व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग २

Submitted by समई on 26 December, 2018 - 02:34

आमचा नऊ जणांचा ग्रुप तयार झाला.माझे सख्खे दीर श्रीकर,जाऊ शिल्पा,एक मामे जाऊ वृषाली,एक मावस जाऊ सुलक्षणा,तिची नणंद मृणाल,मृणालचे मिस्टर चंद्रशेखर, माझे एक मावस दीर अजय,ह्यांना आम्ही ग्रुप लीडर केले,माझे मिस्टर शेखर,आणि मी.ही नावे लिहिण्याचे कारण भारतात कंबोडियाहून परत येताना तिथल्या चेक इन काउंटर वरच्या मुलीचा शेखर,श्रीकर आणि चंद्रशेखर ह्या नावांमुळे झालेला मजेदार गोंधळ,तो मी पुढे सांगेनच.सर्व पासपोर्ट, व्हिसाच्या formalities पूर्ण करून(त्या मी इथे देत नाही ,कारण त्यांचे नियम बदलत असतात)16 नोव्हेंबरच्या रात्री १.४०ला एअर इंडिया च्या विमानाने बँकॉकला प्रयाण केले.IMG-20181116-WA0002.jpg

मुंबई एअरपोर्ट वरील फोटोतली नावे डावीकडून उजवीकडे 1) चंद्रशेखर साठे,2)श्रीकर सोमण 3)वृषाली देवधर 4)मृणाल साठे 5)मी 6)शेखर सोमण 7)शिल्पा सोमण 8)सुलक्षणा महाजन.फोटो अजय लेले यांनी काढला म्हणून ते फोटोत नाहीत

आता पूर्व तयारी म्हणजे ह्या दोन देशांचा इतिहास,खाद्यसंस्कृती बद्दल काहीच माहिती नव्हती.तिथले लोक मांसाहारी असावेत असा अंदाज होता,अर्थात मनीष चा सल्ला घेतच होतो.आमच्या ग्रुपमध्ये,शिल्पा,वृषाली आणि मी eggetarian होतो,पण बाकीचे सहाजण पक्के,जे समोर येईल ते चालणारे,उलट जास्तच excited होते.आम्ही तिघीनी आमची उपासमार होऊ नये ह्याची विशेष काळजी घेऊन म्हणजे ठेपले,लोणची,कोरड्या चटण्या,दिवाळीचे फराळाचे घेऊनच निघालो.आम्ही तीन ठिकाणी जाणार होतो. मनीष हो ची मिन्हला रहात असल्यामुळे त्याच्याकडे पाहिले चार दिवस, व्हिएतनामची राजधानी हनोईला चार दिवस व पुढे कंबोडियाला चार दिवस असे 12 दिवस रहाणार होतो.यात येण्याजाण्याचा प्रवासाचा वेळही आहे.हो ची मिन्हला मानिषकडे रहाणार होतो.पुढे हनोईला आणि कंबोडियाला airbnb ची घरे बुक केली.हे सर्व काम अजयने केले.अगदी तिकिटे बुक करण्यापासून.

आता नवीन ठिकाणी जायचे असल्यामुळे तिथल्या हवामानाची माहिती मिळवली.व्हिएतनाम आणि कंबोडियाला wet आणि dry असे दोन मुख्य सीझन आहेत.साधारण नोव्हेंबर ते एप्रिल ड्राय ,व एप्रिल ते ऑक्टोबर पाऊस असतो.हनोई सोडून बाकी ठिकाणी जास्त थंडी नसते,तरी एक स्वेटर घेतला.आम्हाला दोन्ही देशात पाऊस लागला.कंबोडियाला शेवटच्या दिवशी बराच पाऊस पडला.त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला रेनकोट,छत्री ठेवायला सांगतात.पाऊस भरपूर होत असल्यामुळे दोन्ही ठिकाणी नद्या,तलाव काठोकाठ भरलेले दिसले.आपल्याकडे हे दृश्य आता दुर्मिळ झाले आहे.अधूनमधून येत असलेल्या पावसामुळे धूळ कुठेही नव्हती,झाडेही हिरवीगार,टवटवीत होती .दोन्ही देशात घनदाट जंगल होती.लाकूड भरपूर असल्यामुळे दोन्हीकडे फर्निचर खूप वजनदार होती,अगदी छोटे टेबल पण एकट्याने हलवता येत नव्हते.सगळीकडे हिरवेगार,प्रसन्न वाटते.अर्थात रात्री ac लागतो

