भीमाशंकर येथे कल्याण येथून कसे जायचे. तसंच तिथे एका रात्रीसाठी व्यवस्था होईल का

Submitted by प्राचीन on 17 December, 2018 - 00:03

कौटुंबिक भेट म्हणून भीमाशंकर येथे जाणार आहे. परंतु राहणे व भोजनाची सोय आहे का ते माहीत नाही
कृपया मार्गदर्शन करावे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आहे.
दुपारी साडेबारा कल्याण ते भीमाशंकर बस सात वाजता जाते,( हीच बस दुसरेदिवशी सकाळी सहाला तिकडून सुटते.) देऊळ रस्तासोडून खाली आहे. देवळाबाजुच्याच राममंदिरात खोल्या लहान पण नवीन आहेत. (६५०-८५०)
वरती डेपोजवळच्या रसत्यावरची लॅाज बरोबर नाहीत, (ढेकुण फुकट ) पाण्याची बोंब. देवळाकडे भरपूर पाणी आहे.

२) सकाळी कल्याण - पुणे ( वाया जुन्नर) बस साडेसहाला आहे. तिथून घोडेगावला साडेअकराला पोहोचल्यास पुण्याकडून येणाऱ्या तीन बस मिळतात. अन्यथा शेअर टॅक्सी६०- ८०/-.
पंधराजण कोंबतात.

३)डेपोपाशी रस्त्याकडे दहाबारा हॅाटेल्स चहा पोहे,जेवण,नाश्तासाठी आहेत. देवळाकडे काही नाही. फक्त चहा.
देऊळ पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत उघडे असते.
आरती सकाळी साडेचार, संध्याकाळी साडेसात .

अगदी व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पाण्याच्या उपलब्धतेबद्दल उलट ऐकून होते की देवळात पाणी वा प्रसाधनगृह नाही
आपल्या सूचनेबद्दल आभार

छान.

१) ब्लु मारमान हे भीमाशंकर अभयारण्याच्या हद्दीबाहेर पाचसहा किमी अगोदर आहे॥ तिथून देवळात जाण्यासाठी वाहन लागेल.
२) बसडेपोपासून शंभर मिटर्सवर देवळाकडे खाली जाण्याच्या पायऱ्या सुरु होतात. तिथे डोलीवाले असतात. (४००/-)
अंतर हे रेल्वेचे आठ (१२०-१५० मिटरस)जिने उतरावे इतके आहे, तिथपर्यंत गाववाल्यांच्या कार जाण्यास परवानगी आहे. मातीचा रस्ता आहे॥ इतरांना परवानगी नाही.
३) देवळाच्या बाजुस असलेल्या बोरवेलना भरपूर पाणी कायम असते.
४) वरती कमळजा मंदिरापाशी सरकारने टाइलेट बांधले आहेत पण बोरवेलना पाणी नसल्याने उपयोगाचे नाही.महाशिवरात्रिला टँकरने आणतात.
५) डेपोच्या अगोदर एक किमी एमटिडीसी आहे पण ते बंदच असते.
६) बोद्ध समाजाने एक डार्मिटरी बांधली आहे,ती छान आहे पण एकदोघांना उपयोगाची नाही.
७) ज्यांना फक्त दर्शनच करायचे आहे त्यांनी देवळाजवळच राहावे. पायऱ्या चढउतार नको. गुरुजी जेवणाची सोय करतील.
८) पुणे शिवाजीनगरहून इथे रोज आठ बस, कुर्ला नेहरुनगर एक, मुंबई एक, कल्याण एक बस असतात. दहा किमीवर तळेघर गाव आहे त्याचा बाजार गुरुवारी परंतू जुन्नरचा रविवारचा बाजारच अधिक उत्तम.
९) घोडेगाव हे जन्क्शन इथूनच सर्व बस भीमाशंकरकडे जातात.

आपल्या सूचनांचा उपयोग झाला आणि सध्या आम्ही भीमाशंकर येथे आहोत. बस डेपो जवळ निवासाची व्यवस्था झाली परंतु आता सुट्टी असल्याने जरा महाग आहे. ब्लू मोर्मो न चा योग नव्हता.

तुम्ही राहिलेल्या जागेची व्यवस्था कशी आहे? नाव द्या. साताठ वर्षांपुर्वी वनखात्याने सर्वच बांधकामं तोडली. त्यानंतर फक्त जुन्या लोकांच्या जागा शिल्लक आहेत. मोठ्या सुट्ट्या आल्या की जागा मिळत नाहीत. पायऱ्या सुरू होतात तिथे डावीकडे पूर्वी क्षितिज रेस्टारंट होते. उत्तम होते. ते गेले मागे आणि जागा मालकाने चार खोल्या बांधल्या. पण खास नाही. इकडच्या गाववाल्यांकडे खरे लॅाज लाइसन नाही. कसेतरी उरकतात.

थोडा अनुभव लिहा.

अगदी बरोबर आहे तुमचं. क्षितिज रेस्टॉरंट आहे अजून पण तिथल्या भोजनाचा अनुभव नाही. आता देवळाजवळ ज्या तथाकथित धर्मशाळा आहेत त्या खाजगीत चालवल्या जातात. आम्ही नितीन रेस्टॉरंट च्या मालकीच्या खोलीत राहिलो. अगदीच सामान्य असलेल्या एका लॉजपेक्षा (?) हे ठीक होते. परंतु सीझनमध्ये दोन हजार कमीत कमी एका खोलीचे घेतात असे आढळून आले. आम्ही चार ठिकाणी चिकित्सा व चौकशी केली व हे बरे वाटले
अगदी रात्रीपुरत्या निवाऱ्यासाठी हवे होते त्यामुळे फार अपेक्षा नव्हतीच. पाणी व वीज सोय होती. पण आंघोळीला गरम पाणी तीस रुपये बादली प्रमाणे मिळते. तेही खोलीबाहेरून आणावे लागले.
एकंदरीत सामान्य होते

तथाकथित धर्मशाळा आहेत त्यांच्या खोलीतल्या गाद्या आणि भिंतींत ढेकूण फार आहेत. शिवाय पाणी नाही. सीझन सुट्ट्या नसल्या की खोलीचे आठशे -बाराशे घेतात.
एकूण राहाण्याचे तीनतेरा आहेत.