लहान मुलांविषयी माहिती

Submitted by दक्षा on 15 December, 2018 - 01:56

नमस्कार,

माझा मुलगा ५ वर्षाचा आहे. हुशार आहे त्याच्या लक्षात पण चांगले राहते. पण तो खुप त्रास देतो, त्याला कितीही समजावले तरी तेवढ्या वेळाकरिता म्हणजे जास्तीत जास्त ५ मिनिटे शांत बसणार, परत आहे ते आहेच. घरचे तर सोडा मी स्वता देखिल खुप कंटाळले आहे. मारून तरी किती मारणार. आतातर सगळे त्याला बोरडिंग ला टाक म्हणुन बोलायला लागले आहेत, नाही तो खरच खुप त्रास देतो आहे,त्यात मी सिंगल मदर आहे, सध्या आई कडे असते. कधीकधी असे वाटते त्याला शिस्त लागण्यासाठी टाकावे मिलीटरी बोरडिंग ला आणि मी टाकणार पण आहे पण एवढ्या लहान वयात पाठवणे योग्य आहे का? किंवा एखाद्या डॉक्टर कडे दाखविणे याबाबतीत कृपया मला सल्ला देणे.

धन्यवाद

दक्षा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आजकाल पालक म्हणून आपली सहनशीलता कमी होत चालली आहे का? काही झाले तरी मारू नका. पाच वर्षाचे लहान बाळ आहे. त्याला बोर्डिंगला टाकायचा विचार सुद्धा करवत नाही. या वयात मुले त्रास देतात खूप हूड असतात. नैसर्गिक आहे. उर्जा प्रचंड असते. ती वापरली गेली पाहिजे. ग्राउंड ला पाठवा. पुण्यात तरी पेड ग्राउंड आहेत. तिथे रोज सायंकाळी एक दोन तास फुटबॉल, कबड्डी सारखे अनेकविध खेळ वगैरे घेतात. त्यामुळे मुलांच्या ठाई असलेल्या उर्जेस मोकळे होण्यास मदत होते. रात्री शांत झोपतात, इतरवेळी हूडपणा करत नाहीत.

अनेक मुले मोठी होतील तशी नंतर आपोआप शांत येतात हे सुधा मी पाहिले आहे. बोर्डिंगला टाकायचेच तर पाचवी सहावीला ते सुद्धा खूप चौकशी करून चांगले रेप्युटेशन असलेल्या शाळेतल्या बोर्डिंगला प्रवेश घ्या. घाई नको.

खुप त्रास देतो असं लिहिलंय पण खुप म्हणजे नक्की काय प्रकारचा त्रास देतो? हे स्पष्ट केलेलं नाही आनि ज्याचा त्रास त्याला माहित.
त्यामुळे काय सल्ला देउ कळ्त नाही.
तरीही सबूरीने घ्या. सध्या सिंगल मदर असल्याने आणि माहेरी रहावं लागत आहे म्हणुन तुम्हीही थोड्या चिडचिड्या वैतागलेल्या असु शकता. त्यामुळे ५ वर्षाम्ची मुलं जनरली जितकी मस्ती करतात (काही मुलं कमी काही जास्त) त्यानेही तुम्हाला वैतागायला होत असेल.
तो त्याच्या वयाला सुलभ अशी मस्ती किंवा आगाउपणा करत असेल पण तुम्ही मान्सिकरीत्या थोड्या ठीक नसल्याने तुम्हाला ते सहन होत नसावे. आणि तो खुप त्रास वाटत असावा. बघा विचार करुन.
त्याला बाहेर मैदानी खेळ ,इतर कलेचे क्लासेस लाउन बघा.

नमस्कार,

धन्यवाद अतुल आणि सस्मित, तो त्रास देतो म्हणजे काहीच ऐकत नाही. अभ्यास करायला बसला कि अभ्यास सोडुन इकडे तिकडे बघणे, बसला तरी लक्ष न देणे, तसेच उगाच कोणाला तरी मारणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखादी गोष्ट करु नको तर ती मुद्दाम करतो, त्याच्या टिचर्स पण आता त्याची तक्रार करायला लागल्या आहेत अजिबात कोनालाच घाबरत नाहि.

