मायबोलीवर माहिती मिळाली अन्-----

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 00:25

माहिती हवी आहे यात मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला अन् मला चांगली च माहिती मिळाली,अन् माझे चांगलेच पोट भरले!!!!!!!
परत म्हणून माहिती मिळवण्याची भूक मरेपर्यंत तरी लागणारं नाही,अशी मायबोलीकर व्यवस्थाच करून टाकतात.
बिच्चारे ते तरी काय करणार म्हणा?
मायबोलीवर मायबोलीकर एकाच धाग्यात रमतात अन् तोही लांबलचक असला तरच!
बारके धागे फारसे पाहवत नाही कुणाला!!!
बिच्चारे बारके धागे,कचराच समजतात सारे त्यांना! त्यात मायबोलीकरांचा काय दोष?
पण मला बाई भारी हौस तुकड्यांची/बारक्यांची/लहानांची!
कारण मी ही आधी बारकीच (लहान/बाळ) होते.हळूहळू मोठी (लांबत/लांबलचक/उभी/उंच) होत राहीले.
त्यामुळे मला स्वत:वरून लहानांचे/तुकड्यांचे/बारक्यांचे फुटकळ असले तरी महत्त्व वाटते.
जवळ मोजपट्टी आहे म्हणून सारे धागे मोजून पाहायलाच
हवे का?
पण या सगळ्या प्रकारात एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली की माणूस म्हटला की तो गल्लीत-दिल्लीत सारखाच असतो, मायबोलीकर त्याला अपवाद कसा असेल?
मायबोलीवर, मायबोलीकर,मायबोली यांच काही असं खास वेगळेपण विशेष जाणवल नाही,हे मात्र नक्की!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओ काय चालवलंय काय? उगा लिहायला मिळतंय म्हणुन भारंभार धागे काढत सुटला आहात.
कसली माहिती हवी होती तुम्हाला?
डान्स कसा बसावावा? मग भांगडा कसा बसवावा? मग काय तर देश्भक्तीच्या डान्स कसा बसवावा?
इथे लिहु शकता म्हणजे आंतरजालाचं ज्ञान आहे.
तर युट्युब वैगेरे करुन बघु शकता / डानस इथे लिहुन तुम्हाला कसा समज्णार असं काही प्रतिसादात लिहिलं तर तुम्हालाअ एवढा राग का आला?
बरं ह्याउपर काही झालं असेल तर कल्पना नाही.
पण ते तिथेच सोडुन न देता इतरही तीन-चार धागे सेम विषयावर काढताय.
माबोवर सल्ले मिळतच नाहीत. चेष्टा होते. माबोकर टवाळखोर आहेत. माहिती मिळाली आणि माझे पोट भरले वै वै.
अजुन येणार पण असतील धागे.
आवरा. तुम्ही बी पाटील आहात काय?

तुमचा राग मी समजू शकतो, त्या धाग्यावर आलेले अवांतर प्रतिसाद मीही वाचलेत, पण तुम्ही भारंभार धागे काढून स्वतःची प्रतिमा खराब करत आहात.
राग येणं ठीक आहे. राग दर्शवणंसुद्धा बरोबर. पण यातून तुमची एक थयथयाट करणारी म्हणून प्रतिमा तयार होतेय.
थोडे दिवस ब्रेक घ्या. विचारांची शृंखला जोडा, आणि एक सुंदर लिखाण टाका.
हेच मायबोलीकर तुम्हाला प्रेम आणि आदर देतील.

काही नाही हो.. नाऊमेद होऊ नका!!
तुम्ही बिनधास्त हवे तेवढे धागे काढा... काही कोणाच्या दरडावण्याला भीक घालण्याची गरज नाही.
मायबोली सगळ्यांची आहे... कोणी ना कोणी यथाशक्ती तुमच्या प्रश्नांना ऊत्तर देतीलच.. अनेल चांगले तज्ञ लोक आहेत ईथे.
आपण आपल्याला हवे ते लिहिणे महत्वाचे..फक्त ईतरांचे धागे डीरेल केले नाही म्हणजे झाले.. ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांना बसू दे गळे काढत... लक्षात ठेवा अशांना स्वतःची काही आयडेंटिटी नसते.. ते आयडेंटिटी मिळ्वण्यासाठी ईतरांवर अवलंबून असतात.

मायबोलीवर मायबोलीकर एकाच धाग्यात रमतात अन् तोही लांबलचक असला तरच!
बारके धागे फारसे पाहवत नाही कुणाला!!!>> खरे आहे... कारण प्रत्येकाला वाटते आपण 'एलिट' स्टेट्सचे मायबोलीकर आहोत.

