खरच मी जग सोडून गेले का ?
आज खूपच हलक वाटतय . फार त्रास होत होता. काहीच कळत नव्हत. गुंगी आल्यासारखं वाटत होत. बर झाल गुंगी उतरली नाहीतर कळतच नव्हत किती वेळ झोपले ते. पण हे काय आई का रडत आहे. माझी मुल एवढी शांत का? कितीही गप्प बसा सांगितलं तरीही न ऐकणारी माझी मुल आज इतकी शांत का? मला बर वाटत नव्हत म्हणून कदाचित काळजीत असतील. पण आई एवढी का रडत आहे. बापरे किती आवाज देते तिला पण तिला काहीच ऐकू का येत नाही. सगळा गोंधळ चालला आहे. मला ना फार गोंधळ झाला कि चीड चीड होते.
सगळेच उदास झाले आहे. काय कारण कळत नाही. पण मला मात्र खूप बर वाटतय . चार दिवसापूर्वी मला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले एवढच आठवत आहे. त्यानंतर आज मी डोळे उघडले असावेत. माझा नवरा एकसारखा ये- जा का करतोय . विचारल्याशिवाय कधीच सांगणार नाही. अहो ऐकाना काय झाल सगळे असे का वागत आहात. पाहिलं ह्यांना सुद्धा माझा आवाज एकू येत नाही. मला मात्र या बाल्कनी मध्ये खूप छान वाटत आहे. बेडवर खूप त्रासले होते. ते सलाईन सुया पाहून भीती वाटते मला. मोकळ्या हवेत मात्र खूप बर वाटत.
चला आवरायला पाहिजे आता घरी जायचं आहे. घरातून निघाले तेव्हा मात्र खूप पसारा होता घरात. काय करणार बरच वाटत नव्हत. निघताना माझ्या मैत्रीण म्हणाल्या लवकर ये घरी. मला हॉस्पिटल मध्ये जाऊन सकाळची संध्याकाळ झाली तरी त्या पहायला आल्या नाही. मी आईलाही म्हणाले. मग तिने सांगितलं त्या दोघी येऊन गेल्या . तू उठलीच नाही. बर वाटल ऐकून . माझ्या मैत्रिणी येऊन गेल्या ते. खूप मैत्री आहे आमची. सतत सोबत. आमच्या मैत्रीची एक गम्मत सांगते. आमच्या घरापासून अगदी जवळ स्मशान भूमी आहे. केर टाकायला तिकडेच जातो आम्ही. नेहमी आमचा एक विषय असतो. जी अगोदर मरणार तिने येऊन सांगायचं स्वर्ग मिळाला कि नरक. आणि अस बोलून खूप हसायचो. का तर स्वर्ग असेल तर पुण्य करायचं म्हणजे सर्व तिथे भेटू. नाही तर राहू नरकात मजेत. काय आमची मैत्री. हसू येत खूप. आम्ही एखाद स्वप्न पडल तरी एकमेकीना सांगतो आणि त्यावर तर्क करत बसतो. कधी घरी जाईन आणि सांगेन अस झाल आहे. खरच फार भयानक स्वप्न होत. पूर्ण हादरलेच मी. माझ्या बरोबर काहीतरी विचित्रच घडत आहे. गेले चार दिवस मी चक्क देवासोबत भांडत होते अस स्वप्न पडल. का तर तो मला घेऊन जातो म्हणाला. सांगत होता एका हातावर स्वर्ग आहे आणि एका हातावर संसार तू निवड कर. किती त्रासले होते मी. काय निर्णय घ्यावा कळतच नव्हत. पण विचारलं मी स्वर्गासाठी अस मुलांना सोडून येऊ का? तर म्हणे तुझ्यावाचून काहीच बिघडणार नाही त्याचं. पाहिलं का आता काय हे बोलन . आईशिवाय मुल कशी राहू शकतात. ह्याला काय देव हा. त्याला सगळ्या माया येतात. त्याला खर्या आईची माया नाही समजणार. आईची प्रेम मिळाव म्हणून जन्म घेतो हा. पण आतापर्यंत शक्ती हीन होऊन जन्म घेतला का याने . सध्या माणसाला जगायला किती त्रास होतो हे याला काय समजणार. आपण मात्र सारखे याचे गुण गायचे. स्वप्न असल म्हणून काय झाल खूप भांडले. पण शेवटी मलाही पटल माझ्यावाचून कोणाला काहीही फरक पडणार नाही तर संधी का सोडायची. मी स्वर्ग निवडला. बर झाल स्वप्नच होत. नाहीतर कोणालाही काहीही न बोलता भेटता गेले असते.