दक्षा, तरीही मी सांगेन त्याच्या ह्या वागण्याला कुठेतरी आपण (म्हणजे तुम्ही स्वतः ) किंवा परीस्थीती जबाबदार नाही ना हे बघा.
उदा. तुमची मनस्थिती. त्याबद्दल जे मी वर लिहिलंय ते.
आणि तुमचं सिंगल मदर असण्याचं कारण (सॉरी. जरा पर्सनल होतंय हे. पण हे जर हल्लीच झालं असेल तर त्याला थोडावेळ द्यावाच लागेल)
किंवा जर आईकडे हल्लीच रहायला आला असाल तर तिथे जमवुन घेताना त्याला काही त्रास होतोय का?
मी सहसा इथल्या सल्ले मागणार्‍य धाग्याव्र लिहित नाही. पण ५ वर्षांचा मुलगा आहे आणि बिहेवरीयल इश्यु आहे म्हणुन रहावलं नाही.
दक्षा, त्याची आणि स्वतःचीही काळजी घ्या.
आणि ह्या समस्येवर उपाय बोर्डिंग / लांब ठेवणं नक्कीच नाही. बाकी तुमचा निर्णय तुम्ही विचार करुन योग्य तो घ्यालच. Happy

>> सहसा इथल्या सल्ले मागणार्‍य धाग्याव्र लिहित नाही. पण ५ वर्षांचा मुलगा आहे आणि बिहेवरीयल इश्यु आहे म्हणुन रहावलं नाही.
+१११

>> किंवा एखाद्या डॉक्टर कडे दाखविणे याबाबतीत कृपया मला सल्ला देणे.
के इ एम मध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. यातील तज्ञ डॉक्टर्स (Child Psychologists) तिथे आहेत.अशा केसेस मध्ये सल्लामसलत केल्यानंतर उपयोग झाला आहे असा काहींचा फीडबॅक आहे. पण हे पुण्यातले झाले. आपण मुंबईत आहात. जवळपास असेल तर मुंबई केईएम मध्ये प्रयत्न करून पहा. अन्यथा अन्य एखाद्या पण नाव असलेल्या Child Psychologist ची मदत घ्यायला हरकत नाही.

धन्यवाद सस्मित. हो बहुतेक असु शकेल माझ्या वागण्यामुळे हे होण्याची शक्यता मी पण नाही नाकारु शकत नाही. मी स्वतःला पण बदलण्याचे प्रयत्न करेन. परत एकदा धन्यवाद

सस्मित आणि अतुलनी लिहिलेच आहे.माफ करा ,पण तुम्ही लिहिलंय की जास्तीत जास्त ५ मिनिटे शांत बसणार ,त्यावरून तुमचा मुलगा हायपर आहे का यावर फक्त आणि फक्त डॉ.चा सल्ला घ्या.कदाचित तोही या परिस्थितीत नाखूश असेल.त्याला स्वतःला नीट काही सांगता येत नसेल,असुरक्षित वाटत असेल.Child Psychologist कडे नक्की जा.होमियोपॅथीमधेही चांगली औषधे आहेत.
त्याचे हे वय बोर्डिंगमधे ठेवायचे नाही.निर्णय तुमचा आहे.शुभेच्छा!

वर सगळ्यांनी चांगले सल्ले दिले आहेतच,
मी पाहिलेली एक घटना,
नात्यातील एक मुलगी प्रचंड चळवळी होती, अगदी हायपर ऍक्टिव्ह म्हणावी तशी, आई वडील प्रचंड हुशार, पण हिचे अभ्यासाकडे लक्ष नाही वगैरे, त्यात ती दत्तक घेतलेली होती, त्यामुळे तो एक अँगल या सगळ्याला होता,
डॉक्टर उपचार वगैरे सगळे झाले, शेवटी आई वडिलांनी कंटाळून तिला जिम्नॅस्टिक च्या क्लास ला घातली, गेल्या महिन्यात ती नॅशनल लेव्हल सिलेक्शन कॅम्प ला जाऊन आली.

