नाशिकमध्ये ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी माहिती हवीय.

Submitted by अज्ञातवासी on 9 December, 2018 - 08:52

नमस्कार. मी सध्या एका कंपनीत कामाला आहे. मला लहानपणापासून ज्योतिषशास्त्राची आवड आहे. परंतु योग्य माहिती नसल्याने, खूप वेळा नुकसान होऊन पदरी निराशाच आहे.
नाशिकमध्ये जॉब करून संध्याकाळी कुणी ज्योतिषशास्त्र शिकवणारे असतील, तर कृपया मदत करावी.
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अल्पज्ञानाने मी नवीन ज्योतिष शिकू इच्छिणाऱ्यांसाठी youtube वर बेसिक पासूनचे विडिओ टाकत आहे
youtube वर #dyangangajyotish टाका म्हणजे मिळतील व अभिप्राय कळवा

ज्योतिष्यबद्दल वाचून पण पदरी निराशाच पडणार आहे. या भंपक प्रकारात स्वतःचा वेळ घालवू नका असे सांगावेसे वाटते, पण आपली मर्जी.

@उपाशी बोका
ते पूर्वग्रह विरहित शिकल्यावरच कळेल नाही का..

धन्यवाद रावल सर.
तुमचं मार्गदर्शन नक्की उपयोगी राहील.

मी सुद्धा मागे ज्योतिष शास्त्र शिकण्याचा प्रयत्न केला तोही विना मार्गदर्शन.हे आईने असाच विषय निघाला म्हणून एका ज्योतिषाला सांगितले.तेव्हा त्यांनी "अजिबात शिकायच्या भानगडीत पडू नकोस " असा हीरमोड करणारा सल्ला (न मागता) दिला.अर्थात मी ते फारसे मनावर घेतले नाही व शिकण चालूच ठेवले.

अखिल भारतीय ज्योतिष विद्या मंडळ
4 वात्सल्य, रचना विद्यालय रोड
कुळकर्णी गार्डन जवळ
कॅनडा काॅर्नर, नाशिक
फोनः 9422259523

नाशिक मध्ये श्री सुहास गोखले हे उत्कृष्ट ज्योतिषी व ज्योतिष मार्गदर्शक आहेत. त्यांचे ज्योतिष क्लास सुद्धां आहेत. ते देवळाली क्याम्प मध्ये असतात.

कुंडलीची भाषा भाग १,२,३ हे तीन भाग पूर्वू नाशिकमधूनच प्रसिद्ध झाले होते ते आता कुणी पुन्हा छापले आहेत. उत्तम माहिती. वाचनालयातही असतील.
ज्योतिषवर्गात साधारणपणे नव्वद टक्के हेच शिकवतात. ( तांत्रिक माहिती, पाया.)
प्रत्यक्श भविष्य वर्तवण्याचे तंत्र आपलेआपणच ठरवावे लागते.
ग्रहांचे कार्यकत्व,स्थान आणि योग भविष्य बदलतात. वदाभट,हना काटवे,राजे यांची आणि वरील तीन पुस्तके वाचून साधारणपणे पंधरा दिवसांत ज्योतिषी होता येते.
गोचरी ज्योतिष पाहणाऱ्यांना फार मागणी असते त्यासाठी मात्र बराच काळ अभ्यास लागतो.

धन्यवाद भगवती, पाटीलबाबा व srd.
Srd खर बघायला गेलं तर मी बरीच पुस्तके वाचली आहेत. पण शंक विचारायला व अडचणी निरसन करायला गुरू हवा. मात्र आजकाल गुरूच्या नावाखाली फसवणूक करणारेच जास्त भेटतात. तोही कटू अनुभव घेऊन झालाय.
म्हणून हा लेखप्रपंच.

>>निरसन करायला गुरू हवा. >>

ज्योतिष शास्त्रात( भविष्य वर्तवणे) गुरु नसतो. आपणच आपले ठोकताळे बसवायचे. पुढेपुढे अधिकाधिक ज्योतिष समजू लागले की मानसिक त्रास सुरु होतो. कारण कोणाचीही कुंडली पाहिल्यावर त्याच्या आयुष्यातल्या काही घटना समजू लागतात, तेच तुमच्या नात्यात असले तर अधिकच वाइट.
तसे मांत्रिक,ज्योतिष,जादु इत्यादि विद्या यापासून थोडे दूरच राहावे.
चंद्र,बुध हे दुसऱ्या तिसऱ्या स्थानांत ज्योतिषाकडे कल असतो. दशमातला चंद्रही. बुध हा आकडेमोड,केपी इकडे वळवेल तर चंद्र थेट भविष्यच सांगेल.