अस आहे माझ बोलायला लागले कि खूप बोलते. काय करू चार दिवसात फार शांत राहिले म्हणून जास्तच बोलावस वाटतय. पण आता आतमध्ये जाव लागेल. बराच वेळ झाला मी बाहेर उभी आहे. जाते आई आत येण्याअगोदर बेडवर झोपल पाहिजे . नाहीतर आधीच रडली आहे. आणखी चिडणार. तिला मी कधीच नाराज केल नाही. ती जे सांगेन तेच ऐकलं. म्हणून तर फार जीव आहे तिचा माझ्यावर.
आईचा विचार केला कि मला खूप वाईट वाटत. नेहमी दुसऱ्यासाठी जगत आली. माझी मावशी दोन लहान मुली व सव्वा महिन्याचा मुलगा मागे ठेऊन अकाली जग सोडून गेली. तिला स्वतःला सख्खे म्हणजे तिची आई आणि लहान बहिण ( म्हणजे माझी आई ) . मोठ्या मुलीच्या जाण्याने माझी आजी फारच खचली होती. मुलीच्या जाण्यापेक्षाही या तीन मुलाचं कस होणार ? आपल्या विदुर जावयाला मुलगी मिळेल पण ह्या लहान मुलांचा पोरकेपणा मात्र दूर होणार नाही ह्या विचाराने ती अस्वस्थ होती. जीवनात अचानक आलेला हा काळोख काहीही सुचू देत नव्हता सर्व दिशा गडप झाल्या होत्या.
सर्व संपल अशी मनाची अवस्था असताना अचानक एक विचार चमकला. काय होता तो विचार ? अगदी साधा होता कि कोणच्या आयुष्याच समर्पण होत. कि एकीचा संसार सावरण्यासाठी दुसरीची आहुती. केवळ लहान मुल पोरकी होऊ नये हा एकच विचार तिची पाठ सोडत नव्हता. अंधारात गडप झालेल्या दिशा अचानक प्रकाशाने न्हाऊन निघाव्यात अस वाटल तिला.
ना कुठली परवानगी ना कुठली चर्चा. एकच वाक्य .. '' बाईच्या मुलांसाठी तुझ बाईच्या नवऱ्याशी लग्न करायचं ठरवलं आहे.'' मुलांना सांभाळायचं आहे तुला. नाहीतरी म्हणच आहे आई मरावी आणि मावशी उरावी असा आदेश दिला आजीने आईला.
लग्न .... वयात आलेल्या मुलीला लग्नाचा विषय काढला तरी किती लाजायला होत. कळत नकळत गालांवर लाली येते. ज्या व्यक्तीला पाहिलं हि नाही त्याचा विचार सुरु होतो. कसा असेल दिसायला . नेमका कसा असेल. कस वागवेल आपल्याया . एक न अनेक प्रश्न . मग मुलगी शिकलेली असो कि अडाणी भावना कमी अधिक प्रमाणात सारख्याच असतात.
पण .... हा दोन अक्षरी शब्द खूप काही सांगत असतो.
आजीने कुठलाही प्रश्न न करता किंवा कोणतेही म्हणणे न विचारता काढलेला हा तर आदेश होता. तोही का तर केवळ आपल्या नातवंडाना सावत्रपणाची झळ बसू नये म्हणून . भावनाहीन झाली आई हा आदेश ऐकून . असंख्य विचार मनात येत होते पण काय बोलावे व का बोलावे हे तीच तिलाच काळत नव्हत . आजीच्या इच्छेनुसार लग्न पार पडल. बहिणीच्या तीन मुलांना जवळ करून क्षणापूर्वी एक अल्लड असणारी मुलगी आता तीन मुलांची आई झाली होती .