सांगायचा मुद्दा इतकाच की, मूल चंचल असले तरी त्यात इतर गुण लपलेले असू शकतात,

इथे भरपूर लोकांनी बरंच सांगितलंच आहे.
स्वतःच्या मुलावर कितीही प्रेम असलं तरी सिंगल परेंट किंवा फोर्सड सिंगल परेंट(नवरा/बायको परदेशी किंवा दुसऱ्या शहरात) यांच्या साठी पूर्ण 24 तास मुलाला देणं खूप मनाला थकवणारं ठरतं.
आमच्या मूल शाळा ग्रुप वर सुट्ट्या चालू झाल्या की दरवेळी जोक फॉरवर्ड होत असतात.कितीही मजा आली तरी मे च्या पावणे दोन महिना सुट्ट्या संपून मुलाला 13 जून ला शाळेच्या बस ला सोडलं की बऱ्याच आया हुश्श करतातच ☺️☺️याला सहनशक्ती कमी किंवा मुलावर माया कमी वगैरे म्हणून जज केले जाऊ नये असे वाटते.
बोर्डिंग स्कुल चांगले आहे हे खात्रीशीर माहीत असल्यासच विचार करायला हरकत नाही.तेही मुलाला 'पनिशमेन्ट म्हणजे बोर्डिंग स्कुल' असे न वाटता 'जास्त डेव्हलपमेंट म्हणून बोर्डिंग स्कुल' असे पटवता आले तरच.(तारे जमीन पर पाहून मुलांच्या मनावर इतका इम्पॅक्ट आहे की एखादे चांगले मिल्ट्री स्कुल पाहून 'मोठेपणी इथे राहशील का' विचारलं तरी मुलं 'माझं काय चुकलं म्हणून असं म्हणताय' मोड मध्ये जाऊन हमसाहमशी रडायला लागतात.(हीच मुलं 18 ची झाल्यावर आईबाप हॉस्टेल ला पाठवत नाहीत, घराजवळ च्या कॉलेज ला जा म्हणतात म्हणून प्रचंड नाराज असतात ☺️))
एक चांगली शाळा 3 तास आणि पुढे डे केअर 4 तास असे काही करता आले तर स्वतःला वेळ मिळेल.एनर्जी राहील.आणि उरलेला वेळ मुलाबरोबर आनंदात जाईल.

>>मुलाला 'पनिशमेन्ट म्हणजे बोर्डिंग स्कुल' असे न वाटता 'जास्त डेव्हलपमेंट म्हणून बोर्डिंग स्कुल' असे पटवता आले तरच
+11111 Very Important

अभ्यास करायला बसला कि अभ्यास सोडुन इकडे तिकडे बघणे, बसला तरी लक्ष न देणे, तसेच उगाच कोणाला तरी मारणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखादी गोष्ट करु नको तर ती मुद्दाम करतो, >>
Sorry for minglish typing.
He muddam na karane laksha vedhun ghenyacha prakar asu shakato.
I think, jar tumhee avaghad paristhitun jat asal + jar tyala vadalanchi savay asel/te have ase vatat asel tar te vyakta hone asu shakate. Asha veles boarding school definite NO NO. Its like abandoning him when he needs you most.
Parenthood is very difficult. Being a single parent must be more difficult. Tyatun dusaryachya ghari rahane ha hi issue asto (their wishes may pressurize you.). But stay strong. Apale mul Janmala yenyapurvi apala choice hota. Now that kid is here, tyakarata je lagel te 13-14 -15 vayaparyant kelech pahije.

