे औपचारिक रित्या नामकरण हो ची मिन्ह केले गेले. हो ची मिन्ह यांनी अमेरिकेच्या विरुद्ध झालेल्या युद्धात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष पण होते. त्यांच्या नावाने हनोई येथे मोठे संग्रहालय आहे.त्यांचे नाव येथे खूप आदराने घेतले जाते.

गर्दीमुळे घरी पोचायला जवळ जवळ १ तास लागला.मनिषच्या घराशी गाडी थांबली व आमच्या तोंडातून wow शब्द बाहेर पडला.घरी पोचायला रात्र झाली होती.दिव्यांच्या प्रकाशात घर भव्य वाटत होते.
रिमोट कंट्रोलने दार उघडले गेले.समोरच मनीष,हुआ उभे होते.त्याचे घर बाहेरूनच बघून आमचा प्रवासाचा शीण पळाला.समोर पाच मजली सुंदर बंगला होता.
खाली ग्राउंड फ्लोअर वर आम्ही चपला,बूट काढले,व तिथे ठेवलेल्या स्लीपर्स घालून लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर गेलो.ही पद्धत हनोईआणि कंबोडियाला पण आहे.तिथल्या airbnb घरात सुद्धा घरी घालायला बाहेर स्लीपर्स ठेवल्या होत्या.घर आतूनही खूप आकर्षक सजवले आहे.समोरच हुआचा मिस व्हिएतनामचा फोटो होता.मनिषच्या मुली सोनाली,निकिता आता अमेरिकेत कॉलेज मध्ये शिकायला गेल्या आहेत,मुलगा इशानही पुढच्या वर्षी तिथेच जाणार आहे तो मित्राकडे गेला असल्यामुळे त्याची भेट झाली नाही.IMG-20181208-WA0009.jpg
हुआचा मिस व्हिएतनाम झाल्यानन्तरचा फोटो.
IMG-20181119-WA0001.jpg
मनिषच्या मुली आणि मुलगा.
डायनिंग रुम मध्ये गप्पागोष्टीं बरोबर छान जेवण झाले. अगदी भारतीय जेवण,वरण भातापासून,चविष्ट भाज्या,पोळ्या असे जेवण झाले.नन्तर हुआने चक्क आंब्याच्या आणि कलिंगडाच्या फोडी समोर ठेवल्या.नन्तर हेही कळले की व्हिएतनाम मध्ये १२महिने आंबा,फणस अगदी कापा, बरक्या पासून मिळतो.सीताफळे पण मिळतात.पुढेही प्रवासात आम्ही या फळांवर ताव मारला.दिवस,रात्रीच्या प्रवासाने सगळेच थकले होते.त्यामुळे केंव्हा एकदा झोपतो असे झाले होते.आणि दुसऱ्या
दिवशी सकाळी ८.30वाजता आमची व्हॅन हो ची मिन्ह दर्शनासाठी आम्हाला न्यायला येणार होती.त्यामुळे लगेच चौथ्या मजल्यावर असलेल्या गेस्ट रूम्स मध्ये जाऊन निद्रेच्या आधीन झालो.पण आधी मागच्या गॅलरीतून सायगॉव नदीचे फोटो घ्यायला मात्र विसरले नाही.
IMG-20190115-WA0012.jpg
सकाळी जाग आल्यावर परत बाल्कनी मध्ये गेले .समोर नदीचे विशाल रूप होते.छोट्या मोठ्या बोटींची ये जा चालू झाली होती.IMG-20190115-WA0024.jpgIMG-20190115-WA0023.jpg
रात्रीच सूचना मिळाल्या मुळे सर्व आन्हिके आटोपून शहराची सहल करायला सर्व सज्ज झाले.सगळ्यांचे आवडते फोडणीचे पोहे,फळे,चहा,कॉफी असा पोटभर नाश्ता केला.मी मानिषला विचारले की इथे आमच्या सारखे घरोघरी पाण्याचे फिल्टर्स आहेत का?मनिषने सांगितले की इथे पाणी भरपूर आहे,पण फिल्टर प्लान्टस नसल्यामुळे नळाचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे इथे सगळीकडे बाटल्यातून आणि मोठ्या पाण्याच्या कॅन्स खाजगी कंपन्या पुरवतात.ते एकत्र स्वच्छ केलेले पाणी असते किंवा स्प्रिंग पाणी असते.आमची वाट पहात असलेल्या व्हॅन मध्ये बसून हो ची मिन्हच्या पहिल्या दर्शन स्थळ कडे निघालो.तर व्हॅन मधेही आम्हाला दिवसभर पुरतील इतक्या पाण्याच्या अर्धा लिटरच्या बाटल्या ठेवल्या होत्या.आतापर्यंत व्हिएतनामी currancy ची गरज पडली नव्हती,म्हणून उल्लेख केला नव्हता,पण आता डॉलर किंवा डाँग लागणार होते.आम्ही गेलो त्यावेळी 320 डाँग म्हणजे 1 रुपया असा रेट होता.तिथे डोंगच्या पाच लाख,2लाख,1 लाख,50 हजार,20 हजार,दहा हजार ,5 हजार,2 हजार,1 हजार,आणि 500 च्या नोटा असतात.आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची असल्यास,ते हजार लाख डाँग असे सांगतात.एवढ्या नोटा बरोबर ठेवणे आपल्याला शक्य नसते.त्यामुळे डॉलर मध्ये पैसे देणे सोपे जाते.आम्ही सर्वांनी तेच बरोबर ठेवले होते. रस्त्यावर रात्रीइतकी गर्दी नव्हती. आजूबाजूला २,३बगीचे लागले,जिथे लोक फिरत होते,व्यायाम करत होते.शहरापासून थोडे दूर आल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान हिरवळ, झाडे होती.आता आम्ही हो ची मिन्ह पासून १००की.मी दूर उत्तरपूर्व दिशेला असलेल्या Cao Dai टेम्पल पाहायला निघालो होतो.व्हिएतनामी लिपी जरी इंग्लिश सारखी असली तरी अक्षरांवर छोट्या उभ्या आडव्या रेघा असतात .त्याप्रमाणे त्यांचे उच्चार अगदी वेगळेच असतात.हे देऊळ १९५५साली बांधून पूर्ण झाले.शहराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याकडच्या खेडेगावात आढळतात तशीच घरे,दुकाने होती.एके ठिकाणी शहाळी ठेवलेले दुकान होते.तिथे मोठी मोठी शहाळी होती.त्याचे पाणी प्यायचा मोह आवरला नाही.एका शहाळ्यात दोन जणांना पुरेल इतके गोड पाणी होते.तृप्त होऊन आम्ही पुढे निघालो.रोज जवळ जवळ 1,2 शहाळे पाणी पीतच होतो.एक शहाळे एक डॉलरला मिळायचे.
Cao dai temple बाहेरून.
IMG-20190115-WA0027.jpg
Cao dai temple चे वर्णन पुढच्या भागात