संसार बऱ्यापैकी चालू होता. पूर्वी ज्याला दाजी म्हणावं लागायचं तोच आता नवरा झाला होता. संवाद घडायचा तो फारच क्वचितच म्हणजे मुलीला अमुक हव आहे. मुलासाठी कपडे हवे असे. या सर्व गोष्टीत ती स्वतःला परिपूर्ण विसरली होती . आपल स्वतःच आयुष्य नेमक कस असाव हे तिला स्वतःलाही कळत नव्हत. स्वतःला पूर्ण झोकून दिल होत बहिणीच्या संसारात. पण तरीही सतत आई सांगायची मुल स्वतःची म्हणून सांभाळ.
खूप ओढाताण व्हायची तिची अचानक आलेल्या जबाबदारीमुळे. कधी कधी ती भांबावून जायची . पण मुलांकडे ती तितक्याच प्रेमाने पहायची. त्याचं सर्व करायची . लग्नाला आता जवळपास २ वर्ष झाली होती. एकदिवस आजी जवळ बसून म्हणाली तुला एक सांगायचं आहे. बाईची मुल तू आईसारखीच सांभाळते पण .....
तुला तुझीपण मुल असायला हवी. म्हातारपणी कोण पाहणार तुला. आईच्या ह्या वाक्याने ती चिडली कशासाठी मुल पाहिजे. या मुलांना सांभाळते मग हीच बघतील मला. खूप खूप मनस्ताप करून घेतला तिने पहिल्यांदा . आजी मात्र तिला ह्या ना त्या मार्गाने समजावत होती. तिला मात्र एकच प्रश्न पडला होता. कि ज्या मुलांना सावत्रपण सोसायला लागू नये त्या मुलांसाठी मी कसलाच विरोध नकरता लग्न केले ती मुल मला म्हातारपणी सांभाळू शकणार नाही का ? मग जर हे असे होते तर माझ आयुष्य अस का दावावर लावल. खूप विचार करत होती ती. काहीही झाल तरीही मुल नकोच हा तिचा ठाम निर्णय होता. कारण जन्म दिला नसला तरीही ती मनापासून आई झाली होतीच.
आपली बायको कोणत्या विचाराने उदास आहे हे आबांना समजल . त्यांचही मत तेच ठरलं कि तुलाही तुझी मुलं हवी. मग मात्र आईने आबा आणि आजीवर तोंडसुख घेतलं. खूप निराश झाली होती ती ह्या दुट्टपी बोलण्याने. स्वतः कुढत होती. खरच मला माझ कोणीतरी हव का ? पण मी ज्या मुलांची आई झाले ते मला अंतर का देतील. सर्व आपलेपणाने करत असताना अचानक आपल काहीच नाही आपण केवळ निमित्त आहोत याची जाणीव व्हावी अस वाटल तिला. मग तिलाही वाटू लागल मला माझ स्वतःच बाळ हव . जे केवळ माझ असेल. त्यावर केवळ माझा हक्क असेल. ज्याला मी , माझ मन , माझ्या भावना न सांगताही समजतील . एक ना अनेक विचार केले तिने.
.... तीच पहिलं बाळ या जगात आल. हो माझा जन्म झाला. मी गोरीपान, गुटगुटीत भरपूर बाळस. माझ्या येण्याने खूप मोठा आधार मिळाला. कर्तव्य करत असताना आपलेपणाचा ओलावा तिला मनोमन सुखावत होता. आपल बाळ आता बोबड बोलू लागल याच तिला फार अप्रूप वाटू लागल. आई हा शब्द ऐकण्यासाठी ती आतुर झाली होती. पण तिची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कारण मी पण तिला मावशीच म्हणू लागले. माझ्यानंतर दोन वर्षांनी माझा भाऊ गणेश जन्माला आला. आता तर तिला फार परिपूर्ण वाटत होत.
मी म्हणजे तिची जणू काय मैत्रीण. मी सतत तिच्या अवती भोवती असायची . आईला प्रत्येक कामात मदत करायची. आपण काम करतो हे वडीलांना कळू द्याच नाही हे आईने मला सांगितलं होत. कारण काय तर त्यांना ते मान्य नव्हत म्हणून. मग झाल आईची ओढाताण कमी करायची जबाबदारी मी घेतली. संध्याकाळी मी स्वतः पोळ्या लाटायला जाऊ लागले . आबा म्हणजे वडील घरी येण्याअगोदर मी माघारी यायची.
