अशी का भूक...,

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 28 December, 2018 - 01:07

अशी का भूक वरचढ सारखी होते
फळ्यावर वर्तुळाची भाकरी होते

मला टाळायचा असतो तुझा रस्ता
न कळता वाट माझी वाकडी होते

तुझे मंदिर तुझी पेटी भरत जाते
कदाचित याचसाठी आरती होते

किती माया किती ती काळजी करते
म्हणूनच लेक बापा लाडकी होते

जगाचा घाव काट्यावर कधी पडला
कुठे व्याकुळ फुलाची पाकळी होते ?

© रुपेंद्र कदम , पुणे
✍ 22 ऑक्टोबर 2018

Group content visibility: 
Use group defaults