गाणे माझ्या मनातले - एका अकेला इस शहरमें

Submitted by vasuraj on 23 December, 2018 - 23:40

याचा विडिओ इथे पाहा

त्या दोघांनी पाहिलेलं स्वप्न
ते दोघांच असतं
दोघांसाठी, एकमेकांसाठी...
पुरं करायचं असतं
एकमेकांच्या साथीनं
आपापल्या भूमिकेनुसार....

पण ते आपापली स्वप्न पण
बघत असतातच की...
ती त्याच्या साठी...
अन् तो तिच्या साठी...
खरं तर ती आपापलीच असतात
पण एक धडपडतो दुसर्‍यासाठी...
कधी कळत... तर कधी नकळत...

पण मग माझं स्वप्न
माझं माझ्यापुरतं
असं काही असतं का...?
दुसऱ्याला गृहित न धरता
दुसऱ्याचा विचार न करता...
असं पण काही करतात का?

असतीलही करत... कारण..

असेल एखाद्यात हिम्मत
असेल एखाद्यात ताकत
पण मग निदान सांगायला
काय हरकत आहे....?
निदान शुभेच्छा तर देता येतील..
पूर्णत्वाचा आनंद
वा अपूर्णतेची निराशा
ती तर वाटून घेता येईल...

कारण ते नुसतेच
जीवन नाही तर सहजीवन आहे...
स्वतःबरोबरच दुसर्‍यासाठी अन्
दुसर्‍याबरोबर जगण्यासाठी आहे...

म्हणूनच ते म्हणतात की...
'वैसे जीने को तेरे बिन भी
इस जमाने में लोग जिते है...
जिंदगी तो उसी को कहते है
जो बसर तेरे साथ होती है...'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults