मौन

Submitted by क्षास on 2 December, 2018 - 00:14

जुन्या कविता उघडायच्या म्हणजे
स्वतःचं 'ओल्ड व्हर्जन' उलगडत जायचं,
जुन्या आठवणींचे बाण चुकवत चुकवत
शेवटच्या पानापर्यंत पोहोचायचं...
नकोशा वाटतात त्या आठवणी,
सुखद असो वा दुःखद
निसटून तर गेल्या..बारीकसारीक ओरखडे ठेवून..
मला किंचितही जाणीव नव्हती
तुझ्यावरच्या त्या कविता लिहिताना,
'इंटेन्स' भावना ओतलेले
माझेच शब्द मला एक दिवस एवढे कुरतडतील...
आजही ओसंडून वाहतात 'इंटेन्स इमोशन्स'....
पण मी उमटू देत नाही त्यांचे कागदावर ठसे...
कागद कोरा राहिला तरी चालेल
कारण मला खात्री आहे
तू कोऱ्या कागदांनाही वाचशील
माझ्या मौनासारखं...

Group content visibility: 
Public - accessible to all site users