तुम्ही भारंभार धागे काढून स्वतःची प्रतिमा खराब करत आहात.>> अशी प्रतिमा वगैरे काही खरे नसते हो. अमेरिकन युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट वगैरे मिळवलेले so called 'चांगल्या प्रतिमेचे आयडी' शिसारी येईल असे बोलतात खर्‍या आयुष्यात इतर मायबोलीकरांबद्द्ल.. स्वतः प्रत्यक्ष पाहिले अन ऐकले आहे..
इथले सोज्वळ चेहरे काही खरे नसतात तुम्ही बिनधास्त लिहा.

so called चांगल्या प्रतिमेचे आयडी' शिसारी येईल असे बोलत असताना तुम्ही त्याची मजा घेत असाल. त्यांनीच ठरवलेल्या गटग मधे आणि आता त्यांच्याशी फाटल्यावर गळे काढताय का?
तेव्हा कंपुत होतात तेव्हा एखाद्या आयडीला पिडायचं सोडलं नाहीत. तुमच्या विरोधी सुर लागला तसे तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात.
आणि सगळीकडे अति सोज्वळ अति संयमित अति गोड प्रतिसाद लिहित सुटला आहात. जिथे तिथे गळे काढायचं बंद करणार का?
गेट वेल सून.

Rofl
ताई, मी वाईट लोकांना तिखट बोललो काय किंवा चांगले गोड प्रतिसाद दिले काय, तुम्हाला आजकाल माझे नाव पाहूनच कडवटपणा येत असेल तर त्याला कोण काय करणार Lol ...
मला तर बुवा भारी मज्जा वाटते कोणी आपल्या वेळकाढू खरडी एवढया गांभीर्याने घेत आहे पाहून... वाचत रहा काहीबाही कडू गोड लिहित रहा. मज्जानी लाईफ Proud

ओ सस्मित का माझ्या हृदयावर पाय देत आहात?
मी मायबोलीवर मोठ्या ब्रेकनंतर परत आल्यावर माझ्याबद्दल कोणी मनापासून छान आणि सकारात्मक लिहीले असेल तर ते हायझेनबर्ग यांनीच. त्यांना लिहू द्या.
आणि हो, यात कसलाही उपरोध नाही. हल्ली माबोवर कोणी कोणाबद्दल चांगले लिहिले की लोकांना संशयच का येतो? हाच का तो घोर कलियुग.. पैश्याशिवाय रोटी नाही आणि फायद्याशिवाय स्तुती नाही..

हाबंकडे एक तर भरपुर रिकामा वेळ आहे म्हणून ते टिपी करतायेत किंवा त्यांचा आयडी हॅक झालाय >> Rofl अहो रिकामा वेळ असल्याशिवाय कोणी मायबोलीवर येते का? आणि काही गंभीर वा महत्वाची कामे सोडून येते का? फारच बुवा अपेक्षा तुमच्या माझ्याकडून. Lol

च्रप्स
अहो अमेरिकेत चायनीज आणि रशियाने हॅकिंगचे करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत आजकाल... तुम्ही बातम्या आपलं न्यूज फॉलो करत नाही का.. मोठा international issue झाला आहे.
हॅकिंग बद्दल त्यांची काळजी रास्त आहे...

अशी प्रतिमा वगैरे काही खरे नसते हो. >>>>
खरे आहे, मायबोलीवर महिला सक्षमीकरण वगैरेवर कथा पडणारे लेखकू, प्रत्यक्ष आयुश्यात आपल्याला न ऐकणार्या स्त्री id च्या पर्सनल आयुष्याची उठाठेव करताना पाहिले आहेत .

ओ सस्मित का माझ्या हृदयावर पाय देत आहात?>>>>> Lol

मी मायबोलीवर मोठ्या ब्रेकनंतर परत आल्यावर माझ्याबद्दल कोणी मनापासून छान आणि सकारात्मक लिहीले असेल तर ते हायझेनबर्ग यांनीच. त्यांना लिहू द्या.>>>लिहु द्या की. मी कूठे त्यांचे हात धरलेत आयमीन त्यांनी लिहु नये म्हण्तेय.
<<<<अशी प्रतिमा वगैरे काही खरे नसते >>> हेच खरं. तरीही लोक एखाद्या आंजा आयडीचा राग राग चीड चीड करतात. अगदी त्याच्या लेखनावर करुनही कंपुतल्या गप्पा बिप्पांच्या पानांवरही त्याच्याबद्दलचा राग चीड व्यक्त करतात ह्याचंच आश्चर्य वाटत रहातं Happy

हाब, यू नो वॉट आय मिन .... एके काळी आय हॅड ग्रेट रिस्पेक्ट फॉर यू , आता नाहीसा होत चाललाय. तुम्हला त्याने ० फरक पदतो हे माहीत आहे आणि फरक पडावा अशी अपेक्षा पण नाही पण मलाच वाईट वाटतंय तुमचा ऋन्मेष होताना बघुन

अरेरे रिया,
माफ करा तुम्हाला निराश केल्याबद्दल. तुम्हाला आता माझ्याबद्दल पूर्वीइतका आदर वाटत नाही हे वाचून खूप वाईट वाटले. Sad
I'm extremely sorry I failed you. I should have tried little harder to be a person of some merit.