गुरू करू नका, पुस्तके वाचून आपले मत ठरवा. कोणत्या ग्रहामुळे कोणाचे काय होईल यावर इतर ज्योतिष्यांशी कधीच खल करू नये हे माझे मत.

काही म्हणा काटवेनच नाव एकूण त्यांचा संच घेतला पण त्यांचे नियम काही पटले हि नाही व अनुभवाला हि आले नाही
राजे बेस्ट आहेत , पाया चांगला करायला व.दा. भटांचे कुंडली मंत्र आणि तंत्र भाग १ उत्तम आहे

richard feynman चे ग्रंथ चांगले आहेत, वाचल्यावर मनुष्यच काय ग्रहांचेदेखिल भविष्य सांगता येतं.

अखिल भारतिय ज्योतिश्य मन्ड्ल जुने नाशिक भद्रकाली येथे आहे, खुप जुनि मड्ल आहे, भद्रकाली येथे चौकशि केल्यास कुणी हि सन्गेल, तिथे केपी पध्यातिने शिकवतात.

पुस्तके वाचली आहेत तुम्ही बरीच. तेवढी पुरेशी आहेत. हळूहहळु अभ्यास वाढवावा लागतो. क्लासची जरुरी नाही.

हा धागा अमानवीय सारखा करू नये ही विनंती.
भलेही माझ्या कुंडलीत योग असेल किंवा नसेल, पण बाकीच्यांनाही ही माहिती उपयुक्त ठरेल...

सुहास गोखले फ्राड आहे...
नवीन Submitted by हेला on 10 December, 2018 - 11:03

फ्रॉड नसलेल्या ज्योतिष्यांची नावे सांगाल का?

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.

या धाग्यावरून मी स्वअध्ययन करून ज्योतिष शिकावे या निष्कर्षाला आलोय.
काही अडचण वाटल्यास मायबोलीकर मदतीला आहेच.
रावल सरांचे विडिओ बघून आता पुन्हा कोऱ्या पाटीवर ज्योतिष शिकणे चालू आहे.
कृपया ज्योतिष विषयक एखादा व्हाट्सएपचा ग्रुप असल्यास मी जॉईन करण्यास उत्सुक आहे.

वरील तीन पुस्तके वाचून साधारणपणे पंधरा दिवसांत ज्योतिषी होता येते.
>>
कोकाटे फाड फाड इंग्लिश ची आठवण झाली....

@बाबा कामदेव, माझ्या पहिल्या प्रतिसादात पाहा "ज्योतिषवर्गात साधारणपणे नव्वद टक्के हेच शिकवतात. ( तांत्रिक माहिती, पाया.)" आणखी एकात ज्योतिषी होण्याचा एक योग दिला आहे. पुस्तके लेखकाने वाचली आहेत. म्हणजे पुढचा अभ्यास वाढवायचा आहे॥
आता मूळ मुद्दा आहे - नवीन जातकाची कुंडली पाहून त्याच्या प्रश्नास या माध्यमातून मार्गदर्शन आणि उत्तर ( स/नि:शुल्क) देणे. हेच आत्मविश्वासाने करायचे आहे आणि त्याचे क्लास नसतात.
((( कोकाटेंच्या काळातली इं शिकवण्याची गोष्ट वेगळी आहे. त्याकाळी आणि आताही चाऊस, रॅपिडेक्स ही माध्यमे एकच आहेत. थोडीफार ओळख करून देतात. )))

पण मुळात तुमच्या कुंडलीत ज्योतिषी व्हायचा योग्य आहे का? ते तपासले का? Wink>>>>> हे म्हणणे १००००० टक्के खरे आहे, हसू नका.