आबांना आमच्यापेक्षा आमच्या मोठ्या भावंडाच फार कौतुक आहे. . ते आपल्याशी मोकळेपणाने का बोलत नाही. याचा मला प्रश्न पडायचा. खूपच घालमेल व्हायची विचार करून. अस का ? हा एकच प्रश्न मला सतत बोचत रहायचा. गणेश पेक्षा आबांना अरुण जास्त जवळचा वाटतो. हे मी निरीक्षणातून जाणले होते. पण विचारणार कोणाला. सतत हेच दृश्य दिसायचं घरात. गणेश आणि मला आबा नेहमी डावलायचे. हे आईलाही कळत होत. मोठ्या मुलांनी काही मागितलं कि लगेच मिळायचं. पण गणेश आणि मला नेहमी वाट पहावी लागयची. न राहवून एक दिवस आईला आबा असे का करतात हा प्रश्न विचारला ?
काय सांगाव या मुलांना हा प्रश्न आईला पडला. स्वताच्या जीवनाची कहाणी तिने मला सांगितली. त्यावेळी मला सर्व खरा प्रकार कळला नाहीतर मलाही माहित नव्हत. शिवाय आईने कधी सांगितलंही नव्हत कि मोठे तिघे तीचे मुल नाहीत ते. तीच मन हलक झाल. पण " आपला जन्म केवळ हिलाही स्वतःच मुल हव या भावनेतून झाला आहे." या विचाराने मला अस्वस्थ वाटू लागल . पण माझ्या येण्याने आईला कसा आधार वाटला. तिचे आयुष्य कसे बदलले हे ऐकून मी फारच भावूक झाले . आपण लहान असूनही आपला आधार आईला वाटतो या विचाराने मी भारावून गेले होते . आणि त्या क्षणापासून मी पूर्ण बदलून गेले . आपल्या आईला केवळ आपणच आहोत हे मला कळून चुकल होत . त्या क्षणापासून आपल्या आईला सदैव हसत ठेवायचं , तिला कुठलंच दुख होऊ द्यायचं नाही हा ठाम निर्णय घेतला. तेंव्हा पासून आजच्या क्षणापर्यंत मी केवळ आईसाठीच जगत राहिली.
किती प्रयत्न करते मी तिला हसत ठेवायचा. पण ती बघा कितीतरी वेळ माझ्याकडे दुर्लक्ष करून रडत बसली आहे. माझा आवाज सुद्धा ऐकू येत नाही तिला. मला वाटतय मुलांनी तिला फार त्रास दिला असेल. वय झाल तिचही म्हणून सहन होत नाही तेव्हा रडत असेल. चला कोणीतरी येतंय बाहेरून मला बेडवर गेल पाहिजे.
बापरे ....
हे काय मी तर बाल्कनीत होते. आणि हे कोण माझ्या बेडवर झोपल. किती गुरफटून घेतलंय. तोंडावर घेऊन झोपल कि मला तर गुदमरत. उठवू का झोपेतून . काय करू एखाद्याला झोपेतून उठवण बर दिसत नाही. झोपू देत. मलाही कोणी झोपेतून जाग केल कि भयंकर राग येतो. पण काय करू कोणीतरी येतंय. मला बसलेल पाहिलं तर पुन्हा ओरडतील. काय करू कुठे जाऊ. त्या पडद्यामागे उभी राहते. म्हणजे कळणारच नाही.
हे काय आई, मोठी बहिण, माझा नवरा सर्वच आलेत कि . एका माणसाला घरी घेऊन जायला एवढे लोक लागतात का ? सगळेच आतुर झालेत मला भेटायला. बरोबर आहे गेले चार दिवस मी काहीच बोलले नाही म्हणून आलेत सर्व. आता माझ्या जागेवर दुसर्या कोणाला पाहून आई अशी चिडणार ना . माझी अक्कल काढणार. आणि जे झोपलेत त्याचं काही खर नाही. सगळेच बेड जवळ थांबलेत . कोणी चेहरा का पाहत नाही. कोण झोपलं आहे हे सुद्धा पाहत नाही. आता मलाच ह्यांना सांगायला लागणार कि मी बाल्कनीत असताना कोणीतरी माझ्याजागेवर येऊन झोपल आहे.
