ताटातलं भांडण  

Submitted by शिवाजी उमाजी on 10 December, 2018 - 22:43

ताटातलं भांडण  

कालच चकलीचं भांडण, झालं ताटातल्या लाडूशी,
म्हणते फणकारुन त्याला, बसला का रे माझ्यापाशी !

आधीच लाडू गोल मोल, पुरता गोरामोराच झाला,
सुचेना त्या काय बोलावं, आजूबाजूस बघू लागला !

गोड असुन स्वतः सुद्धा, गालामधे करंजी हसली,
काहीच न बोलता फक्त, नुसती पहातच न् बसली !

गाल फुगवून शंकरपाळे, अनारशा सोबतच बसले,
शेव चिवड्यास एकिकडे, भितीने कापरे कि भरले !

रूसवा फुगवा ताटातला, पाहुण्यांनी घेतला पाहून,
चकली, शेव, चिवड्यावर, घेतला छान हात मारून !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

Group content visibility: 
Use group defaults