मुंबई पुणे मुंबई १ च्या अफाट यशानंतर...
आणि मुंबई पुणे मुंबई २ च्या माफक यशानंतर...
स्वप्निल आणि मुक्ता घेऊन येत आहेत मुंबई पुणे मुंबई ३
रीलीज डेट - ७ डिसेंबर
ट्रेलर ईथे पाहू शकता -
https://youtu.be/7U70c9_Ed8k
कुणी येणारं गं ... ईथे पाहू शकता -
https://youtu.be/vUUDfkBT4zs
या चित्रपटाची चर्चा करायला हा धागा.
मराठी चित्रपट आहे, थिएटरातच जाऊन बघा ही विनंती _ /\ _
मी स्वत्: आधीचे दोन्ही थिएटरात पाहिले आहेत
या चित्रपटालाही आधीच्या दोघांसारखे बॉक्स ऑफिसवर यश मिळाले तरच चौथाही भाग येईल.
आणि मराठीत एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग निघतोय ही खरेच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.
ट्रेलर मला बघताचक्षणी आवडला आहे. हलकाफुलका आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले स्वप्निल आणि मुक्ता आता आईबाबा होणार आहेत
हिंदीतील सूरज बडजात्या + करण जोहर टच अशी स्टाईल असलेल्या पण तरीही आपल्या मातीतील या आपल्या चित्रपटाला मराठी चित्रपट रसिक आवडीने बघतील अशी अपेक्षा.
माझ्यासाठी तर हा दुग्धशर्करायोगच असतो कारण माझ्या आवडीची स्वप्निल मुक्ताची जोडी यात आहे. दोघांचा उत्स्फुर्त अभिनय आणि केमिस्ट्री रंगत आणनार हे नक्की. प्रशांत दामलेलाही मोठ्या भुमिकेत बघायला आवडेल.
फक्त आणखी एक विनंती मुंबई पुणे मुंबई १ च्या अपेक्षेने जाऊ नका. तो मास्टरपीस होता. उद्या सैराट आणि दुनियादारीचे सुद्धा पुढचे भाग आले तरी त्यांनाही ती जादू पुन्हा जमणार नाही.
मला पहिल्या विकांतालाच बघणे
मला पहिल्या विकांतालाच बघणे अवघड आहे. त्यामुळे जे कोणी बघतील त्यांनी नक्की थोडक्यात क्का होईना ईथे परीक्षण नक्की टाका ..
धन्स ईन एडव्हान्स !.
आधीच स्वजो त्यात मुक्ता- कोण
आधीच स्वजो त्यात मुक्ता- कोण स्वतःहून पायावर कुर्हाड मारून घेईल.
मुळात पार्ट 1 मधली स्वजो ची ओव्हरअकटिंग बघून अर्ध्यात सोडला होता.
पार्ट 2 पहिला नव्हता, पार्ट 3 नक्कीच नाही बघणार.
त्यात मुक्ता?
त्यात मुक्ता?
लोकांच्या मुक्ताही नावडीची असू शकते?
स्वप्निल असा न आवडणारयांनाही स्वप्निल-मुक्ताची जोडी आवडते हा अनुभव
गं साजणी गाणं पाहिलं काल..
गं साजणी गाणं पाहिलं काल.. गाणं बरय ,
शूटिन्ग कोठे केलं असाव, छान आहे लोकेशन/सेट
पण ते ढोल वाजवण्याच नाटक , नाटक आहे हे सहजी दिसतय ते खटकलं..
लोकांच्या मुक्ताही नावडीची
लोकांच्या मुक्ताही नावडीची असू शकते?>>>> ह्यात आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे?


लोकांच्या तर स्वप्नेल डोक्यात जातो.
हे असले फुळकवणी ट्रेलर बघण्यापेक्षा सिंबाचा ट्रेलर बघा
जो देतो त्रास त्याचा मी घेतो क्लास
भाउ जे मला माहित नाही ते सांगा
आणि मुंबई पुणे मुंबई २ च्या
आणि मुंबई पुणे मुंबई २ च्या माफक यशानंतर... >>>
म्हणजे चित्रपट पडला होता वाटतं!
