शेवंता

Submitted by mrunal walimbe on 27 December, 2018 - 21:36

त्या दिवशी अनु तशी जरा निवांतच होती. रविवार असल्याने रोजची घड्याळ्याच्या काट्यावर धावण्याची कसरत नव्हती.नाही म्हणायला रविवार त्यामुळे जरा सकाळी सकाळी भाजी आणण्याचा मात्र तिचा मानस होता. तसं तिनं डोक्यात काही प्लँन ठरवले अन् निशांतला झोपेतून उठवायला गेली पण तो कुभंकर्ण एवढा निद्रादेवी च्या अधीन होता की त्याने अनुलाचं प्रत्युत्तर दिले "अनु यार झोपू दे ग जरा , या गरीब प्राण्यावर तरस खा ग रविवार आहे week day नाही"असं म्हणून तो तोंडावर दुलई ओढून परत झोपी गेला. अनुने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही अन् हातात पर्स मोठी भाजीसाठी पिशवी घरच्या चाव्या घेऊन ती घराबाहेर पडली जरा चालतच जायचा तिचा विचार होता.कामाच्या व्यापातं नोकरीच्या धामधुमीत असं साधं आपल्याला पायी फिरायला बाहेर पडता येतं नाही याचं तिला फारचं वैषम्य वाटतं होतं .
चालत चालत ती market पाशी पोचली. तिला माहितं होतं की रविवारी सकाळी आजूबाजूच्या खेड्यातीलं बरचसे शेतकरी येतातं इथं भाजी विकायला त्यामुळे ताजी अन् स्वस्त भाजी मिळते. एकेका कडे काय काय भाजी आहे हे बघण्यासाठी मग अनुने आधी फेरफटका मारायचा ठरवला अन् मग जिथे छान वाटेलं तिथं भाजी घ्यायची ठरवलं.
तशी बरेच वेळा तीचं रविवारी भाजीला येतं असल्याने बरचश्या या शेतकरी बायका पुरुष अनुला तसे ओळखीचे होते.इतक्यात तिला तिची नेहमीची शेवंता दिसली. अन् ती सहा सात वर्ष मागे गेली....
काही वर्षांपू्र्वी अनुने तिच्याकडून जांभळे घेतली होती ती इतकी छान होती की निशांत तिला म्हणाला होता अग झाडावरून तोडून आणलीस का अनु मग नंतरच्या रविवारीपासून अनु मुद्दाम चं तिच्याकडेचं भाजी घायला लागली होतीअन् एक दिवसं तर अनु अचंबित च झाली होती समोरचं दृश बघून शेवंता जिथं भाजी विकतं होती तिथचं शेजारी तिची छोटीशी लेकं अ आ ई वहीत गिरवतं बसली होती.अनुला त्या मुलीचं फार कौतुक वाटलं होतं तेव्हा. त्यामुळे चं तर तिने शेवंताची चौकशी केली कुठं राहते घरी कोणं वगैरे वगैरे...
तेव्हाचं शेवंतानं अनुला सांगितलं होतं की ती पुण्याच्या जवळच्या लवळे गावातली तिथं तिच्या आईची शेती आहे. हीचं करते ती . म्हाताऱ्या आईला खाऊपिऊ घालते.चार वर्षांपूर्वी हिच्या दादल्याने आत्महत्या केली तेव्हापासून आईकडेचं असते ती. मुलगी लहान आहे पण तिला तिच्या हिमतीवर मोठं करायचं शिकवायचं. अनुला अजूनही तिचे शब्द आठवतं होते "माझ्या सारखं अडाणी नाही राहू द्यायचं मला माझ्या मुलीला ताई त्यासाठी तर एवढं कष्ट उपसते बघा मी" त्यानंतर एकदा अनु चुकून थोडी लवकर गेली होती marketला अन् तिने बघितलं शेवंता थोडीशी लंगडतच साऱ्या भाजीच्या पिशव्या रिक्षातातून काढताना बघितले तशी तिनेचं विचारले काय गं कुठं पडलीसं का काय तसं ती म्हणाली होती नाही ताई लहानपणी चं पोलिओ झाला होता मला. अनु हे ऐकून अक्षरशः उडालीचं होती की एवढ्या adverse condition s असून ही बाई किती खंबीर आहे अन् जिद्दीने काम करते आपलं ध्येय साध्य करण्यासाठी.खरं तरं अनु तेव्हापासून तिची फँनच झाली होती.
