द बिग पिक्चर - पुस्तक परिचय

Submitted by सनव on 19 December, 2018 - 09:14

द बिग पिक्चर- फाईट फॉर द फ्युचर ऑफ मुव्हीज- ( लेखक Ben Fritz) एकदम छान पुस्तक आहे.
हॉलिवुडमधील गेल्या काही दशकांतील ट्रेंड्स आणि आता पुढे काय, यावर केलेलं भाष्य आहे.

90 आणि अर्ली 2000 पर्यंत हॉलिवूडमध्ये विषयांचं वैविध्य होतं. मानवी स्वभाव, नाती, भावना यांचं चित्रण होत होतं जे जगभर सर्वाच्या मनाला भिडेल असं होतं. Father of the bride मधल्या बापाशी भारतीय पिताही स्वतःला जोडू शकतो किंवा you've got mail सारखि प्रेमकथा जगभर गाजते. टायटॅनिकला तर बॉलिवूडसारखा प्रणयपट म्हटलं गेलं. कास्ट अवे, the pursuit of happiness, erin brocovitch यासारख्या चित्रपटांतून एका व्यक्तीची संघर्षगाथा दाखवली गेली.

पण आता हॉलिवूड म्हणजे marvel असं समीकरण झालं आहे. फँटसीचं अगम्य जग आणि त्यात येत असलेले ठराविक franchise चे चित्रपट. स्पायडरमॅन, अव्हेंजर्स, प्लॅनेट ऑफ एप्स आणि अजून काय काय. त्यात मग कधी न संपणारे सिक्वेल्स प्रिकवेल्स रिबूट्स. So who are these creatures and what did they do to the real hollywood?

या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे पुस्तक.

साधारण आढावा असलेले ट्रेंड्स-
- फँटसी चित्रपटाचं वाढतं वर्चस्व , marvel चा उदय, डिझनीचं साम्राज्य
- तीन चार मध्यम किंवा लहान बजेट चित्रपट बनवण्याऐवजी एकेक बिग बजेट चित्रपट बनवण्याकडे स्टुडियोजचा कल,
- Netflix amazon इत्यादी streaming service वर आशयघन मालिका बनणं व हॉलिवूडचा प्रेक्षक तिकडे वळणं
- द पोस्ट किंवा स्पॉटलाईट सारखे चित्रपट जास्तकरून फेस्टिव्हल्स व अवार्ड सर्कलसाठीच बनणं
- स्टार ऍक्टर्सचा भाव पडणं
- चायनामधून हॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक व त्याचे परिणाम (crazy rich asians!!)
- disney, mattel आदींनी चित्रपटाकडे merchandise promotion चं एक vehicle म्हणून पाहणं (डिझ्नी वर्ल्ड मधल्या टॉय स्टोरी लँड, फ्रोझन राईड्स पासून ते थीम बर्थडे केक, Hallowe'en costume , स्टेशनरीपर्यंत फार मोठी यादी आहे- ज्यांच्या घरात यांचे चाहते राहतात ते अगदी रिलेट करू शकतील.)
- the interview हा चित्रपट, नॉर्थ कोरियन्सच्या धमक्या आणि सोनी हॅकिंग स्कॅन्डल

शेवटी अर्थात पुढे चित्र काय असेल याबद्दल लेखकाने आपले विचार मांडले आहेत. वाचताना कंटाळा येत नाही, बिजनेसबद्दल असूनही पेज टर्नर असलेलं पुस्तक आहे.

हे वाचताना प्रश्न पडला की भारतीय चित्रपट क्षेत्रात असं काही transformation होईल का?
मला दिसलेले काही ट्रेंड्स- बाहुबलीपासून सैराट, काशिनाथ घाणेकर पर्यंत प्रांतीय चित्रपटांना वाढती पसंती, हिंदी हार्टलँड छोटं बजेट चित्रपटांना यश (दम लगा के हैशा, बरेली की बर्फी ते बधाई हो), इत्यादी. अजून काय असू शकतील?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मार्वल युगात अँट मॅन आयर्न मॅन हेच स्टार झालेत. >>>>>>>> Rofl

हिंदीतही यावर्षी जे काही हिट चित्रपट गेलेत, ते सगळे कथानक आणि सादरीकरण यांच्या बळावर... पण याचा अर्थ स्टारची फेस वॅल्यू संपली, असा बिलकुल नाही. उद्या अमीर खान दंगलसारखा एखादा सशक्त चित्रपट घेऊन उभा राहिला तर तो चालेलच.
मात्र येस. परिवर्तन चालुये. आता कुणीही खान प्रेक्षकांना गृहीत धरणार नाही!
म्हणतात ना, चेंज बिफॉर इट चेंजेस यू!!! >>>>>>>>>>> +++++++++११११११११११११