To shant basat nahi, he abhyas karatana ka kadhich nahi? Amachya shalet shantatecha tas asto. Tya veles vargat Valu(sand), ani tee bharata yell, ikadun tikade karate yeil Ashi bhandi thevaleli asatat. Tech panyache. Payjamyat Nadi ghalane, batane lavane - mule guntun jatat.
This is what u can try. Give him colors and let him do what he wishes to do, give him blocks, give him earth(matee), water and let him play. Kagad kapayala dya, tell stories/poems/dance with him - if he does such activities with good attention and attention span, Tyala baki kahi problem nahiye - its situational and he needs ur involvement and support.
in either case pls dont abandon your child. Its very difficult for u, i agree and i am sorry that u r going through this.. But it will impact him lifelong in age when his personality is developing.
Ground cha option ala ahech var.

डॅाक्टरना दाखवणे उठसूठ हे एक खूळ असते.
अभ्यास करत नाही म्हणजे त्याची आवड वेगळी आहे ती शोधावी लागेल. तो टटिव्पाहतो का? कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतो हे पाहा. त्यावरून आवड कळेल. सुटीच्या दिवशी बागेत ( पार्क), समुद्र, मैदान, प्रदर्शन,नाटक,गाण्याचे कार्यक्रम इ नेऊन आवड शोधता येईल

डॅाक्टरना दाखवणे उठसूठ हे एक खूळ असते.
<<

+१११

शक्यतो हाताबाहेर परिस्थिती गेल्याशिवाय / साधा आजार गंभीर होऊन, आटोक्याबाहेर गेल्याशिवाय डॉक्टरकडे अजिबातच जाऊ नये. पैसे वाचतात.

अन वेळ निघून गेल्यावर डॉक्टरकडे जाऊन जर हवा तो गुण ताबडतोब आला नाही, तर ताबडतोब त्या डॉक्टरला बडवून काढून दवाखान्याची शक्य तितकी तोडफोडही करावी.

दक्षा, पालक म्हणुन आपली मुलं ही आपली जबाब्दारी आहे. ती जबाबदारी आउटसोर्स करता येत नाही. लहान मुलांना मारणं हे स्वतःची जबाबदारी न पार पडता आल्याने, आपल्यापेक्षा दुबळ्या लोकांवर राग काढण्याची सोय आहे. तुम्ही जर तसं करत असाल, तर एकदा तुमच न ऐकणार्‍या अ‍ॅडल्ट माणसाला मारून दाखवा. Angry .

>>>डॅाक्टरना दाखवणे उठसूठ हे एक खूळ असते.
अभ्यास करत नाही म्हणजे त्याची आवड वेगळी आहे ती शोधावी लागेल. तो टटिव्पाहतो का? कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतो हे पाहा. त्यावरून आवड कळेल. सुटीच्या दिवशी बागेत ( पार्क), समुद्र, मैदान, प्रदर्शन,नाटक,गाण्याचे कार्यक्रम इ नेऊन आवड शोधता येईल.>>>

खुळं कस? इशु आहे. स्वतःच स्वताला फिक्स करता येत नाहीये. मायबोलेवर सल्ला मागण्यापेक्षा तज्ञाकडून घेतला गेलेला चांगला नाही का ? टिव्ही वरच्या प्रोग्रॅमवरून आवड ? म्हणजे तो हिंसक प्रोग्रॅम बघत असेल तर हिंसा आवडते?

आरारा , सार्कॅझम प्रत्येकवेळी वर्क होईलच अस नाही हा. लोक सल्ला म्हणुन घेतील.:)

टिव्ही वरच्या प्रोग्रॅमवरून आवड ? म्हणजे तो हिंसक प्रोग्रॅम बघत असेल तर हिंसा आवडते? >> सीमा, टॉडलर/ प्रिस्कूलर चिकनी चमेली सारखी गाणी बघत असेल तर तो रेपिस्टच बनतो, असं आपल्या तात्यांनाही मागे टाकेलसं, तर्कट मायबोलीवर हल्लीच वाचलं. सो लोकांचं काही सांगता येत नाही.