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान वर्णन.
तुमच्या दिरांची फॅमिली छान आहे.

माझी माबोकरांना विनंती आहे की मला थोडे थोडे लेखन पाठवणे सोपे वाटत आहे.फोटोंसोबत पूर्ण लेखन पाठवणे मला जमत नाहीये.तरी ह्या पुढील भागांचे वर्णन मी भाग( पूर्ण) असे लिहिल्याशिवाय वाचू नये.

माझी पण एक विनंती आहे की तो फॅमिलीचा मुलांसहित फोटो आहे तो अप्रकाशित करावा. त्यांची परवानगी आहे का हा घरगुती फोटो पब्लिश कराय ला? फक्त ज्या जागा बघितल्या त्यांचे फोटो प्रकाशित करा.

फोटोंसोबत पूर्ण लेखन पाठवणे यासाठी --

मायबोलीवर फोटो अपलोड केले आहेत ते insert file केल्यावर टेक्स्ट बॅक्समध्ये लिंक येते ती इमेज कोडसह कॅापी करून एका नोटमध्ये घ्यायची. असे सर्व फोटो कॅापी करून नोटमध्येच हवे तिथे जोडून ओफलाइन लेख तयार करायचा. पूर्ण झाल्यावर सगळा कॅापी पेस्ट करायचा.
मायबोलीचा 'लेखन करा' टेक्स्ट बॅाक्स उघडून लेखन,फोटो हे करत बसावे लागत नाही.

ग्रेट , फारच गोड आहेत मुले ब्लेस देम. त्याचे घरही किती मोठे व सुरेख आहे. पुढ्यात गॅझिबो. विएट नाम मध्ये काय काय खाल्ले? क्विल्ट घेतले का? फ अ खाल्ले का? कॉफी घेतली का? वीएट नामी कॉफी, मिरे जबरदस्त असतात. तुम्ही छान लिहीत आहात. आम्ही वाट बघून बघून वाचू. वरी नॉट.

अमा धन्यवाद.अग शाकाहारी असल्यामुळे आमच्या खाण्यावर limitations होते.आम्ही तिघी होतो.बाकी सगळ्यांनी अगदी ताव मारला.फिशचे किती प्रकार त्यांना खायला मिळाले.कॉफ़ी तर खूप प्यालो.हनोईला जाताना माझ्या जावेने खूप कॉफी पॅकेट्स दिली होती.फणस,अननस,केळी, आंबा, प्रत्येक ठिकाणी मनसोक्त खाल्ले आणि नारळपाणी खूप प्यालो.