बाईला म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला आवाज देते. ती सर्व बरोबर करेल. चार वेळा सांगून झाल बाई मी इथे आहे. चला सर्व आवरल. तरीही तीच लक्ष नाही. अग मी तुझ्याशी बोलते. तू काय डोळ्यांना पदर लावतेस. अरे देवा हि पण रडती होय. पण कितीही रडत असलो तरी आवाज तर कळतोच ना. माझ्याकडे कोणीच का पाहत नाही. माझा आवाज कोणाला ऐकू येत नाही . मी इतकी शेजारी उभी आहे तरी बाईला दिसत का नाही. आता तर मलाच शंका येऊ लागली आहे. माझा आवाज ह्यांना खरच ऐकू येत नाही कि मला विनाकारण त्रास देत आहेत.
आता ह्यांना कळायला हव मी जवळच उभी आहे. मी स्वतःच जाऊन पांघरून काढते. म्हणजे कळेल सर्वाना. माझ्याजागेवर दुसरच कोणी झोपल आहे. मी इतकी पटकन पुढे झाले तरी कोणालाही माझा धक्का लागला नाही. तस बरच झाल. हे काय ? मी साधी चादर पकडू शकत नाही. का काय झाल मला . काहीतरी वेगळच होतय . मी काहीही पकडू शकत नाही. मला कोणी पाहू शकत नाही. माझा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. काय चालल आहे. सांगा कोणीतरी किती वेळ मी तळमळत आहे. माझ्या माणसांशी बोलायला. त्याना सांगायला मी ठीक आहे. काळजी करू नका. पण मला काहीच का जमत नाही. कितीही प्रयत्न केले तरी मी काहीच करू शकत नाही. मला फार भीती वाटायला लागली आहे.
मला जाणवतय ते खर आहे कि भास होत आहेत . कदाचित भासच असणार माझे कारण मला जाणवतय ते सर्वांना जाणवायला पाहिजे नाही का? कस असत आपल कोणी एकल नाही कि किती राग येतो आपल्याला. जाऊदे कोणी ऐकत नाही तर काय करणार. अस वाटतय न सांगताच घरी जाव निघून. नेमक काय करू? जाऊ कि नको. पण जर ह्या सर्वांना मी इथे दिसले नाही तर किती घाबरतील हे सर्व. कोणी माझ्याकडे दुर्लक्ष केल कि मला तर सहन होत नाही. जाऊदे ह्या सर्वांना थोडा त्रास देते. जातेच न सांगता.
रिक्षा , रिक्षा .....
काय हा मोकळा चालला आहे तरी थांबला नाही. चला ती मोकळी दिसते त्यामध्येच बसते सांगते नंतर कुठे जायचे ते. येणार नाही म्हणाला तरी उतरणारच नाही. फारच करतात हे रिक्ष्यावाले . मनाला वाटल तर येतात नाहीतर सरळ नाही सांगतात. हे काय मी बोलायच्या आधीच हा निघाला. चांगल आहे. मला हव त्या दिशेनेच चालला आहे. मग काय जाऊ या मधेच थांबलाच तर सांगते कुठे जायचे ते. पाहता पाहता आले मी . ये बाबा आता थांब . मला उतरायचं आहे. हे काय थांबला कि म्हणजे माझ बोलन ऐकू येतंय ह्याला. याचाच अर्थ माझीच लोक मला छळत होती एवढा वेळ.
किती झाले पैसे ? पाहिलं बोलत नाही. माझे पैसे घ्यायचे सोडून दुसर्याशी गप्पा मारायला लागला. काय हा माणूस उतरले नाही तर याची बसायची घाई. दुसर्या बाजूने उतरते. अरेच्या गेला पण हा . पैसे सांगितले नाही . तसाच गेला . कुठल्या नादात आहे काय माहीत. पण एक बर झाल. घाईत मी तरी पैशाचं पाकीट कुठे घेतलं . पण पैसे न देता फुकट आले याच कस तरीच वाटत. ठिक आहे कधी भेटला पुन्हा तर देईन आठवण करून.