मुलाशी भरपूर बोला. त्याला जे आवडतं त्याविषयी बोला. एकत्र खेळा. वेळ मिळत नसेल तर: घर पसरलेलं राहिलं, शॉर्टकट जेवण केलं तर किंवा इतर काही कॉर्नर कट करता आले आणि तो वे़ळ एकत्र घालवता आला तर बघा. तज्ज्ञांना भेटून सल्लाही अवश्य घ्या.

रेपिस्टच बनतो >> manatale shabd have tithe ghala lokanchya nvavar. Happy
By watching crime channels and playing games involving crime, watching sexually offensive material increases crime rates by increasing insensitivity/wrong and unrealistic desires.

This is really funny. People who are denying climate change or are insensituve enough to say climate change is okay/whatever is said is notbreal (just like tatya!), mass extinction is okay , human suffering is okay - and that its okay becauae we will die when we are on top - are comparing others with Tatya! Hilarious!

Post bharakatavanyaurvi, dhagyavar mee kaay mat mandalay, te patatay ka he na baghata dhaga bharakatala taro chalel, maze vaiyaktik scores settle karayachet he mahatvache, nahi ka? Lol

खूळच आहे. डॅाक्टरसुद्धा निषकर्ष कसे काढणार तर निरनिराळ्या शारीरिक मानसिक चाचण्या करूनच. मग आपण नेहमी मुलाजवळ असतो तर काय करतो,पाहतो यातून काही अनुमान काढायची असतात॥ साधा पतंग उडवणे ही मौजसुद्धा शहरात किती दुर्मिळ आणि अशक्य होत चालली आहे.
शाळेनंतर अमचा वेळ आमचा असायचा. असो.
उगाच या खरडींतून वेगळा अर्थ काढू नका.
केवळ एमडी डॅाक्टरांनाच कळतं, घरातल्या आजोबाआजींना काही कळत नाही असा काही समज करून घेऊ नये.
पोस्ट भरकटवत नाही. प्रथम आवड शोधणे एवढंच म्हणतो. इथे वैयक्तिक माहिती विचारून सल्ला देण्याचा उद्देश नसतो. फक्त एक दूरून सल्ला असतो.

प्लिज प्लिज एखाद्याला धागा काढण्याबद्दल जज करून, प्रचंड अग्रेशनची भाषा वाले प्रतिसाद देऊन पनिश करू नका.
Someone is already suffering.
सोशल फोरम वर माणूस एक वेगळा अँगल घ्यायला येत असतो.लिसनर हवे असतात.
प्रत्येकाची सहनशक्ती, प्रॉब्लेम्स शी डिल करायची पद्धत वेगळी असते.एकाची अशी म्हणून दुसऱ्याची तितकीच आणि तशीच असेल असं नाही.
विरुद्ध मतं/सल्ले असू शकतील.पण विषय ज्या वेगाने 'सोल्युशन' वरून 'धागाकर्ते को पकडो,मारो, साले मे खोट है' वर जातो ते भीतीदायक वाटते.
(धागाकर्ते हा माझा ड्यु आयडी नाही.)

Submitted by mi_anu on 18 December, 2018 - 12:20 >>> +१.

हा गोंधळ दुसरा धागा काढुन केलात तर बरं होईल नाही का?
इथे कुणाला तरी खरंच मदतीचा सल्ला हवा असु शकतो
आणि त्यांनी लिहिलेली समस्या गंभीर आहे.
डान्स वैगेरे बसवायचा नाहीये त्यांना.

मी जनरीक वरच्या एका प्रतिसादात लाल अँग्री स्मायली आहे ते बघूनआणि थोडे वाचून म्हटले.कोणावर स्पेसिफिक रोख नाहीये.