म्हणजे चित्रपट पडला होता
म्हणजे चित्रपट पडला होता वाटतं!>>> पडला पण होता आणि गंडला पण होता.
माफकच्या पुढे यश लिहिले आहे
माफकच्या पुढे यश लिहिले आहे ना.. पडला कसे म्हणता?
आणि पडला असता तर तिसरा भाग कसा आला असता.. किंबहुना मराठीत मग हे धाडसच म्हणावे लागेल
सस्मित हे सिंबा काय आहे? आणि
सस्मित हे सिंबा काय आहे? आणि ते डायलॉग त्यातील आहेत का? सिंघमचा मराठी रिमेक आहे का?
अर्र!
अर्र!
ह्यात आश्चर्यचकित होण्यासारखं
ह्यात आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे?
लोकांच्या तर स्वप्नेल डोक्यात जातो.
>>>>
स्वप्नीलचे समजू शकतो. तो मराठीतला शाहरूख म्हणून ओळखला जातो तर तिकडचा हेट क्लब ईथे ट्रान्सफर होणार..
पण मुक्ता तर गुणी कलाकार आहे.. खरे तर म्हणावे तश्या संधी न मिळालेली.. अंडररेटेड कलाकार
सस्मित अर्र नको. चेक करतो. तो
सस्मित अर्र नको. चेक करतो. तो असाच वाईल्ड गेस होता.
स्वप्नील-मुक्ता मराठीतील
स्वप्नील-मुक्ता मराठीतील शाहरूख खान -काजोल आहेत.. सर्वांना आवडेल असा गोड-गुलाबी सिनेमा असेल असं वाटतंय.
सस्मित, सिंबा सर्च केल्यावर
सस्मित, सिंबा सर्च केल्यावर एक सिंह. एक हरीण आणि एक रणबीरसिंग दिसतोय. काय बघायचेय?
किंबहुना मराठीत मग हे धाडसच
किंबहुना मराठीत मग हे धाडसच म्हणावे लागेल
मग मराठी माणसे आहेतच धाडसी.
अवांतर -
(पण आपल्या ऋन्मेषचा धागा असल्याने अजीबात भीड बाळगत नाहीये.)
१. बार काढून स्वतःच तिथे नाचण्याचा विचारही करणे काही जणांकरता मुर्खपणा असेल पण माझ्याकरता हे थोर धाडसच आहे.
२. 'जो देतो त्रास त्याचा मी घेतो क्लास' हे भारी आहे. आपल्या चैतन्य रासकरने लिहिले आहेत का संवाद
तसे दोन्ही सिंबे भारीच आहेत.
तसे दोन्ही सिंबे भारीच आहेत.(सिंह आणि सिंग)
पण आता तु रणवीर सिंगचा रोहित शेट्टी निर्मित सिनेमा येतोय त्याचं ट्रेलर बघ.
आपल्या चैतन्य रासकरने लिहिले
आपल्या चैतन्य रासकरने लिहिले आहेत का संवाद>>>>
धन्य धन्य
हे त्रास क्लास यमक जुळवलेले
हे त्रास क्लास यमक जुळवलेले सो कॉल्ड अर्थपुर्ण वाक्ये रासकरांच्या लिखानाच्या फ्लोमध्ये वाचायला छान वाटायची पण अशी वाक्ये चित्रपटात संवाद म्हणून वापरत असतील तर अवघड आहे. आणि असे चित्रपट लोकांना मुपुमु सारख्या संवेदनशील हलक्याफुलक्या चित्रपटांपेक्षा भारी वाटत असेल तर ही एक समस्या आहे.
बाकी असे डायलॉग हिंदीमराठीत आधीही येऊन गेलेत...
मारेगा सर पे, मरेगा घर पे... जो लेगा हमसे पंगा, हम करेगा उसको नंगा... ज्याला येतो राग, त्याला खातो वाघ... तंटा नाय तर घण्टा नाय.. वगैरे वगैरे...
