येरे येरे पावसा

Submitted by शिवाजी उमाजी on 12 December, 2018 - 11:22

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
व्हाईटचा देतो पैसा।

पैसा होईल खरा
बरस आता तू जरा।

तु पण ये गं सरी
पहातोय वाट दारी।

लवकर ये तू धावुनी
अंगण जावुदे भिजुनी।

लपंडाव झाला पुरा
घेवुन ये थोडा वारा।

ढकलेल वारा ढगाला
पाणी मिळेल शेताला।

फुलेल शेत जोमाने
शेतकरी जगेल सुखाने।

©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t19743/msg5...

Group content visibility: 
Use group defaults

मार्मिक विडंबनाचा स्तुत्य प्रयत्न..
थोडे अजून मार्मिक करता आले असते असे वाटते..
शक्य असल्यास जरूर प्रयत्न करून पहा.
अशीही छान आहे.

ब्लॅक व्हाईटची गम्मतच वेगळी... कुणी पटकन कबुल करीत नाही.
प्रतिसादाबद्दल पाटीलजी व हायझेनबर्गजी आपले मनस्वी आभार.