Submitted by ashokkabade67@g... on 25 November, 2018 - 02:04
निवडणूक आली म्हणजे देशातील राजकीय पक्षांना राममंदिर आठवते.गेली चार वर्षे भाजप आणि शिवसेना केंद्रात आणि राज्यात बहुमताने सत्ता ऊपभोगत आहेत चार वर्ष यांना कधिच राम आठवला नाहीं की मंदिराची आठवण झाली नाही. मागील निवडणूकीत दीलेली आश्वासनेही पाळली नाहीत जनतेच्या समोर आता आपले प्रत्येक फसलेली धोरण आणि विकासाचे गाजर घेऊन जाता येणार नाही म्हणून यांना राम आठवला. देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत बळीराजा बळी जात आहे आरक्षणाचा वाद पेटला त्यात अनेक युवकांचा बळी गेला महागाई ़बेकारी वाढली जगणे अशक्य झाले .रामाची प्रतिमा हिंदू बांधवांच्या मनात इतकी अढळ आहे की एकमेकांना भेटताच आम्ही रामराम म्हणत रामाचे नावं घेतो.पण रामराम म्हणनाराच राहिला नाही तर .?रामाचे नाव घेणार कोण? म्हणुनच म्हणतो की आधी माणूस जगवा म्हणजे देव तुम्हाला मतेही मिळवून देईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहो राजकारणातून हनुमान ही
अहो राजकारणातून हनुमान ही सुटला नाही... तो कोणत्या जातीचा आहे यावरून वाद चालला आहे.
जसे ताजवर हल्ला करणारे
जसे ताजवर हल्ला करणारे आतंकवादी होते तसे बाबरी पाडून दंगल उसळवणारेही आतंकवादीच होते. ट्रेन जाळणारेही आतंकवादी होते तर रमाबाई चाळ जाळणारेही आतंकवादी होते. जर कोणी राजकीय नेते अश्या कृत्यांना सपोर्ट करत असतील तर ते सुद्धा आतंकवादीच झाले. किंबहुना हेच हरामखोर या सर्वाला कारणीभूत असतात. आतंकवादाला धर्म नसतो. ते सगळ्या धर्मात असतात. पण ते मूठभर असतात. त्यांची ताकद देवाधर्माच्या नावावर भडकावलेली टाळकी हेच असतात. जी त्यांना तुमच्याआमच्यातच सापडतात. मी तर स्वत: ना देव मानत ना स्वत:ला कोणत्या धर्माचा मानतो. पण सर्व हिंदूमुस्लिम लोकांना एकच विनंती करतो की जर तुम्ही देव मानत असाल तर त्याच देवाने दिलेली अक्कलही वापरा आणि यांचे मनसुबे उधळून लावा. पटत नसेल तर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून जगू नका, पण एकमेकांचे गळे कापूही नका.
अहो राजकारणातून हनुमान ही
अहो राजकारणातून हनुमान ही सुटला नाही... तो कोणत्या जातीचा आहे यावरून वाद चालला आहे.
>>.>>
सिरीअसली??
म्हणजे जात माणसांमध्येच असते असे ऐकले होते, वानरांमध्येही असते का?
https://www.google.com/url?q
https://www.google.com/url?q=http://jaimaharashtranews.tv/exclusive/brea...
ऋनमेस... आधी नाव बदला हो……
ऋनमेस... आधी नाव बदला हो…… टाइप करताना खुप प्रोब्लेम होतो.. वाचक आहे..
तुमच्या वरच्या कमेन्ट शी पूर्ण सहमत.... मनाताले विचार मांडले.…..
खुप कही आणि खुप लोकांशी बोलायच आहे.…
Sorry to type in engish... My Ebgkish isnt so good . I m the reader since 2013 only... Just following up...
Special Thanks to Mr. BEFIKIR...
Jast wel nahiye.. aaj rahaval nahi... Actually mazu marathi pan kacChi ahe.. mazya ggari kannad language bolali jate... Ugach waad nako.. plz..
जीगर धन्यवाद
जीगर धन्यवाद
आणि वेलकम टू मायबोली सक्रिय सभासद क्लब.
भाषा ही केवळ व्यक्त व्हायचे माध्यम आहे. जमेल तसे व्यक्त होत राहा. शुभेच्छा
Pages