कृपया "बेबी अँड चाईल्ड केअर" नावाचे एक पुस्तक आहे. ते वाचा. हे पुस्तक मुलांसाठी नाही अर्थातच आपल्यासाठी आहे. आपण मुले वाढवताना इतक्या टिपिकल चुका करतो ते पुस्तकात वाचताना पण हसू येते. १० वर्षाच्या खाली असलेल्या मुलाची प्रत्येक चूक आपली असते अस त्यात तुम्हाला पटेल.

उदाहरणार्थ तुमच्या बाबतीत ५ वर्षाचा मुलगा एका जागी १० मिनिटे शांत बसून लक्ष देउन अभ्यास करेल अशी अपेक्षा करणे ही पहिली चूक. आणि त्याला तसे मारून मुटकून बसवण्याचा प्रयत्न करणे ही दुसरी चूक.

माझ्या मते तुम्ही स्वतः मुलाच्या कलाने घेत न रागवता काय वेगळ करता येइल हे बघा. त्यासाठी तज्ञाचा सल्ला घ्या. नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. त्यासाठी शुभेच्छा.

@ दक्षा....
१) सिंगल मदर हे आत्ताच झाल असेल तर..तुम्ही स्वत:ला आणि लेकाला वेळ द्या.
२) अतीशय विचार पुर्वक म्हणजे शांतपणे वागा. झाली गोष्ट झाली आहे त्याचा सतत विचार ही करु नका. कधी कधी याचा राग मुला वरती निघतोय का? तपासा. तसे असेल तर त्वरीत हे थांबवा.
३) बाकी सगळ ऐकतोय पण अभ्यास नाही करत आहे तर काही दिवस अभ्यासाच प्रकार बदला. म्हणजे घे पुस्तक आणि कर अभ्यास या पेक्षा अभ्यासाला उपयुक्त काही खेळणी आणा. मोजणे, स्पेलिंग सांगणे, किंवा तत्सम.
४) इतर गोष्टी ज्या करु नको म्हणले की करतो, त्या सांगुच नका. एखादी एखादी मूड बघून सांगा. ऐकेलच ही अपेक्षा ठेवु नका.
५) गोष्टी ऐकणे आवडत असेल तर, गोष्टी तुन काही सांगता येतय का बघा.
६) त्याला पुर्ण वेळ द्या. त्याला अटेंन्ड करा. स्पर्शाचिही गरज असते. ती पण पुर्ण होतेय का बघा.
७) नातेवाईक, मित्र परिवार हे लोक मुलाच्या समोर नको ती चर्चा करत असतील तर त्यामुळे ही मुल बिथरू शकते. कळत काहीच नाही समजेल तो अर्थ लावुन अटेन्शन घेणे असे पण असेल.
८) शारिरीक श्रम होइल अस काही उपक्रम चालु करा. ग्राउंड/योग/कराटे.
९) शाळेतील तक्रारींना महत्व द्या पण त्याच्या शांत असण्याच्या काळात सामजावुन सांगा.
१०) कॉउन्सेलर ची मदत घ्या. त्याने आपण कसे वागावे हे तरी नक्की कळते. त्यामुळे त्या समस्ये कडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळतो आणि उत्तर ही मिळु शकते.
काही काळजी करु नका. सगळे सुरळीत होईल.
खूप खूप शुभेच्छा!

>>>>प्लिज प्लिज एखाद्याला धागा काढण्याबद्दल जज करून, प्रचंड अग्रेशनची भाषा वाले प्रतिसाद देऊन पनिश करू नका.
Someone is already suffering.
सोशल फोरम वर माणूस एक वेगळा अँगल घ्यायला येत असतो.लिसनर हवे असतात.
प्रत्येकाची सहनशक्ती, प्रॉब्लेम्स शी डिल करायची पद्धत वेगळी असते.एकाची अशी म्हणून दुसऱ्याची तितकीच आणि तशीच असेल असं नाही.
विरुद्ध मतं/सल्ले असू शकतील.पण विषय ज्या वेगाने 'सोल्युशन' वरून 'धागाकर्ते को पकडो,मारो, साले मे खोट है' वर जातो ते भीतीदायक वाटते.>>>