प्रत्येकाने आपली जन्मपत्रिका ( भविष्य / ज्योतिष्य यावर विश्वास असेल तरच ) बनवुन त्यात गुरु- नेपच्युन - चंद्र-बुध यात कुठे युती आहे हे तपासावे. एखादा कुडमुड्या ज्योतिष्यी पण या विषयी तुम्हाला माहिती देईल. कुडमुड्या अशासाठी म्हणले की सत्यनाराणाची पूजा सांगणारे, जुजबी पंचांग समजणारे लोक स्वतःला ज्योतिष्यी समजून लोकांना काहीही म्हणजे काहीही थापा मारुन भविष्य सांगुन या शास्त्राची बदनामी करत आहेत.

माझ्या मैत्रिणीच्या सासुबाईनी आम्हाला सांगीतले की त्यांच्याच जवळच्या नात्यातल्या एका काकांनी त्यांच्या लग्न व पुढच्या आयुष्याबद्दल जे जे काही सांगीतले ते सर्व तसेच घडले. म्हणजे नवरा फायनान्स कंपनीशी संबंधीत असेल, लग्नानंतर खूप सासुरवास होईल ( हे पण खरे झाले कारण त्या काकांनी हुंडा घेतला नाही म्हणून त्यांच्या आईने सुनेला खूप छळले ) , घर समुद्राजवळ असेल वगैरे..

खरे तर ज्योतिष्याने पैशाची अपेक्षा करुच नये, कारण या शास्त्राला नारदमुनींचाच शाप आहे असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत वरील योग चांगले आहे व ज्यांचे गणित खूप चांगले आहे, अशा लोकांनी कृष्णमुर्ती पद्धतीचे भविष्य जरुर शिकावे. कारण ही केपी पद्धत नक्षत्रावर आधारीत असल्याने भविष्य निदान ९० टक्के तरी खरे ठरते. मी याचा उत्तम अनूभव घेतलाय.

<<<हे म्हणणे १००००० टक्के खरे आहे>>>
<<<त्यात गुरु- नेपच्युन - चंद्र-बुध यात कुठे युती आहे हे तपासावे >>> त्यापेक्षा स्वतःचे डोके तपासावे.
<<<या शास्त्राची बदनामी करत आहेत.>>>
<<<केपी पद्धत नक्षत्रावर आधारीत असल्याने भविष्य निदान ९० टक्के तरी खरे ठरते. मी याचा उत्तम अनूभव घेतलाय.>>>

कित्ती विनोदी लिहिता हो तुम्ही. बरं वाटलं जिवाला.

तुम्हाला विनोदी वाटले यात तुमची मर्जी. मी काही कुणाला हे शिकाच म्हणून जबरदस्ती केलेली नाहीये. आणी तसेही हा धागा तुम्ही काढलेला नसल्याने मी हे उत्तर तुम्हाला दिलेले नाहीये.

Rashmee ++
Jyancha vishwas nahi, te kashala pinka takat basatat?
Vishvas asanare tumhee vishvas thevat nahi mhanun moorkh ahat ass sangat yetat ka?
What these guys do when it comes to any such topic is called bullying & trolling

उपाशी बोका, मी तुम्हाला कळकळून विनंती केलीये, की धाग्याचा अमानवीय करू नका. मी इथे काहीतरी ठोस माहिती मिळावी म्हणून आलोय. कुणाचा आपल्याशी संबंध नसताना आम्ही किती पुढारलेले, किती हुशार, किती कुल, हे दाखविण्यासाठी समोरच्याला मनोरुग्ण ठरविण्याची गरज नाही. निदान तुम्ही तरी उपचार करून घ्या. कारण सगळ्या ठिकाणी आपले ज्ञान दाखवणे, समोरच्याची टिंगल उडविणे, गरज नसताना मध्ये तोंड घालणे हे मनोरुग्णाच्या व्याख्येत जरी बसत नसले, तरी मनोविकृतीच्या व्याख्येत जरुर बसते.
रश्मी थँक्स, पण यावेळी ज्योतिष शिकण्याच्या आवडीने ज्योतिष बघण्याच्या आवडीवर मात केलीये, त्यामुळे आता शिकण्याचा प्रयत्न नक्की करेन.
सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. रमेशजी आणि रश्मी तुम्ही मला व्यक्तिगत संपर्क क्रमांक दिले तर चांगलं होईल.

Pages