दोन टोकाच्या बुद्धिमत्तेच्या मुलांना कसे वाढवावे

Submitted by प्रचिती on 10 December, 2018 - 03:23

माझ्या मुलीचा आयक्यू कमी आहे. तिला mild प्रमाणात dislexia आहे. त्यामुळे ती अभ्यासात मागे पडत आहे.
तर धाकटा मुलगा हुशार आहे. ग्रासपिंग पॉवर चांगली आहे. थोरलीचा आक्रस्ताळेपणा बघून वयाच्या मानाने जास्तच समजूतदार बनला आहे.
मला थोरलीकडे जास्त लक्ष द्यावे लागते. पण त्यामुळे धाकट्याकडे दुर्लक्ष होते अशी गिल्टी फिलिंग येते.
त्याच्या हुशारीमुळे त्याचे सगळीकडे कौतुक होते, घरात नाही पण बाकीचे अजाणता करतातच. पण ते लेकीला सहन होत नाही. ती त्याचा jealous करते खूप.
तिच्यासमोर मला त्याचे लाड /कौतुक करता येत नाही.
लेकीला बिहेवीअर थेरपी सुरू करणार आहे पण मुलांना कसे वाढवावे याबद्दल काही टिप्स असतील तर शेअर करा प्लिज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मला थोरलीकडे जास्त लक्ष द्यावे लागते. पण त्यामुळे धाकट्याकडे दुर्लक्ष होते अशी गिल्टी फिलिंग येते.>>> यासाठी वेळेचे नियोजन करता येते का ते बघा. म्हणजे मुले जेव्हा शाळेत/शिकवणी/खेळात व्यस्त असतात तेव्हा आपली कामे उरकून घ्यावीत. तुम्ही नोकरी करत नसाल तर रात्रीचा स्वयंपाक दुपारी करुन संध्याकाळचा वेळ मुलांसाठी राखू शकता. एकाचवेळी दोघांकडे लक्ष्य द्यायचे असेल तर नवर्‍याची मदत घ्या.

त्याच्या हुशारीमुळे त्याचे सगळीकडे कौतुक होते, घरात नाही पण बाकीचे अजाणता करतातच. पण ते लेकीला सहन होत नाही. ती त्याचा jealous करते खूप.>>> मग त्या दोघां मधले अंतर कमी करायचा प्रयत्न करा. जसे खेळणे/वस्तू शेअर करणे, एकत्र खेळणे (अगदी सोपे खेळ जसे लंगडी/पकडा-पकडी/लपा-छुपी/कॅरम्/पत्ते/गोष्ट वाचणे). दोघांना एकमेकांच्या चांगलेपणाचे कौतुक करायला शिकवा. उदा. तिने त्याला काही दिले तर त्याला सांगायचे कि ताई चांगली आहे vice versa.

मुलाचे कौतुक होत असेल तेव्हा मुलीचेही कौतुक करा. शक्य असेल तर बाकिच्यांना तसे सांगा. जेणेकरुन मुलीला वाईट वाटणार नाही.

१. सर्वप्रथम गिल्टी म्हणजे अपराधी वाटून घेऊ नये, हे अपराधीपणाचे विचार टाळणं अवघड आहे, पण प्रयत्न करावा. अपराधी वाटल्यावर मनात गोंधळ निर्माण होतो, त्याचा परिणाम मुलांच्या संगोपनावर होण्याची शक्यता आहे. अपराधीपणची भावना काढून टाकावी, प्रामाणिपणे दोन्ही मुलांच्या संगोपनावर सारखे लक्ष द्यावे.

२. मुलीला ज्या गोष्टींमध्ये रस आहे, अशा गोष्टींचा शोध घ्यावा, तिला ज्या गोष्टी आवडतात, त्यात तिला भरभरून प्रोत्साहन द्यावे. गायन, नृत्य, चित्रकला किंवा वाद्य याचा क्लास लावावा, नवीन गोष्ट शिकण्यासाठी प्रेरित करावे.

३. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून, दोन्ही मुलांना समान वागणूक द्यावी.

४. दोघा मुलांना एकमेकांची काळजी घ्यायला शिकवणे.

धन्यवाद सर्वांना.
रश्मी, ती सर्व लेखमाला फारच प्रेरणादायी आहे. वाचत असते सतत. रोमात असते मी. गिल्ट अशासाठी की मुलगा हुशार असून त्याच्या हुषारीला वाव मिळेल असा काही करता येत नाही.