अनु, अगं मीच रागाची स्मायली दिलेली आहे म्हणुन मीच उत्तर देते. Happy
अ‍ॅग्री कि डिल करायाची पद्धत वेगळी असते. म्हणुन सल्ला विचारण्याबद्दल काहीच म्हटल नाहीये. पण मुलांना मारण्याबद्दल दुसरी काही प्रतिक्रिया माझ्याकडून येवूच शकत नाही. तुझी येवू शकते का ? मुलांना मारणे हे चुक आहे कोणत्याही परिस्थितीत. आपल्यापेक्षा दुबळ्या माणसावर अ‍ॅटॅक करणे, कमी लेखणे याच समर्थन कित्तीही इशु असले तरी होवूच शकत नाही. पिरिअड.
SRD , आजी/आजोबाना कळतं नाही वगैरे कुठे आल? Did I miss something?
ते 'पतंग उडविणे' ही मौज नसली तरी अन्य मौजी आहेत कि. इट्स नॉट दॅट बॅड. आपल्या मुलांच्या पण भरपुर गंमती जंमती असतात. पण इथे इशु दुसरा असण्याची शक्यता आहे. आणि अशावेळी आपण सगळे ऑप्शन ओपन ठेवले पाहिजेत.
मुलांविषयी कोणताही इशु येवुदे, आपण जे काही असेल /लागेल ते करायलाच पाहिजे याविषयी आपल्यात दुमत नसावं. Happy वेगळा अर्थ कसा निघेल.

<<<मायबोलेवर सल्ला मागण्यापेक्षा तज्ञाकडून घेतला गेलेला चांगला नाही का ? >>>
अर्थातच. फक्त लहान मुलांना मारू नये हा सल्ला नक्की ऐका. जमल्यास दोन तीन दिवस रजा काढून त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. त्याच्याशी जास्तीत जास्त बोला. कदाचित कळेल तुम्हालाच की काय त्याचे म्हणणे आहे. त्याची चूक झाल्यावर एकदम रागावण्या ऐवजी त्याला विचारा असे का केलेस, तुला माहित नाही का असे करत नाहीत. पुनः करायचे नाही.

सीमा,
"मुलांना मारण्याबद्दल दुसरी काही प्रतिक्रिया माझ्याकडून येवूच शकत नाही. तुझी येवू शकते का ? मुलांना मारणे हे चुक आहे कोणत्याही परिस्थितीत. आपल्यापेक्षा दुबळ्या माणसावर अ‍ॅटॅक करणे, कमी लेखणे याच समर्थन कित्तीही इशु असले तरी होवूच शकत नाही. पिरिअड."

हा धागा काढेपर्यंत धागा कर्तीला मुलांना मारणं हा एकच मुख्य आणि छान उपाय आहे असं वाटत असेल असं मला वाटत नाही.आणि तरीही जो काही स्ट्रेस आहे त्याचा परिणाम म्हणून मुलाला थोडे फटके पडत असतील.हे फटके देणारी तू मूर्ख आहेस, तुझा लाल इमोजी देऊन इथे राग आणि निषेध केलाच पाहिजे हे एक्स्प्रेस करून आउटपुट काय?
असा चुकीचा बाहेर पडणारा स्ट्रेस कमी कसा होईल, त्यातून दोघाना क्वालिटी टाईम कसा मिळेल याचे काही उपाय अपेक्षित म्हणून धागा काढला असेल ना?

>> मुलांना मारणे हे चुक आहे कोणत्याही परिस्थितीत. आपल्यापेक्षा दुबळ्या माणसावर अ‍ॅटॅक करणे, कमी लेखणे याच समर्थन कित्तीही इशु असले तरी होवूच शकत नाही. पिरिअड.

