डॉकयुमेन्ट्री

Submitted by Madhura_Kulkarni on 15 November, 2018 - 22:40

मी प्रोफेशनल फिल्ममेकर नाही. मला शॉर्टफिल्म बनवायची आहे. चिन्चवड मध्ये चापेकर वाडा आहे. त्यावर डॉकयुमेन्ट्री किन्व्हा short film बनवण्याचा माझा विचार आहे. कोणाकडे काही माहिती आहे का?

Group content visibility: 
Use group defaults

मी प्रोफेशनल नाहीये. पण आधी सुद्धा एक शॉर्ट फिल्म बनवली होती प्रयोग म्हणून. त्यात मी काहीच पैसे इनव्हेस्ट केलेले नव्हते.

तुम्हाला शॉर्ट फिल्म कशी बनवायची याची माहिती हवीय की चापेकर वाड्या विषयी माहिती हवीय?
शॉर्ट फिल्म म्हणजे अंदाजे किती मिनिटांची बनवायचा विचार आहे? डॉक्युमेन्ट्री साठी लोकांचा मुलाखती घेणार आहात की वेगळा काही विचार आहे?
तुमची आधीची शॉर्ट फिल्म यु ट्युब वर असेल तर पहायला आवडेल.

तुमची आधीची शॉर्ट फिल्म यु ट्युब वर असेल तर पहायला आवडेल.>>> आहे. पहिला प्रयत्न होता. त्यामुळे समजून घ्या प्लिज.

तुम्हाला शॉर्ट फिल्म कशी बनवायची याची माहिती हवीय की चापेकर वाड्या विषयी माहिती हवीय?
शॉर्ट फिल्म म्हणजे अंदाजे किती मिनिटांची बनवायचा विचार आहे? डॉक्युमेन्ट्री साठी लोकांचा मुलाखती घेणार आहात की वेगळा काही विचार आहे?>>>>>>खरतर मला काही छान प्रोजेक्ट करायचेत.

https://www.youtube.com/watch?v=nYVdJOJ0p6w&list=PLSsMk4VJ28whwdl1JILzfh...

तुम्ही यूट्युबर आहात का? माझा पण एक चॅनेल आहे यूट्यूबवर.>>>>>> हो, हो. तुम्ही कुठले व्हिडिओ टाकता? पाहायला आवडतील. Happy

तुमची विपु चेक करा.>>बर.

स्क्रिप्ट व कन्सेप्ट रेडी आहे का? दिग्दर्शन कोण करेल. ह्या नंतर बजेट व इक्विपमेंट ठरवावे लागेल. किती दिवसांचे शूट आहे. किती लोकेशन्स.
ही सर्व माहिती द्या.

चापेकर वाड्यावर करत आहात तर आमच्या पुरंदरे वाड्याचा एखादा क्लोजअप टाका Happy पूर्ण राम आळी बदलली आहे. सारे वाडे पाडलेत. राममंदिर सुद्धा किती झ्याकपाक झाले आहे. किती साधे होते खरतर. मुंजी व्हायच्या तिथे. चापेकरांच्या वाड्यात शाळा भरे. राम आळीतल्या बर्‍याच पोरांची प्राथमिक शाळा बहुदा तिच. टिमवीच्या संस्कृत परिक्षांचे पण ते केंद्र असायचे. वाड्याच्या मागल्या बाजूला विहिर होती आणि लागून एक बखळ.
वाड्याच्या मागच्या बाजूलाच एक व्यायामशाळापण काढली होती.

चापेकर वाड्यावर करत आहात तर आमच्या पुरंदरे वाड्याचा एखादा क्लोजअप टाका Happy पूर्ण राम आळी बदलली आहे. सारे वाडे पाडलेत. राममंदिर सुद्धा किती झ्याकपाक झाले आहे. किती साधे होते खरतर. मुंजी व्हायच्या तिथे. चापेकरांच्या वाड्यात शाळा भरे. राम आळीतल्या बर्‍याच पोरांची प्राथमिक शाळा बहुदा तिच. टिमवीच्या संस्कृत परिक्षांचे पण ते केंद्र असायचे. वाड्याच्या मागल्या बाजूला विहिर होती आणि लागून एक बखळ.
वाड्याच्या मागच्या बाजूलाच एक व्यायामशाळापण काढली होती.>> किती छान अजून लिहा. आमचे घर गावडे चाळीत होते. वीट भट्टीच्या मातीच्या डोंगराला लागून. आई जैन कन्या प्रशालेत शिकवत असे. गणपतीचे देउल पण छान होते आहे का अजून?

आमचे घर गावडे चाळीत होते. वीट भट्टीच्या मातीच्या डोंगराला लागून. आई जैन कन्या प्रशालेत शिकवत असे. गणपतीचे देउल पण छान होते आहे का अजून? >> अरे वा काय सांगताय. माझ्या सगळ्या आत्यांची शिक्षणे जैन कन्या प्रशालेत झालीत. माझी बहिणपण तिथूनच १०वी झाली. मी पण फत्तेचंद जैनला होतो १० वी पर्यंत. तुम्च्या आईंचे नाव काय आणि किती साली होत्या जे के पी ला? मोरयाचे मंदिर आहे पण ते पण पूर्ण बदलले आहे. जावेसे वाटतच नाही ईतके बदलले आहे. केवढे वाडे होते आणि चिंचांची झाडे होती. काही राहिले नाही. एक दोन पेठा उरल्या आहेत . पुढल्या महिन्यात उत्सव असेल तेंव्हा एखादी चक्कर होइल. वीटभट्टीच्या जागी आता बस स्टॉप झालाय पी एम टीचा.

Mrs. Suman Tembe. i dont know exactly whixh school she was a teacher in . but she has boy and girl students.