मंजू

Submitted by naidu suvarna p... on 29 November, 2018 - 02:10

मंजू ....
साधारण उंची , लांबसडक केस , छोटेसे डोळे व चेहऱ्यावर नेहमी हसरा भाव. पण आपला जन्मच मुळी हिला स्वतःची पण मुल हवी या भावनेतून झालेला आहे असा तिचा दृढ विश्वास होता. मंजूची मावशी दोन लहान मुली व सव्वा महिन्याचा मुलगा मागे ठेऊन अकाली जग सोडून गेली. तिला स्वतःला सख्खे म्हणजे तिची आई आणि लहान बहिण . मोठ्या मुलीच्या जाण्याने मंजूची आजी फारच खचली होती. मुलीच्या जाण्यापेक्षाही या तीन मुलाचं कस होणार ? आपल्या विदुर जावयाला मुलगी मिळेल पण ह्या लहान मुलांचा पोरकेपणा मात्र दूर होणार नाही ह्या विचाराने ती अस्वस्थ होती. जीवनात अचानक आलेला हा काळोख काहीही सुचू देत नव्हता सर्व दिशा गडप झाल्या होत्या.
सर्व संपल अशी मनाची अवस्था असताना अचानक एक विचार चमकला. काय होता तो विचार ? अगदी साधा होता कि कोणच्या आयुष्याच समर्पण होत. कि एकीचा संसार सावरण्यासाठी दुसरीची आहुती. केवळ लहान मुल पोरकी होऊ नये हा एकच विचार तिची पाठ सोडत नव्हता. अंधारात गडप झालेल्या दिशा अचानक प्रकाशाने न्हाऊन निघाव्यात अस वाटल तिला.
ना कुठली परवानगी ना कुठली चर्चा. एकच वाक्य .. '' बाईच्या मुलांसाठी तुझ बाईच्या नवऱ्याशी लग्न करायचं ठरवलं आहे.'' मुलांना सांभाळायचं आहे तुला. नाहीतरी म्हणच आहे आई मरावी आणि मावशी उरावी.
लग्न .... वयात आलेल्या मुलीला लग्नाचा विषय काढला तरी किती लाजायला होत. कळत नकळत गालांवर लाली येते. ज्या व्यक्तीला पाहिलं हि नाही त्याचा विचार सुरु होतो. कसा असेल दिसायला . नेमका कसा असेल. कस वागवेल आपल्याया . एक न अनेक प्रश्न . मग मुलगी शिकलेली असो कि अडाणी भावना कमी अधिक प्रमाणात सारख्याच असतात.
पण .... हा दोन अक्षरी शब्द खूप काही सांगत असतो.
आईने कुठलाही प्रश्न न करता किंवा कोणतेही म्हणणे न विचारता काढलेला हा तर आदेश होता. तोही का तर केवळ आपल्या नातवंडाना सावत्रपणाची झळ बसू नये म्हणून . शून्य विचार झाले तिचे हा आदेश ऐकून . भावनाहीन होऊन ती आईकडे व फोटोतल्या बहिणीकडे पाहत होती.
(क्रमशा Happy
.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

(मोठ्या मुलीच्या जाण्याने मंजूची आजी फारच खचली होती.) इथे आजीच्या ऐवजी आई असं हवं होतं
मंजूच्या आईने तिला बहिणीच्या नवर्‍या बरोबर लग्न करायला भाग पाडलं

Nice

Nice