इथून चालत जाव लागेल. नेहमी हा चढ चढताना खूप धाप लागते. पण आज अस काहीच वाटत नाही. मी तर छान तंदुरुस्त झाले. पट पट आले तरी काहीच थकवा वाटला नाही. पोचले एकदाची. माझी मैत्रीण नेहमी सांगते आपल्याला सर्व जवळ कुठेही जाव लागणार नाही. विचारांच्या तंद्रीत धडपडले असते . आईग..... खूप जोरात ठेच लागली. पण रक्त नाही आल हे छानच झाल. कोण येतंय काही कळेना पण किती छान साड्या घातल्या ह्या बायकांनी. आज लग्न आहे वाटत कार्यालयात . खूप सुंदर दिसतात बायका व्यवस्थित आवरल कि. आम्ही गेल्या १५ दिवसांपूर्वी असच छान नटून वडाची पूजा करायला गेलो होतो. त्या दिवशी मात्र सकाळपासून पाऊस पडत होता. आणि आम्ही तो थोडावेळ थांबवा अशी वाट पाहत होतो. सर्व आवरून बसलो होतो. पाऊस थांबला रे थांबला कि लगेच निघायचं होत. तस झाल पाऊस थांबला आणि आम्ही निघालो. पण म्हणतातन ना एखाद्या कामाला काही खिळ बसली हि बसली. वडाच्या झाडाजवळ गेलो तर त्याच्या पारंब्या खूप खाली आल्या होत्या. त्यामुळे पारावरून प्रदक्षिणा जमनार नव्हती. खालून मारावी तर शेजारी गाय बांधली होती. ती सारखी अंगावर येत होती. त्यामुळे बाकीच्या सर्व लांब उभ्या राहिल्या. पण मी मात्र प्रदक्षिणा पूर्ण केली. तर माझी मैत्रीण चेष्ठेत म्हणाली काय विशेष मिळाल का तुला रात्री. तेव्हा जीवाचा एवढा आटापीटा चालला आहे. त्यावर मी हसले आणि काही नाही काही नाही म्हणाले. तो दिवस खूप आनदांत गेला माझा. त्यानंतर थोडी आजारी झाले . अशक्तपणा आला, भूक लागेना त्यामुळे औषध चालू केल. त्या दिवसानंतर आज एकदम छान वाटत आहे.
पण एक सांगू का मला खूप छान वाटत आहे. अगदी हवेवर तरंगल्यासारख. जणू काही मला आत्ता कुठे स्वातंत्र्य मिळाल आहे. मनावरच ओझ ताण नाहीस झाला त्यामुळे मन खूप प्रसन्न झाल आहे. अगदी अल्लडपणे नाचव वाटत आहे. पाऊस पडून गेल्यावर वातावरण जस छान हिरवगार वाटत अगदी तसच वाटत आहे. आपल मन किती नाजूक असत क्षणात कुठे कुठे फिरून येत. जे आपण सत्यात करू शकत नाही तेच ते कल्पनेत करून जात. आज मी खूप आनंदी आहे. पण वातावरण मात्र किती उदास झाल आहे. पाऊस पडून गेल्यावर पडणार ऊन किती छान वाटत पण आज ती मजा नाही वाटत. सकाळपासून फक्त माझे तर्क वितर्क चालू आहेत. मनात भीती एकाच गोष्टीची ती म्हणजे मी बेडवर नाही हे पाहून आईचा संताप अनावर होणार आणि आल्या आल्या ती मला मनसोक्त झापणार . पण ....
इथे इतकी गर्दी कसली झाली काही कळेना. आमच्या मागच्या चाळीतला म्हातारा गेला वाटत. खूपच आजारी होता. एक प्रकारे बरच झाल. अस अंथरुणात पडून राहण्यापेक्षा जीव मोकळा झालेला केव्हाही चांगलं. पण ...
माझ्या मैत्रिणीच्या दारात ह्या बायका का उभ्या. देवा हिला काही झाल नाही ना. नेहमी म्हणते मी मोठी आहे वयाने माझा नंबर पहिला. नाही... तिला काहीच होणार नाही. मन किती वाईट असत ना . किती वाईट विचार करत राहत. घरात जाऊन बघते नेमक काय झाल . बर झाल देवा माझी मैत्रीण ठीक आहे. तिला पाहून खूप बर वाटल. मुलं पण ठीक आहेत. तिचा नवरा मात्र दिसत नाही. काय झाल कस विचारू. हे काय आला कि हिचा नवरा. हे मात्र छान झाल सर्व ठीक आहेत. पण हि इतकी का रडत आहे. अगदी पायात डोके घालून बसली आहे. तिला कळल नाही मी आले ते. माझी दुसरी मैत्रीण शेजारीच राहते. ह्या दोघी बहिणी आणि मी अस आमच त्रिकुट. तिला विचारते.