Airbnb inc.ही अमेरिकन कँपनी आहे जी जगभर,भारतात सुद्धा आहे.ही कँपनी तुम्हाला जगभर कुठेही रहायला भाड्याने टुरिस्टना फ्लॅट किंवा बंगले देते जे well furnished असतात.तिथे तुम्हाला जेवणही बनवता येते.जास्त लोक असले तर इथे रहाणे परवडते.

४,४.30 तासाने मुंबई हुन बँकॉकला पोचलो.इथे ७ तासाचा halt होता.

बँकॉकच्या पटेल स्पॉट येथे आम्ही सहा जण,(म्हणजे एअरपोर्ट वर येणारे इथे फोटो घेतातच).एक फोटो घेणारा,बाकी दोघे विखुरलेले आहेत.
IMG-20181210-WA0022.jpg
मी लिहायचे विसरले.बँकॉकला उतरल्यावर सिंगल एन्ट्री व्हिसा घेतला,सामान ताब्यात घेतले व परत आत आलो.तीन तास आधी vietjet airlines ने हो ची मिन्ह च्या दिशेने कोटीच्या कोटी उड्डाणे उत्तरेकडे ऐवजी उड्डाणे दक्षिण पूर्वेकडे म्हणत प्रयाण केले.साधारण दोन तासांनी विमान काळ्या काळ्या ढगातून खाली झेपायला लागले.खाली असंख्य कालवे असणारी मेकाँग नदीचे समुद्रासारखे विशाल पात्र व नन्तर झाडाआडून डोकावणारी घरे दिसायला लागली. एक उंच टॉवरही दिसला व हो ची मिन्ह हे एक आधुनिक शहर आहे असा अंदाज आला.छोटयाशा विमानतळावर नुकताच पावसाचा शिडकाव झाला होता.तिथे व्हिसाच्या लाईनीत उभे असताना अजयला हातावरचे घड्याळ(fitbit सारखे घड्याळ नुकतेच घेतलेले)पडल्याचे लक्षात आले,नुसताच पट्टा हातावर होता.त्यामुळे प्रथमाग्रासे मक्षिकापात तर नाही झाला असे वाटले. आम्ही व्हिसा घेऊन बाहेर पडल्यावर चंद्रशेखरला ते एक बाजूला पडलेले दिसले व सर्वांना हायसे झाले.अजयकडून एक पार्टी नक्की झाली.सर्व formalities पूर्ण करून आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो.ह्या एव्हढ्या तासांच्या एकमेकांच्या सहवासात हे नक्की झाले की आमची टूर जास्त टुर टुर न होता नक्कीच मजेत होणार.मनिषने आमच्या फिरण्यासाठी एक 9 सीटर व्हॅन आधीच ठरवली होती.

त्याचा ड्रायव्हर आणि गाईड आमची वाट पहात उभेच होते.गाडीत बसून आम्ही हो ची मिन्ह शहरात प्रवेश केला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा प्रवासवर्णन मायबोलीवर पाठवण्याचा पहिलाच अनुभव आहे,त्यामुळे काही चुका पाठवण्यात होत आहेत .पुढे नक्कीच सुधार दिसेल

तुमचा नातेवाइक तिथे राहतो म्हटल्यावर टुअर कंपन्या दाखवतात त्यापेक्षा वेगळं वाचण्याच्या उत्सुकतेत आहे.