ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज...

Submitted by cool_vaidehi on 28 March, 2009 - 05:50

ShriSwamiSamarth.jpg

''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''

इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस
वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''

1190210228_shree-swami-samartha-of-akkalkot.jpg

.....................................................
संबंधित लेख आजच्या श्री स्वामींच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून लिहिला आहे.. पण हा लेख नेमका कोणत्या कॅटेगरीत येतो हे न समजल्यामुळे मी तो ललित मध्ये टाकीत आहे...
........ वरील लेखात काही चुकले असल्यास माझ्या बालबुद्धीचा आवाका लक्षात घेऊन माफ करावे व माझ्या चुका मला दाखवून द्याव्यात ही नम्र विनंती...

....वैदेही...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही ब्रह्मपुजा महाविष्णू पूजा | शिवशंकराची असे शक्तीपूजा |
दही दूध शुध्दोदकाने तयाला | पंचामृत स्नान घालू प्रभूला |

वीणा तुतार्‍या किती वाजताती | शंखादी वाद्ये पहा गर्जताती |
म्हणती नगारे गुरुदेव दत्ता | श्रीदत्त जय दत्त स्वामी समर्था |

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली | श्री दत्त स्वामीसिया स्नान घाली |
महासिध्द पदतीर्थ घ्यावा | महिमा तयाचा कळे ना जगा या |

मी धन्य झालो हे तीर्थ घेता | घडू दे पूजा ही यथासांग आता |
अजानूबाहू भव्य कांती सतेज | नसे मानवी देह हा स्वामीराज |

प्रत्यक्ष श्री सदगुरु दत्तराज | तया घालुया रेशमी वस्त्रसाज |
सुगंधित भाळी टिळा रेखियेला | शिरी हा जरी टोप शोभे तयाला |

वक्षःस्थळी लाविल्या चंदनाचा | सुवास तो वाढवी भाव साचा |
शिरी वाहुया बिल्व तुलसीदलाचे | गुलाब जाईजुई अत्तराते |

गंधाक्षता वाहूनी या पदाला | ही अर्पूया जीवन पुष्पमाला |
चरणीं करांनी मिठी मारु देई | म्हणे "लेकरासी सांभाळ आई " |

इथे लावुया केशर कस्तुरीचा | सुगंधता हा धूप नाना प्रतीचा |
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली | गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली |

करुणावतारी अवधूत किर्ती | दयेची कृपेचीच जी शुध्द मूर्ती |
प्रभा फाकली शक्तीच्या मंडलाची | अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची |

ह्रदयमंदिराची ही स्नेह ज्योती | मला दाखवी स्वामींची योगमूर्ती |
करु आरती आर्तभावे प्रभूची | गुरुदेव ही स्वामी दत्तात्रयाची |

पंचारती ही असे पंचप्राण | ओवाळूनि ठेऊ चरणावरुन |
निघेना पुढे शब्द बोलु मी तो ही | मनीचे तुम्ही जाणता सर्व काही |

हे स्वामी राजा बसा भोजनाला | हा पंचपक्वान्न नैवेद्य केला |
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची | लाडू करंजी असे ही खव्याची |

तुमचा स्वामी भाव जाणवला. फक्त स्वामीना शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा अक्कलकोट मध्येच भेटले असे माझ्या वाचनात आले आहे. असो. श्रद्धा महत्वाची.

डाळींब द्राक्षे फळे आणि मेवा | केशरी दूध घ्या स्वामीदेवा |
पुढे हात केला या लेकराने | प्रसाद द्यावा आपुल्या कराने |

तांबुल घ्यावा स्वामी समर्था | चरणाची सेवा करु द्यावी आता |
प्रसन्नेतुन मागू मी काय | हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय |

सर्वस्व हा जीव चरणीच ठेऊ | दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ |
नका दूर लोटू आपल्या मुलासी | कृपाछत्र तुमचेच या बालकासी |

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला | पदी ठेऊ दे शीर शरणागताला |
हृदयी भाव यावे असे तळमळीचे | करी पूर्ण कल्याण हे या जीवाचे |

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा | नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा |
मनी पुजनाची असे दिव्य ठेव | वसो माझिया अंतरी स्वामी ठेव |

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

*** समाप्त ***

श्री स्वामी समर्थ स्तवन

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||

नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||

नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||

माझ्या काकूला हा अनुभव आला होता, ती एकदा बदलापूर ला गेली होती तिचे एक गुरु आहेत खूप ज्ञानी आहेत. काकू, तिचा भाऊ आणि त्याची बायको.
गुरुन शी बोलणं झाला आणि मग ते बोलले कि जवळ एक देऊळ आहे तिथे दर्शन करून या. हे तिघं गेले, जाताना वाटेत एक नदी लागते, तिथे ते देऊळ आहे, नदीच्या तीरावरती, अचानक तिघांना स्वामी समर्थ बसलेले दिसले , कोणी काही बोलल नाही तेव्हा कारण तिघे खूप दचकले.
पण परत येताना काकू बोलली कि अरे, तिथे स्वामींची मूर्ती आहे ना रे? दर्शन झाला मला, तर वहिनी बोलली कि नाही तिथे काहीच नाहीये पण मला पण ते दिसले आणि मला पण वाटले का तिथे मुर्ती आहे. परत गुरूंच्या घरी आले तर ते बोलले "झालं का दर्शन स्वामि समर्था च?
सगळे इतके अचंबित झाले कि यांना कसा कळले? माझी सख्खी काकु आहे त्यामुळे खोटं बोलणं शक्य नाही.

