राजस्थान ट्रिप बद्दल

Submitted by _आनंदी_ on 8 December, 2018 - 01:26

२५ डिसेंबर ते १ जानेवारी.. रजस्थान ला जाणार आहोत..१ दिवस टेंट मधेही राहणार आहोत.. थंडी असणारच आहे.. या दरम्यान बर्यचद ताप्मान ० डिग्रि पण होते असं वाचलं आहे..
टेंट मधे जास्त काळजी वाटत आहे.. माझं आणि नवर्याच मॅनेजेबल पण मुलगी ७ वर्श .. लगेच थंडी वाजते तिला..
कोणाचा टेंट चा काही अनुभव? काय काय काळजी घ्यावी.. ??
काही स्पेशल अनुभव ,ट्रिक्स.. उपाय ई असतिल तर शेअर करा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जैसलमेर मधे टेंट मधे स्टे आहे
आम्ही त्याना (हॉटेल वाल्याना) विचारलं तर ते म्हणाले कॉटन ची डबल वॉल असते टेंट ला तेव्हा खुप्प नाही वजणार थंडी पण वॉर्मर्स तर हवेतच

जैसलमेर ला खूप टेंट आहेत आम्ही राहिलो नव्हतो पण बघितले कसे असतात ते. काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाहीये. सगळी छान सोय असते. पाणी ही चोवीस तास असतं टेंट मध्ये ते ही गार आणि गरम अस दोन्ही.

आम्ही पण जैसलमेर बिकानेर, जोधपूर अशी ट्रिप केली होती, त्याची ही लिंक बघा काही उपयोग होतोय का ते .

https://www.maayboli.com/node/52831

थॅन्क यु.. भिती कमी झाली तुमचा प्रतिसाद वाचुन.. लिंक पहातेच
आम्ही जैसल्मेर, जोध्पुर , जयपुर जाणार आहोत

ख्रिसमसचा आठवडा जयपूर आणि जैसलमेरला जाणार आहोत. कृपया माहिती द्या. 4 ते 8 वर्ष वयाची 4 मुले सोबत आहेत. तिकडे कोणत्या प्रकारचे गरम कपडे लागतील.

मला मुंबईत पण थंडी वाजायची Lol पायमोजे (म्हणून बूट), कानाला मफलर आणि स्वेटर इतकं साधारण पुरतं भारतातल्या कुठल्याही थंडीत.