हि म्हणजे तोफ . सरळ बोलणार . राग येवो किंवा काहीही होवो. पण मनाने खूप छान आहे. कोणाबाबत बोलते काही कळेना . पण गेल्या चार दिवसात खूप काही घडलं वाटत. कोणासाठी पूजा केली. नवस बोलली . काहीतरी सांगत आहे. पण ह्या बायका इथेही जमल्या . मला या गोंधळामुळे काहीच सुचेना. सकाळ पासून फक्त विचार आणि विचार. काहीच ताळमेळ लागेना. आजचा दिवसच खराब. कोणीच माझ ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. माझ्याकडे पाहिलं तिने पण मला काहीच का सांगत नाही. चार दिवसात मी परकी झाले का. साध विचारल पण नाही बरी आहेस का ? आता मात्र मला थकवा वाटतोय. मनाने थकले खूप. ताण आला प्रचंड . थोडा आराम करते घरी जाऊन.
हे काय दरवाजा बंद का? चक्क कुलूप लावलंय . बरोबर हे हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आले आणि मी नसांगता निघून आले. चुकलच माझ, सांगायला पाहिजे होत. किती काळजीत असतील सर्व. आत्तापर्यंत कळल असेलही कि मी जागेवरच नाही. आई तर जाम चिडणार. अगदी अक्कल काढणार माझी. जाऊदे तसही तिला रागवायची संधी दिलीच नाही कधी. पाहू कशी चिडते माझ्यावर.
पण ....
सगळे अचानक धावाधाव का करायला लागले. माझ्या दोघी मैत्रीनीही बाहेर आल्या. आणि हे काय माझे सर्व लोक कोणाला घेऊन आले. काय झाल नक्की . नक्की कोण गेलंय माल तर काहीच समजेनास झाल आहे. मंजू मंजू कोण रडत आहे. मला बोलवल आहे जाते मी जवळ. अरे हे तर माझ्या नावाने रडत आहेत. किती बावळट आहेत सर्व.. गैरसमज झालेत सर्वांचे. आत्ता लक्षात आल माझ्या. हे काय चालल आहे. मी बाल्कनीत होते. त्यावेळी माझ्या जागेवर कोणी येऊन झोपल. डॉक्टर आले असतील तपासलं तर ती झोपणारी व्यकी गेली असेल. आता माझ्या बेडवर आहे म्हणल्यावर अमुक बेडवरची व्यक्ती गेली अस जाहीर केल असेल. तोंड झाकून गेले असतील. कोणी तोंडावरच दूर करून पाहीना . मी करत होते तर मला जमल नाही. म्हणून मी पण निघून आले. त्यामुळेच सर्व गोंधळ झाला.
मी गेले अशी बातमी पसरली असेल म्हणून माझ्या मैत्रिणीच्या दाराजवळ गर्दी झाली. दुखामुळे मी समोर असूनही दोघींना कळेना. किती हा गोंधळ. म्हणूनच आई रडते वाटत. काय करू जाऊ का पुढे. पण मी समोर दिसल्यावर सगळेच चिडतील. मागेच थांबते. चेहरा उघडला कि समजेन सर्वांना. मग मी पुढे जाईन सर्वांच्या. माझ्या मूर्खपणामुळे किती गोंधळ झाला. आता माझे सर्व दुखी झाले जेव्हा हि व्यकी कोण हे कळेल त्यावेळी तिच्या घरच्यांचे असेच हाल होतील . खरच फारच चूक केली मी घरी येऊन.
पाहिलं का? चेहरा उघडला नाही आणि अंघोळीसाठी पाणी ठेवलं. माझी मूलपण आली . बापरे किती उदास दिसत आहेत. मी गेले हि अफवा फार महागात पडली. लेकर माझी कोमजून गेलीत. बाई काय करते काय माहित. कुठे राहिली हि. आली वाटत. वाकली का? चला हिला तरी कळल तोंड उघडायच. सगळे गैरसमज संपतील एकदाचे.
मंजू , मंजू, काय हे चेहरा पहिला तरी सर्व माझ्यानावाने का रडायला लागले. आता मात्र मला सहन होत नाही. पाहतेच कोण आहे?