हॉलीवूडचा सगळ्यात मोठा निखळलेला तारा म्हणजे जॉनी डेप! आणि मला वाईट वाटतंय त्याच्याविषयी. ब्रॅड पिट, टॉम कृज, जॉर्ज क्लूनी, विल स्मिथ, डेंझेल वॉशिंग्टन, adam sandler, mark wahlberg, Matt demon ही अजून काही मोठी नावे! >> नावे मोठी आहेत पण हे सगळे दुसर्‍या-तिसर्‍या फळीतले 'कलाकार' आहेत.. अपवाद डेंझेल वॉशिंग्टन.
पहिल्या फळीत.. डॅनिअल डे लुईस (आताच त्याने शेवटचा सिनेमा केला), मायकल कीटन, शॉन पेन (हो अजूनही), जेफ ब्रिजेस, रसेल क्रो, राल्फ फाईन्स, ओल्डमन ही मंडळी आहेत. नेहमीच नीरो, पचिनो, निकल्सन आता तेवढे अ‍ॅक्टिव आणि ईफेक्टिव नाहीत.

दुसर्‍या फळीतून पहिल्या फळीत येऊ शकणार्‍यात - डी कॅप्रिओ, क्रिस्तिअन बेल, मॅकॉनीहे, एड नॉर्टन, फिनिक्स, बार्डेन, डेल टोरो, ब्रोलिन, डेन्झेल वॉशिंग्टन असे अनेक आहेत.
त्यामध्येही .... निसन, चीडल, फॉक्स, स्पेसी असे लोक अध्येमध्ये एवन पर्फॉर्मन्सेस देऊन जातात.
पुन्हा जिम कॅरी, बेन स्टिलर, सँडलर, स्टीव कॅरल, सेथ रोगन वगैरेंचा वेगळा क्लास आहे.
सतत मोठ्या बॅनरच्या सिनेमात दिसणार्‍या कलाकारांना 'मोठी नावे' म्हणणे म्हणजे पुन्हा खानावळीला मोठे कलाकार म्हणण्यासारखेच आहे.

थोडक्यात हॉलिवूडमधली 'कलकाराची व्याख्या' मल्टिडिमेंशन आहे बॉलिवूड अजूनही हीरो/झीरो ह्याच डेफिनेशनमध्ये अडकले आहे.
नसिरुद्धीन, मेनन, ईरफान, नवाजुद्दीन, आ. राणा, वाजपेयी वगैरे पाथब्रेकर्स.

हायजेनबर्ग इथे मी पहिल्या फळीतील तारे म्हणजे हॉलीवूडचे A लिस्टर असलेल्या ताऱ्यांचा उल्लेख केला. लिस्ट खूप मोठी आहे, मला जेवढी नावे आठवली, तेवढी घेतली.
तुमच्या लिस्ट मध्ये हँक्सही ऍड करा ना!
तरीही...
हायजेनबर्ग तुमच्या प्रतिसदापुढे मी माझा प्रतिसाद मागे घेतो!
कारण आय सी ओल्ड हायजेनबर्ग इज बॅक विथ बँग, सो आय एम हॅपी!
वेलकम बॅक!!!!

अज्ञातवासी यावरती एक वेगळा धागाच काढा की. मस्त खूप माहीती आहे तुम्हाला या विषयाची. एक खणखणीत धागा निघेल की. रेफरन्स करता कोणाला 'वाचनखूण' देखील करता येइल.

>>चायनामधून हॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक व त्याचे परिणाम (crazy rich asians!!)>>
अगदी अगदी.
>>>>>>>>>>>> - एशियन देशातून हॉलिवूडमध्ये गुंतवणूक
- एशियन देशात हॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकवर्ग वाढत असणे व एकूण कमाईचा मोठा हिस्सा ओव्हरसीज कमाई असणे
- वरील दोन्हीमुळे कंटेंटवर होणारा परिणाम (उदा. एशियन व्यक्तिरेखांना मिळणारं representation आणि अशी कॅरेक्टर शक्यतो हुशार, सत्शील दाखवणे)
- असे चित्रपट उचलणे ज्यांना भाषेचे बंधन नसेल व जगभर अपील होतील. यात फँटसी हा जॉनर जास्त चालतो.>>>>>>>>
सनव यांच्याशी तंतोतंत सहमत आहे.

राल्फ फाईन्स
>>
तुला रेफ फिन्स म्हणायचे आहे का? Wink

>>>>चायनामधून हॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक व त्याचे परिणाम (crazy rich asians!!)>>
अगदी अगदी.<<
वेट ए मिनट. माझ्या माहिती नुसार हा सिनेमा ऑल अमेरिकन आहे - प्रोड्युसर्/डायरेक्टर पासुन ते डिस्ट्रिब्युटर्स पर्यंत. आता कास्ट अँड क्रुज मधले काहि दिसतात एशियन, पण ते अमेरिकन आहेत... Proud

>>राल्फ फाईन्स>>तुला रेफ फिन्स म्हणायचे आहे का<<
डोंट पुट हिम ऑन दि स्पॉट. बच्चे कि जान लोगे क्या?..