बाकी असे डायलॉग हिंदीमराठीत
बाकी असे डायलॉग हिंदीमराठीत आधीही येऊन गेलेत...>>> हो माहित आहे
आणि मुपुमु सारखे संवेदनशील हलकेफुलके चित्रपट कधी आलेच नाहीत. बरोबर आहे तुझं
१. बार काढून स्वतःच तिथे
१. बार काढून स्वतःच तिथे नाचण्याचा विचारही करणे काही जणांकरता मुर्खपणा असेल पण माझ्याकरता हे थोर धाडसच आहे.
>>>>
दुर्दैवाने आपल्याकडे नाचाला कला म्हणून न बघता त्यासाठी काहीतरी बाजारू वगैरे शब्दांचा वापर केला जातो.
माझे सोडा, खुद्द शाहरूखवर तो पैश्यांसाठी लोकांच्या लग्नात नाचतो असे हास्यास्पद आरोप व्हायचे
आणि मुपुमु सारखे संवेदनशील
आणि मुपुमु सारखे संवेदनशील हलकेफुलके चित्रपट कधी आलेच नाहीत.
>>>>
आलेत की..
दोन भागे आलेत
आणलास ना शाहरुख खान. असो.
आणलास ना शाहरुख खान. असो.
मुपुमु ४ पण येणार.
बहिणीला भाऊ किंवा भावाला बहिण हवीच ना.
रणबीर रणवीर या दुरुस्तीबद्दल
रणबीर रणवीर या दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
तसेही स्टारडमच्या स्केलवर दोघे सेम आहेत.
म्हणूनच कीपॅडवर V आणि B सुद्धा शेजारीच आहेत.. पाहिजे बटण वापरा
आणलास ना शाहरुख खान. असो.
आणलास ना शाहरुख खान. असो.
>>>>
ओढून ताणून नाही आणला... सहज आला.. त्यातही मूळ अवांतर पोस्ट हर्पेन यांची.. पण ते आयर्न मॅन असल्याने त्यांना बोलायची कोणाची बिशाद.. म्हणजे बिल माझ्या एकट्यावरच फाटणार..
त्यातल्यात्यात नशीब चांगले की धागा माझाच आहे.
स्वप्नील-मुक्ता मराठीतील
स्वप्नील-मुक्ता मराठीतील शाहरूख खान -काजोल आहेत.. सर्वांना आवडेल असा गोड-गुलाबी सिनेमा असेल असं वाटतंय.
Submitted by अननस on 4 December, 2018 - 14:43
>>>>
ईथे आधीच आलाय शाहरूख
असो
पोस्टला + ७८६
ऋन्म्या, खुदा का खौफ कर.
ऋन्म्या, खुदा का खौफ कर. माझ्या अवांतराच्याही लईच आधी शाहरुख आणला होतास बरे तूच
ह्यात आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे?
लोकांच्या तर स्वप्नेल डोक्यात जातो.
>>>>
स्वप्नीलचे समजू शकतो. तो मराठीतला शाहरूख म्हणून ओळखला जातो तर तिकडचा हेट क्लब ईथे ट्रान्सफर होणार.. >>>
हर्पेन क्षमस्व,
हर्पेन क्षमस्व,
माझ्या प्रतिसादांत शाहरूख किती येतो याचा हिशोब ठेवणे म्हणजे जेवताना घास आणि जगताना श्वास मोजण्यासारखे आहे ..
आली ठुमकत नारhttps://youtu.be
आली ठुमकत नार
https://youtu.be/GP3FIFALPYg
म्हणजे चित्रपट पडला होता
म्हणजे चित्रपट पडला होता वाटतं!>>> स्व. जो. आणि मु. ब. मुलाखतीत तर ते पहिल्यापेक्षाही दुसरा यशस्वी झाला अस म्हणतायत.
https://www.youtube.com/watch?v=gTRyOVrtLF8 इथे
तसंही असेल. कदाचित बॉक्स
तसंही असेल. कदाचित बॉक्स ऑफिसवर दुसरयाला जास्त यश मिळाले असेल. मी अंदाजे लिहिले. मला पहिला जास्त चांगला वाटला होता.
Pages