Sonalisl, हो मुलांना वेळ देत असते. कामावरून आले की दोन तास तरी मुलांबरोबर असते. पण बहुतेक एकटीला मॅनेज होत नाहीये अस दिसतंय.

चैतन्य, हो तिला चित्रकला आवडते. वह्यांची पाने फाडून सतत रेघोट्या मारणे, चित्र काढणे सुरू असते जे मी करू देते. क्लास लावला होता पण ती नेटाने जात नाही.

इथं लिहिल्यावर जरा मोकळं वाटल. परत एकदा धन्यवाद सर्वांना.

ज़्यांच्या दोन मुलांच्या सर्वस्वी वेगळ्या टोकाच्या learning abilities आहेत, अशा एका वडलांशी घनिष्ठ परिचय झाला अलिकडच्या काळात. त्यांनी सांगीतलेल्या अनेक गोष्टींनुसार हे भयंकर तणावपूर्ण आहे. तुम्हाला यश आणि मन:शांती मिळू दे.

पहिल्या मुलाला प्रचंड जास्त वेळ देणे हे दुसर्याला unfair वाटू लागते. थोडे मोठे झाल्यावर धाकटे मूल मोठ्याला bully करू लागू शकते. दोघांना सतत समजावत राहण्याला पर्याय नाही.

वर सुचवलेले काही उपाय चांगले आहेत. तसेच हेही पहा:
-आठवड्यातले दोन तास तरी निदान दुसर्या मुलासाठी राखीव ठेवा ! त्यालासुद्धा exclusivity ची गरज आहे. मुल मोठे होईल तसतसे त्याला समजावून सांगता येईल आणि त्याचीही मदत घेता येईल थोरल्या मुलासाठी.
- संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन. यात केअरगीवर्स ही आले. त्यात धाकट्यासाठी सुद्धा काय करता येईल, कोणी करायचे हे पहा. त्याचा बुध्यांक तपासून त्याला गरज असतील ते resources मिळवून देता येईल का पहा. He needs a framework. बाकी तो त्याचं बरचसं manage करु शकेल हळूहळू.
- त्याच्यासाठी ‘go-to persons’ निर्माण करता येतील का अजून कोणी कुटुंबातील सदस्य ? आजी, आजोबा, आत्या, मावशी कोणीही ? जे त्याच्याशी संवाद ठेवू शकतील थोडा जास्त. मुलांनाही मनातलं बोलायला जागा पाहीजे.
- त्याला पुरेसा वेळ देता यात नाही हे त्यालाही वाटतं का ?की फक्त तुम्हाला वाटतय ?
- तुमची परिस्थिती आणि working hours चे काही करता येतं का पहा. थोडी पगारकपात घेऊन कामाचे थोडे तास कमी करता येऊ शकतील का ? दोन तास पेरंटिंगचा फार ताण येऊ शकतो.
- कधीकधी थोरले मूल उशीरा का होईना catch up करू शकेल असेही होऊ शकते.
- स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेत काम करायचे आहे तुम्हाला. मन मोकळे करत रहा.
- मुलांचे केअरगीवर्स / इतर नातेवाईक अजाणतेपणी तुलना करत असतील त्यांना ‘Do’s and Don’ts’ चे मुद्दे (समुपदेशकांना) विचारून लिहून आणि समजावून द्या.
- Infact घरात येणार्या पाहुण्यांनाही द्या ते पान. बहुतांशी लोकं मुद्दाम करत नसावेत. त्यांना माहितच नसेल की समस्या काय आहे. आणि एकदा समस्या सांगून टाकली तर तुम्चया मनावरचा ताण कमी व्हायला मदत होऊ शकते.
- बाकी थोरलीच्या बाबतीत बिहेवियर थेरपीचा उपयोग होईलच.

Srd, हो परिक्षाच आहे एक प्रकारची.
रैना, धन्यवाद विस्तृत प्रतिसादाबद्दल. खूप छान लिहिले आहे. पॉईंट्स नोट केले आहेत.

@ प्रचिती...
तुमच्या शारिरीक व मानसिक तब्येतीस ही जपा. तुम्हाला खुप शुभेच्छा!
@ रैना...
चांगल्या सुचना आहेत.
पाहुणे म्हणुन कोणाकडे गेल्यास, २ भावंडांची तुलना करु नये किंवा एकालाच छान म्हणणे ही टाळावे याचा धडा आहे हा.