अंगातला त्राणच निघून गेला. सर्व एकमेकांना धरून , गळ्यात पडून रडत आहेत. पण मी कुठे जाऊ. कोणाच्या गळ्यात पडून रडू. मला काहीच समजत नाही. डोकं गरगर फिरायला लागलंय . ती झोपलेली व्यक्तीतर मीच आहे. स्वतः डोळ्यांनी पाहिलं मी आत्ता. काय करू कोणाच्या गळ्यात पडून रडू कळेना मला. रात्री मला घरडा लागला तेव्हा हे जवळ होते मला जवळ घेतलं होत. मी बेडवर अस्वस्थ होते. त्यावेळी मला मिठीत घेतलं ह्यांनी. प्रत्येक श्वासाबरोबर उचकी लागली होती. तोंडातून रक्त बाहेर पडत होत. ह्यांचा शर्ट पूर्ण रक्ताने भरला होता. हे मी कशी काय विसरले. सकाळचा उत्साहच एवढा होता कि मी सगळच विसरले. मला बराच वेळ उचकी लागली होती. नंतर मात्र शांत झोपले. खरच खूप बर वाटल झोप लागल्यावर. पण हे कस शक्य आहे. मी इथे असताना माझ्यासारखी दुसरी कशी असू शकेल.
गर्दीतल्या प्रत्येक व्यक्तीला मी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. बोलायचा प्रयत्न करत आहे. पण माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत. आई नको ग रडू. किती वेळ झाला तुला मिठीत घेऊन. तुला कितीवेळ कुरवाळत आहे. पण तुला माझा स्पर्शच जाणवत नाही. काय करू मी. तुला कधीच रडू देणार नाही ठरवलं होत ग. पण आज सर्वात जास्त दुःख तर मीच दिल नाही का? काय करू आई मला खरच खूप जगायचं आहे ग. पण तो दुष्ट आहे ना सर्वांना भुरळ घालून घेऊन जातो. मी स्वप्न समजत होते देवाबरोबर भांडण झालेलं . सकाळपासून मला वाटत होत मला भास होत आहेत. पण हा सर्व प्रकार पाहून मलाच प्रश्न पडला आहे .
खरच मी जग सोडून गेले का ?
खरच मी जग सोडून गेले का ?
Submitted by naidu suvarna p... on 15 December, 2018 - 00:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सॉलिड लिहिलं आहे.कथा
सॉलिड लिहिलं आहे.कथा शीर्षकापासूनच प्रेडीकटेबल.(टू मच हॉरर वाचून हल्ली सगळंच ओळखु येतं.पण तुमची कथा रंगवण्याची कला खूप आवडली.शेवट पर्यंत वाचावी अशीच आहे कथा.)
लिहीत राहा.पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत.
प्रेडिक्टेबल असूनही
प्रेडिक्टेबल असूनही शेवटपर्यन्त वाचावीशी वाटली आणि आवडली.
जबरदस्त लेखन कौशल्य __/|\__
Wahh.. But it seems hve read
Wahh.. But it seems hve read this before somewhere.. To madhala passage.. Ya adhihi tumhi lihila hota ka.. Thodi vegli katha???
Wahh.. But it seems hve read
Wahh.. But it seems hve read this before somewhere.. To madhala passage.. Ya adhihi tumhi lihila hota ka.. Thodi vegli katha???
Wahh.. But it seems hve read
Wahh.. But it seems hve read this before somewhere.. To madhala passage.. Ya adhihi tumhi lihila hota ka.. Thodi vegli katha???
Wahh.. But it seems hve read
Wahh.. But it seems hve read this before somewhere.. To madhala passage.. Ya adhihi tumhi lihila hota ka.. Thodi vegli katha???
हो मंजू नावाच्या कथेत तो भाग
हो मंजू नावाच्या कथेत तो भाग येऊन गेला आहे.
लांबी थोडी जास्त आहे, आणि
लांबी थोडी जास्त आहे, आणि शेवटी ट्विस्ट देता आला असता (कदाचित तोदेखील प्रेडिक्टेबल झाला असता म्हणा...)
सर्वांचे आभार मंजू मध्ये काही
सर्वांचे आभार मंजू मध्ये काही भाग आला आहे. पण मला हवा तसा नाही वाटला म्हणून मी बदल केला.