स्फुट - श्वास

Submitted by बेफ़िकीर on 17 December, 2018 - 19:42

स्फुट - श्वास
=====

तुला एकट्यालाच का हवंय ते?

मलाही दे थोडे आकाश
जिथून
खाली उडताना दिसतील पक्षी,
न बरसणारे ढग
आणि
त्या ढगांमुळे,
न दिसणारी
स्वार्थी, हेकेखोर, त्रस्त,
अहं ने पछाडलेली
मानवजमात!!

जिथे
हवाही असेल विरळ...

इतकी,
की घ्यावाच लागू नये,
एकही श्वास!

-'बेफिकीर'!
(१८.१२.१८)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users