पाहुणे म्हणुन कोणाकडे गेल्यास, २ भावंडांची तुलना करु नये किंवा एकालाच छान म्हणणे ही टाळावे याचा धडा आहे हा.>>+१

बर्‍याच लोकांना नाही कळत कि त्यांच्या वागण्या-बोलल्याने समोरच्या मुलावर-कुटुंबावर काय परिणाम होतो ते Sad खासकरून ज्यांच्या घरात स्पेशल चाईल्ड असते तेव्हा.

त्याच्याकडे निरखून बघणे. असे बघताना बघणे त्या कुटुंबातील लोकांसाठी/आई-वडिलांसाठी त्रासदायक/संतापदायक असू शकते.
त्याला काय झाले हे विचारून त्यावर चर्चा करणे.
आमच्या ओळखीत अमक्या-तमक्याला असेच काहीसे झाले होते हे सांगत त्यावर चर्चा करणे.
ओळखीच्या किंवा कोणाकडून तरी नाव ऐकलेल्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देणे (पहिल्या २-३ भेटीत तर असे सल्ले अजिबात देऊ नये).
आपल्या बरोबर लहान मुल असेल तर त्याला घरातून निघतानाच कल्पना द्यावी. त्यांच्यासमोर काय बोलावे, काय बोलू नये हेही मुलांना शिकवावे.

नवीन Submitted by sonalisl on 12 December, 2018 - 20:03. >>>>> खूप छान पोस्ट आहे ही. आपली सोसायटी एवढी मॅच्युअर कधी होणार? समोरच्याच्या दुखऱ्या नसेवर जाणूनबुजून सुद्धा हात लावायला आवडतो बऱ्याच जणांना.

प्रचिती, तुझं कौतुक. तुला काय सुधारायच आहे किंवा पेरेटिंगमध्ये काय मिसिंग आहे हे तरी कळलेलं आहे, त्यामुळे तू हा प्रॉब्लेम लवकरच overcome करशील. बरेच पालक पेरेटिंगमध्ये वेगवेगळ्या कारणाने कमी अधिक गंडलेले असतात आणि त्यांना त्याची जाणीवही नसते, हे धोकादायक.
मला स्वतःला एकच मूल आहे, त्यामुळे मी बऱ्याच दोन मुलं असलेल्या पालकांना उत्सुकतेपोटी ओबसर्व करत असते. मला असं दिसून आलं आहे की दोन्ही मुलं आईवडिलांना सारखीच किंवा दोन मुलांमध्ये आईवडील भेदभाव करत नाहीत हे म्हणायलाच. कित्येक पालक दुसरं मूल झालं की बहुतेक वेडेच होतात. दुसरं मूल झालं आणि ते छोटं असलं म्हणून पाहिलं मूल लगेच adult होत नाही हेच त्यांना कळत नाही. त्यांच्याकडून मॅच्युअर वागण्याची अपेक्षा, शेअरिंग ( ज्याची त्यांना आतापर्यंत सवय नसते), मोठा आहे म्हणून हट्ट करायचा नाही, मोठा आहे म्हणून स्वतःच मूलपण सोडून आदर्श वागायचं इ इ सुरू होतं. तुलना होणं तर अगदी कॉमनली पाहिलं आहे. ही क्वचित आढळणारी परिस्थिती नाही, तर सर्रास दिसतं. अगदी माझ्या घरात जवळच्या व्यक्तीने हीच चूक केल्यावर आम्ही ती दाखवून दिली आणि सुधारणा करायला लावली. माझ्या मुलाची एक मैत्रीण आणि तिची छोटी बहीण यामध्ये 10 वर्षांच अंतर आहे. त्यात छोटी मुलगी खूपच फेअरी लाईक गुड लुकिंग आहे, तिच्यात आईबाबा इतके हरवले आहेत की मोठी मुलगी नुसतीच आहे म्हणून आहे. तिने एकदा दुखावून विचारलं होतं की मॉम किंवा डॅडच्या dp मध्ये तू माझा फोटो कधी पाहिलास का? तर उत्तर गेल्या 3-4 वर्षातनवीन बाळ आल्यापासून नाहीच.

तुला