+१११ अगदी अगदी माझेच विचार मांडलेत इथे. वृद्ध मातापित्यांवर त्यांची तरुण मुले हात उगारताना पाहिले आहे. तत्व तेच आहे: दुबळ्या व्यक्तीवर अ‍ॅटॅक.

मुलांना मारावे कि नाही हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. mi_anu यांनी म्हटल्यानुसार अनेकदा हे प्रकारजो काही स्ट्रेस आहे त्याचा परिणाम म्हणून होतात हे जरी खरे असले तरी अनेक पालकांच्या मते मुलांना शिस्त लागावी म्हणून शिक्षेचा भाग म्हणून मुलांना मार देणे आवश्यक आहे. एखाद्या कृत्याबद्दल वेळीच शिक्षा केली नाही तर पुढे तेच कृत्य गंभीर स्वरूप धारण करू शकते अशी त्यांची भूमिका असते. (आज पालक म्हणून आपण शिक्षा केली नाही आणि चूक सुधरवली नाही तर उद्या मोठा झाल्यावर कायदा त्याला शिक्षा करेल वगैरे वगैरे युक्तिवाद असतात)

जगभरात प्रत्येक देशांत आणि संस्कृतींमध्ये मुलांना मार देण्याबाबत वेगवेगळ्या भूमिका आहेत. मानवाधिकार जिथे अत्यंत महत्वाचे मानले जातात अशा स्विडन सारख्या काही देशांमध्ये मुलांना मारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. पण दुसरीकडे चीन सारख्या देशांमध्ये मॉलमध्ये "मुलांना शिक्षा करण्यासाठीच्या काठ्या" मिळतात हे सुद्धा खरे आहे.

व्यक्तिश: मी मुलांना न मारण्याचे समर्थन करणाऱ्यांच्या बाजूने आहे. मुलाने गैरकृत्य केले तर पालक म्हणून आपण त्याचे प्रबोधन करणे व ते कृत्य कसे चुकीचे आहे हे त्याच्यावर बिंबवणे हि आपली जबाबदारी आहे. ते करता येत नसेल वा मर्यादा येत असतील तर मारण्यासारखे पाऊल उचलले जाते असे माझे मत आहे. हे सगळे सांगण्यामागे धागा लेखिकेला किंवा अन्य कोणाला कॉम्प्लेक्स देणे हा हेतू नाही. चर्चेच्या ओघात आले म्हणून सांगत आहे.

नमस्कार

खरच तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मला एवढे आधार दिल्याबद्दल, मी मनापासुन प्रयत्न करेन स्वताला आणि मुलाला पण समजुन घेण्याचा.

>>हे एक्स्प्रेस करून आउटपुट काय?>> तुझा मुद्दा समजला पण ,
आउटपुट हे कि यापुढे दक्षा बेन मुलाला मारणार नाही . (जर मारत असेल तर. ) Happy एका बाळाला जरी आपण मार खाण्यापासून वाच्वु शकलो तरी isn't it worth it ? Happy
दक्षाबेन न आता संपवलाय धागा . बास करुया आणि चल तिकडे डास, झुरळ वगैरेच काय करायच ते बघुया. : लोल :

हो सीमा.
दक्षा, तुमच्या आयुष्यात उत्तम बदल घडोत, चांगला सपोर्ट मिळो.
परिस्थिती थोडी सुधारली की इथे नक्की लिहा.

वर कोणी लिहिलेल्या KEM च्या चाईल्ड सायकॉलॉजी विभागाबद्दल मात्र नक्की विचार करा. बेस्ट आहे. नुकत्याच एका मैत्रीणीबरोबर 2-3 वेळा जाऊन आले. ती सुद्धा सिंगल मदर आहे आणि मुलीला discalculia आहे. सुरुवातीला तिने पण खूप चिडचिड केली आणि स्वतःला आणि मुलीला त्रास करून घेतला. आता तिथल्या कौन्सलर्सच्या मदतीने सगळं व्यवस्थित चालू झालं आहे.