धन्यवाद टण्या,
तो स्वतःला वेल्श ऊच्चाराप्रमाणे रेफ म्हणवतो हे विसरलो होतो. आडनावाचा ऊच्चार मात्र फाईन्स बरोबर आहे.
https://www.youtube.com/watch?v=0p8LCqD-bmc

राज, तुम्ही दरवेळी कसे बरं माझे पाय खेचायला जाऊ स्वतःच पडता.. Proud आय मीन एवरीटाईम..आणि तेही एवढ्या cheeky विषयावरून. Lol
As usual let me enlighten you one more time....

The man's name "Ralph" is pronounced "Ralf" in American English, but often one hears "Rafe" in British English.
"Rafe" in British English tends to be perceived as being the theatrical pronunciation of the word, and is more traditional. "Rafe" is the traditional English pronunciation.

बेटा, नोबडी (इवन इन अमेरिका) अ‍ॅड्रेसेस हिम अ‍ॅज राल्फ (विथ फ्यु एक्सेप्शन्स लाइक यु, अँड आय कॅन अंडर्स्टंड दॅट Wink ). नाउ एफवायआय, इट्स कस्टमरी टु प्रोनांउस नेम्स पर लिंग्विस्टिक जियॉग्रफि (डायलेक्ट), म्हणुन तो रेफ आहे राल्फ नाहि. आता हे डिटेल्स सुरुवाती पासुन माहित नसले कि होतं तसं; अँड अ‍ॅज आय सेड अबव, इट्स ओके (बच्चे कि जान लोगे क्या?), या अर्थी...

उद्या मला तुम्ही "राज" ऐवजी "रा" म्हटलं तर हसं कोणाचं होईल?.. (हिस्पॅनिक लोक म्हणतात तो भाग वेगळा...). Lol

हे पुस्तक मराठीत अनुवादित झालय का? असल्यास वाचायला आवडेल. नसेल तर तुम्ही काढा मराठीत हे पुस्तक, अज्ञा.

सुलू८2 - धन्यवाद, पण
माझी इंग्लिश
You are fool to be my heir!
याचा अनुवाद
माझ्या केसात माळण्यासाठी तू फुल आहेस.
अशी असल्याने,
मी इतकाही पात्र नाही. Lol

नावात मास्तर आहे म्हणून प्रत्येकाला ज्ञान शिकवण जरुरी आहे???
>>

मग! उगाच नाही घेतले नाव

>>>>चायनामधून हॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक व त्याचे परिणाम (crazy rich asians!!)>>
अगदी अगदी.<<
वेट ए मिनट. माझ्या माहिती नुसार हा सिनेमा ऑल अमेरिकन आहे - प्रोड्युसर्/डायरेक्टर पासुन ते डिस्ट्रिब्युटर्स पर्यंत. आता कास्ट अँड क्रुज मधले काहि दिसतात एशियन, पण ते अमेरिकन आहेत... Proud

This was with reference to real life crazy rich asians! They are investing in Hollywood and controlling propaganda.

सनव, आय बेग टु डिफर (बाय स्मॉल मार्जिन Lol
चायनचं इन्फ्लुयन्स वाढण्याच कारण म्हणजे, चायनाचा ओव्हर्सिज मार्केट मध्ये सगळ्यात मोठा शेयर, आणि सगळ्यात जास्त स्क्रीन्स. तब्बल २४००० स्क्रीन्सवर चायनामध्ये चित्रपट रिलीज होतात, त्यामुळे कमाईचा आकडा प्रचंड असतो.
उदा. इंडगेम ने ६०० मिलीयन चायना मध्ये कमावले, आणि 853 मिलियन usa मध्ये. (सोर्स, बॉक्स ऑफिस मोजो, आणि स्कॉट मेंडेल्सन, फोर्ब्स बॉक्स ऑफिस) यावरूनच चायनीज मार्केटचा डोमीनन्स कळून येतो.
जगात आजपर्यंत सिंगल टेरेटरी मध्ये सगळ्यात जास्त कमावणारे चित्रपट
९२७ मिलियन - usa - द फोर्स अवेकन्स
८५० मिलियन - china - उल्फ वारीयर २

यामुळेच चायनीज ओडियन्सला आवडतील, असे चित्रपट बनवले जातायेत.
एशियन मार्केटच सेम mechanism ahe, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!

You are fool to be my heir!
याचा अनुवाद
माझ्या केसात माळण्यासाठी तू फुल आहेस. >>>>>> Rofl

Pages