आत्ता शेवंता शेजारी तिची थोडीशी मोठी झालेली चुणचुणीत लेकं बसली होती. अनुने तिला विचारले कितवीत शिकतेसं बाळं तू तशी ती अभिमानाने म्हणाली यंदा बोर्डाची परिक्षा देणारं आहे अनुला खूपं कौतुक वाटलं ती शेवंताला म्हणाली "जिंकलीसं ग तू आयुष्याची लढाई." तशी शेवंता म्हणाली अजून नाही ताई हिला मोठी ऑफिसर झालेली बघायचंय मला.अनुला शेवंताचं कौतुक वाटलं होतं तेव्हा.
एक दिवसं अचानक अनु कामावरून येत होती तिला रस्त्यातं पोलिसांची गाडी दिसली तसं तिला वाटलं कसलं तरी petroling चालू असेलं तेवढ्यात तिला ती दिसली तेचं नाक तिचं नजरं अन् अनुला ओळख पटली अरे ही तरं शेवंताचीचं मुलगी.तसं तीनं ड्रायव्हरला सांगूनं गाडी थांबवली. अनु पोलिसांच्या गाडीपाशी पोचली तसं तिथल्या त्या हवालदाराने अनुला विचारले मॅडम काही problem आहे का? तसं तिने उत्तर दिले नाही तुमच्या madam ना भेटायचयं. तसं त्याने सांगितले मॅडम आमच्या madam traffic inspector नाहीत तुम्हाला तसा काही problem असेलं तर तुम्ही पुढच्या चौकातल्या हवालदाराला सांगा. तशी अनु म्हणाली नाही मला तुमच्या चं madam ना भेटायचं आहे एवढ्यात 'तिने चं' मागे वळून बघितले अनुला ठाऊक होते ती ओळखणार नाहीचं आपल्याला पण तिचा तो रुबाब बघून अनुला खूप कौतुक वाटतं होते.तेवढ्यात तीचं म्हणाली yes madam how can I help you अनु दोन मिनिटे शांतपणे तिला न्याहळतं राहिली अन् एकदम भानावर येऊन म्हणाली तू शेवंताची लेक ना आईचे नाव ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळले अनुला कळेचं ना तशी ती म्हणाली हो काकू मला आता आठवले तुम्ही कायमं आमच्या कडूनचं भाजी घ्यायचा ना.तिने लगेचच वाकून नमस्कार केला काकू मी special squad officer म्हणून cbi मध्ये जॉईन झाले आहे आज एक टिप मिळाली होती म्हणून इथे आले होते अन् त्यामुळेचं तुमची भेट झाली . मग नंतर शांतपणे पण थोडी भावुक होऊन तिचं म्हणली पणं माझं हे यश पाहायला आई नाही राहिली या जगात. अनुला वाटले काय हा नियतीचा क्रूर खेळं ज्या बाईने जिवाच्या आकांताने आपल्या मुलीला वाढवले शिकवले तिचे यश बघायला ती स्वतः च नसावी काय ही दैवाची लीला. परत तिचं म्हणाली तीन वर्षापूर्वी sever heart attack ने ती गेली. अनुने स्वतःच्या भावनांवर जरा ताबा मिळवला अन् तिला म्हणाली मुली काहीही असू दे आईचे पांग फेडलेसं अशीच मोठी हो देवं तुझं भलं करो.
अन् अनु तिथून येऊन गाडीत बसली. ड्रायव्हरला म्हणाली चला डोके मागच्या बाजूला टेकवून डोळे मिटून बसली तिच्या कानात शेवंता चे शब्द घुमतं होते ....
ताई हिला मोठी ऑफिसर झालेली बघायचंय मला....

मृणाल वाळिंबे

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कथा. पण कथा काल्पनीक असल्याने शेवंतालाही जिवंत ठेवायचे ना या कथेत. तेवढेच वाचकांनाही समाधान !

छान

छान !!