धागा

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 01:06

१ च धागा काढा, शोधायला सोपे जाईल, ४/५ धागे का काढतां? , तेही सेम विषयावर!!!!
असं म्हणतात माबोकर!
पण हा धागा म्हणजे काय?
तो कशाचा बनला आहे?
धागा काढला म्हणजे काय?
भारंभार धागे काढल्याने धागा संपतो की काय?
१च धाग्यातच लिहा,म्हणजे काय करतात?
नेमके कुणाचे नुकसान होत आहे?
त्या धाग्याचे,मायबोलीचे,की मायबोलीकरांचे, की नवागताचे,टाईमपास करणारे चे, गंभीर पणे विचार करणारेंचे,की आणखीन कुणाचे?
एक धागा सुखाचा म्हणतात----
पण कुणाच्या सुखाचा?
बिच्चारा धागा!!!!
माबोकरांच्या खेचाखेचीत तो तुटत तर नसेल?
मग त्या तुटण्यात सुख दडले आहे, की दु:ख?
ते तो बिच्चारा "एक" धागाच जाणो?
१०० धागे दु:खाचे---- मग भारंभार निघत असतील!!!

खळखळून हसणे - १दाच (१धागा)असते.
धाय मोकलून रडणे भरपूर असते -( १०० धागे)/ शंभरदा होत असेल-----

तुम्हाला काय वाटते?
आणि तसंही धागा हा धागाच असतो--- एकतर तो लांबलचक असणार अथवा कमी लांबीचा--- म्हणजे लहान धागे, मोठे धागे-- त्यात काय हे सारे होतच राहणार! फक्त तो धागा उपयुक्त असावा,काढणाय्राच्या किंवा वापरणाय्राच्या उपयोगाचा!!!!!
तसा धागा कुजका/कच्चा ही असू शकतो.हाताळताना चुकून तुटूही शकतो, बरेचदा नकळत तुटतोही.शेवटी धागाच तो तुटणारच----- पक्का असला तरी!!! आणि धागा लहान असला काय अन् मोठा -----जसा तो तुटू शकतो ;तसाच तो ,जोडून जोडून वाढवता येतो, लांबवता येतो, गरजेनुसार!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लोक पाटलांचा राग का करतात असा धागा तुम्ही स्वतःच काढणार आहात कि त्यांच्यासाठी वाट बघणार ?
अर्थात आगाऊ श्रद्धांजली वाहीलेली असल्याने ती वेळ येईल का ही शंका आहेच.