Nonetheless मला वाटते तुम्ही चुकीच्या व्यक्तीप्रती आदर ठेवून होता. बरेच झाले तुम्हाला लवकर उमगले, पुढची निराशा टळली

But don't lose your hopes yet.
मायबोलीवर आदरणीय व्यक्तिमत्त्वांची काही कमी नाही.. टीपापा बाफ तर तुम्हाला माहीतच असेल तिथे तुम्हाला एकसे एक आदर्श आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व सापडतील.. You can put your faith in them, have tons of respect for them.
तेवढे लांब जायचे नसेल तर ह्या बाफ वर तुम्हाला सस्मित किंवा मेरीच गिनो सारखी अनेक आदर्श आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वे सापडतील. शक्य असल्यास माझ्या वाट्याचा कमी झालेला आदर तुम्ही त्यांना द्यावा.

शुभेच्छा तुम्हाला एवढेच म्हणेन.

<<<अमेरिकन युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट वगैरे मिळवलेले so called 'चांगल्या प्रतिमेचे आयडी' शिसारी येईल असे बोलतात खर्‍या आयुष्यात इतर मायबोलीकरांबद्द्ल.. स्वतः प्रत्यक्ष पाहिले अन ऐकले आहे..>>>
भारतातल्या युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळवलेल्या लोकांबद्दल तुमचे काय मत आहे?

<<<मी मायबोलीवर मोठ्या ब्रेकनंतर परत आल्यावर >>>
बरे झाले सांगितलेत. मी विचारच करत होतो एकाएकी नवे धागे का दिसत नाहीत?
बरे तर बरे मी पाटील आहे आले नि त्यांनी तुमचे सत्कार्य चालू ठेवले. आता तुम्ही आला आहात, तर पुनः चालू करा धागे काढणे! कुणि छान आणि सकारात्मक लिहीले तर मी अनुमोदनच देईन. कधी +१, तर कधी +११११, तर कधी +११११११११११११११११११. मग बरे वाटेल ना तुम्हाला?

<<<टीपापा बाफ तर तुम्हाला माहीतच असेल तिथे तुम्हाला एकसे एक आदर्श आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व सापडतील..>>>
तुम्ही दिसत नाही आजकाल तिथे? या नं, मज्जा असते.
मायबोलीवर नाहीतरी मज्जा , टवाळी करणारेच लोक जास्त येतात असे वाटते. मायबोलीवर आदर्श, आदरणीय लोक कशाला शोधता?
त्यापेक्षा प्रत्यक्षात भेटा, संवाद साधा, न रागावता वादविवादहि करा. लोकांबद्दलचे मत बदलेल तुमचे.

पण मलाच वाईट वाटतंय तुमचा ऋन्मेष होताना बघुन
>>>>

म्हणजे हायझेनबर्ग यांचा आयडी हॅक झालाय असे जे कोणी बोलत आहेत त्यांचा दुसरा संशय माझ्यावर आहे?

री, तु भारीच सिरीयस होतेस की ग. इथे म्हणजे आंजावर इतकं सिरीयसली काही घेउन चालत नाही.
आपल्या खर्‍या आयुष्यात कोण किती लायकीचा आहे हे इथे भलतीच आयडी घेउन खरं की खोटं वागणार्‍या लिहिणार्या आयडीवरुन कसं ठरवावं?आणि का ठरवावं? काय घेणं देणं?
एकाला (ज्याला बघितलं देखलं नाहीये. पुढे शक्यताही नाहीये) रेस्पेक्ट देताना आपण दुसर्‍याचा (इथेही तेच :ज्याला बघितलं देखलं नाहीये. पुढे शक्यताही नाहीये) विनाकारण इन्सल्ट तर करत नाही हे बघावं.
कारण इथल्या कुणाला जोपर्यंत मी कुणाला पर्सनली भेटत नाही / मैत्री होत नाही माझ्यासाठी सगळेच सारखेच.
कुणाचा राग , चीड, इन्सल्ट करण्याचा प्रश्नच नाही.
अगदी कुणी आपला नेहमीचा पॅटर्न सोडुन लिहु लागलं Happy की तेवढ्यापुरती एखादी पोस्ट टाकते. शोनाहो टाईप Lol

आपल्या खर्‍या आयुष्यात कोण किती लायकीचा आहे हे इथे भलतीच आयडी घेउन खरं की खोटं वागणार्‍या लिहिणार्या आयडीवरुन कसं ठरवावं?
>>>>

त्या दिवशी एक छान वाक्य वाचले. ते सहज आठवले.

माणसाकडे कितीही सूटबूट गाडी बंगला कलागुण लोकप्रियता असू द्या...
त्याची लायकी त्याच्या स्वभावावरूनच ठरते. Happy

हो. तो नाही कळत. मी आपल्या पोस्टशी सहमत आहेच. ईथे वा फेसबूक सारख्या सोशल साईटवर स्वभाव कोण दाखवतच नाहीत. ईथे स्वभाव ओळखणे म्हणजे कांदापोहेची प्लेट घेऊन आलेल्या भावी नवरयामुलीचा स्वभाव ओळखण्यासारखे झाले.