सुखे चिकन

Submitted by स्स्प on 4 December, 2018 - 02:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

सामग्री
• चिकन, 8 तुकडे 800 ग्रॅम

• सुखी लाल मिरची, 6

• आले, उभा 1 इंच जाड तुकडा

• लसूण: 5 कळ्या

• हिरव्या मिरची, 4

• कांदा, चिरलेला 2 मध्यम

• चवीनुसार मीठ

• हळद 1/2 टिस्पून

• तांदूळ पिठ 2 टेस्पून

• 2 टेस्पून तेल

• 1 टेस्पून लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

सुक्या लाल मिरची, आले, लसूण, हिरव्या मिरची, कांदा मिकसर मधेय थोडे पाणीघालून वाटा. एक वाडग्य मध्ये, चिकन, मीठ, हळद, तांदूळ पिठ व पेस्ट टाकून चांगले मिक्स करावे. दोन ते तीन तास रेफ्रिजरेटर मध्ये मुरण्यासाठी ठेवावे. तीन तासानंतर . नौन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करणे . लिंबाचा रस चिकन वर घालून तुकडे पॅन झाकून आणि चिकन शिजू द्यावे. गरम सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

फर्मास दिसतेय चिकन फोटोत!

सस्मित अशा छान छान डिशेस करायला, घेऊन टाका की आणखी एक दोन रेफ्रिजरेटर, किंवा शेजाऱ्यांसोबत mou करा.

नाव काय द्याव सुचत नवते ....म्हणून सुक चिकेन दिले.....माफ करा मराठी टायपिंग मधेय फार चुका होत आहेत

थोडक्यात सोपी आणि चांगली रीसिपी दिली आहे. धन्यवाद. काही शंका/सूचना:

१. >> नौन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करणे . लिंबाचा रस चिकन वर घालून तुकडे पॅन झाकून आणि चिकन शिजू द्यावे.

मला पाककृतिंमधले फारसे ज्ञान नाही. पण "तेल तापलेले असताना त्यात कांदा लालसर परतून घ्यावा" अशी पद्धत अनेकदा वाचली/ऐकली आहे. पण इथे दिलेली पद्धत वेगळी वाटत आहे. तेल कितपत गरम करायचे आणि नंतर चिकन कितीवेळ शिजू द्यावे हे सुद्धा लिहिले तर बरे होईल.

२. मीठ चवीनुसार म्हणजे किती? कारण चिकन आठशे ग्रॅम आहे. त्यामुळे मीठ चिमूटभर/पाव चमचा/अर्धा चमचा असे काहीसे सांगू शकाल का?

३. >> • सुखी लाल मिरची, 6
• हिरव्या मिरची, 4

सहा लाल मिरच्या आणि चार हिरव्या मिरच्या... चिकन झणझणीत/मध्यम/सौम्य ज्या प्रकारचे बनवायचे आहे त्यानुसार याचे प्रमाण देऊ शकाल का?

४. मटन साठी सुद्धा हीच पद्धत लागू पडेल का कि बदल करावे लागतील?

मटन साठी नाही लागू होणार.
मीठ चवीनुसार ...अंदाज येतोच
शिजायला कमीत कमी ३० ते ४० मिनटे लागतील .

मस्त तोपासू दिसतेय..
केळफूल आणि सोयाबीनची भाजी चपाती गळ्यापर्यंत तरंगतेय. तरी हे ढकलावेसे वाटतेय.

हल्ली फार धागे उघडून बघायचे कष्ट मी आवर्जून टाळतो. पण कालपासून हे चिकन सुक्का सारखे त्रास देत होते Happy

अवांतर - चिकनला टायपिंग मिस्टेक माफ असतात.

सस्मित अशा छान छान डिशेस करायला, घेऊन टाका की आणखी एक दोन रेफ्रिजरेटर,
>>>>

आता उशीर झाला.. तेव्हाच माझ्यासोबत जीएसटीला घेतला असता तर... Wink

मला सुद्धा साहित्य प्रमाणात गडबड वाटतेय

८०० ग्रॅम चिकनचे ८ पिस लिहीलेय् पण फोटोत छोटे छोटे तुकडे दिसतायेत अन वाढणी प्रमाण फक्त २ ईतक्यासार्या चिकनसाठी Uhoh

अन वाढणी प्रमाण फक्त २ ईतक्यासार्या चिकनसाठी
>>>>
जर ते स्टार्टर म्हणून खायचे असेल तर ४०० ग्राम चिकन कमीच आहे Happy

पण येस्स ते १०० ग्रामचे तुकडे वाटत नाहीयेत.

सस्मित अशा छान छान डिशेस करायला, घेऊन टाका की आणखी एक दोन रेफ्रिजरेटर,
>>>>
आता उशीर झाला.. तेव्हाच माझ्यासोबत जीएसटीला घेतला असता तर...>>>>>>>
आणि ठेऊ कुठे? माझ्या डोक्यावर? अगदी काटेकोर मापात सगळ्या वस्तु बसवल्यात घरात. माणसंपण Wink तुझ्यासारखी दोन तीन घरं नाहीत माझी Happy

चिकनला टायपिंग मिस्टेक माफ असतात.>> अनुमोदन १००%.

मस्त आहे रेसीपी. आठ मोठे तुकडे घेउन बारीक कापले असतील बाइट साइज. नाताळच्या सुट्टीत करेन.

नाताळच्या सुट्टीत करेन.>>>माझाही तोच विचार आहे Happy

सामग्री साग्रसंगीत लिहीली आहे पण पाकृचा उरका पाडलाय असे दिसते. वाचायला सुरुवात करेतो संपते. Happy

फोटो अजुन आ़कर्षक काढता आला असता, जनरली लिबु रस किवा दही हे चिकन मॅरिनेट करायला वापरले जाते पण चिकन मॅरिनेट करुन झाल्यावर वर लिबाचा रस घालुन शिजवा अस लिहलय...

Pages