Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 00:32
कोणी सांगेल का? मायबोलीवर सगळ्यात कमी कशाची जाणवते? आणि सगळ्यात जास्त कोणती गोष्ट जाणवते?
मला वाटते मायबोलीवर लोक जास्त आहेत पण त्यामानाने प्रतिक्रिया/प्रतिसाद खूपच कमी आहे.
आता या लोकांत किती लेखक /कवी आहेत, किती वाचक आहेत, देव जाणे.
हां पण मराठी भाषिक भरपूर जाणवतात.त्यापुढे मराठी वाचक कमीच वाटतात.
तसेच मायबोलीवर मायबोलीकर सर्वात जास्त वाटतात.पण मायबोलीतला गोडवा कमीच वाटतो.
मायबोली मराठी असली तरी बरेचदा जाणवतो इंग्लिशचा वचक
आणि असला इंग्लिशचा कितीही वचक; तरी आहे जिवंत आपला अजून मराठी वाचक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सध्यातरी तुम्हीच सगळ्यात
सध्यातरी तुम्हीच सगळ्यात जास्त जाणवताय.
सगळ्यात जास्त: उठसूठ कसलेही
सगळ्यात जास्त: उठसूठ कसलेही धागे काढण्याचा प्रकार
सगळ्यात कमी: इग्नोरास्त्राचे कसब. (माझी ही पोस्ट सुद्धा याचे उदाहरण समजता येईल.)
भरत आणि मानव
भरत आणि मानव
मायबोलीवर चांगले लेखन कमी आणि
मायबोलीवर चांगले लेखन कमी आणि उठसुट फुट्कळ सल्ले मागणारे धागे जास्त आहेत.
राग कमी आहे. प्रेम जास्त आहे.
राग कमी आहे. प्रेम जास्त आहे.
त्यामुळे मायबोली कायमची सुटत नाही. आयुष्याने वेळ आणि संधी दिल्यास पुन्हा आपण ईथे येतोच..
अरे एकाच वेळी तुमचे फुटकळ
अरे एकाच वेळी तुमचे फुटकळ फुटकळ प्रश्न विचारणारे भरपूर धागे दिसताहेत . हे जरा जास्तच आहे .
आवरा जरा स्वतःला . काय लावलाय ?
माबोवर टाईम पास करण्यासाठी
माबोवर टाईम पास करण्यासाठी येतात लोक. काही घरातला राग चिडचिड इतरांवर काढण्यासाठी भांडायला येतात.
काही ट्रोल करण्यासाठी येतात. काही डान्स बसवायला येतात.
तुम्ही काय शोधताय??
कसदार लेखन कमी आणि भाराभर
कसदार लेखन कमी आणि भाराभर फुटकळ लेखन जास्त
रिकामे लोक जास्त आहे..
रिकामे लोक जास्त आहे..