dsj14, असे किंवा अशासारखेच अजूनही सद्गुरुतत्वाचे अनुभव येतात अगदी याचि देही याची डोळा. कधी कधी स्वतःचाच विश्वास बसत नाही क्षणभर की आपण काय बघितलं. पण जग भक्ती, अध्यात्म या सगळ्याकडे कमकुवत मनाचं लक्षण वगैरे दृष्टीने बघतं. पण आपण स्वतः हे अनुभवलेलं असलं की अशा शेर्‍यांनी आपल्यावर ढिम्मही परिणाम होत नाही. स्वामी विवेकानंद, लो. टिळक, शिवाजी महाराज, म. गांधी, राणी लक्ष्मीबाई यांना कमकुवत मनाचं कोणी म्हणू धजावणार नाही असं त्यांचं कर्तृत्व होतं.

त्यामुळे असा अनुभव आला असल्यास, कुणी खोटं म्हटलं तरी पर्वा करायची गरज नाही Happy

असे सुंदर अनुभव येणं, आपल्या आराध्य देवतेचं दर्शन होणं,प्रत्येक संकटाच्या वेळी आपला हात धरुन
कोणीतरी अलगद त्यातुन आपल्याला कोणताही त्रास न होता बाहेर काढतयं ही अनुभुती येणं हे फक्त त्या श्रद्धे च फळं आहे. मनापासुन केलेली उपासना ही त्यामुळे खोटी ठरुच शकत नाही.

आता मला पण बदलापूर ला जावसं वाटायला लागलयं.

कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ ||

कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली |
कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ ||

कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही |
अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ ||

धावा केल्यावर स्वामी मद्तीला येतात अशी अनेक उदाहरणे स्वामींची बखर आहे, त्यात आहेत. ही बखर पुस्तकरुपाने उपलब्ध आहे. स्वामीभक्त केळकरबुवा (चिपळुण मठ स्थापन करणारे स्वामींचे निस्सीम भक्त) यांनी लिहिली आहे. त्यात २६४ कथा लिहिल्या आहेत.
आपल्याला नेहमीच्या जिवनात पण स्वांमींची प्रचिती अनेकदा येते. पण आपण सामान्य माणसे अहं चे पटल डोळ्यावर असल्याने, कितिदा तरी अनुभव आले तरी अजुन खर्या परब्रम्हाची ओळख पट्वुन घेत नाही.

@चैत्रा, खरं आहे तुझं म्हणणं. असे काही अनुभव त्या बखरीतले इथे टाकता येतिल का तुला? वाचुन,
सगळ्यांचाच दिवस छान जाईल.

भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी |
सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||

प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

२८ स्तवने = १ मंडळ, अशी २८ मंडळे केल्यास संकट दूर होते.

फलप्राप्ती झाल्यानंतर एखादे सत्कर्म करावे.

निराली, नक्किच इथे मी अनुभव (बखरीतले आणी पोथीत नसलेले) टाकेन. फक्त येवढेच वाटते, की स्वामी महाराजांच्या लीला आपल्याला अनाकलनीय आहेत. म्हणजे, बर्याच वेळा काही साधकांचे मनोरथ पुण्र करण्यासाठी, महाराजांनी एखाद्याला लिंबाचा पाला खायला सांगितले तर कोणाला शिव्या दिल्या आणी साधकाला समाधी अवस्था प्राप्त झाली. माझा आणी स्वामी भक्तांचा यावर विश्वास असला तरी इथे कोणी त्यावर काही उलटे सुलटे लिहिल / वादविवादाला सुरवात होइल. तरी पण मी प्रयत्न करेन. ही बखर स्वामींच्या मठात तसेच दत्त स्थानात (नरसोबावाडी ला बघितल्याचे वाटते).

|| मठात नेहमी म्हटली जाणारी आरती ||

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था |
आरती ओवाळू चरणी ठेवूनियां माथा |
जय देव जय देव || ध्रु ||

छेली खेडेग्रामी तूं अवतरलासी, तू अवतरलासी ||
जगदुध्दारासाठी राया तूं फिरसी |
भक्तवत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी |
म्हणुनी शरण आलो तुझ्या चरणांसी || १ ||

त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, तुझा अवतार |
याची काय वर्णू लीला पामर |
शेषादिक शिणले नलगे त्यां पार, नलगे त्या पार |
तेथे जड मूढ कैसा करूं मी विस्तार || २ ||

देवधिदेव तूं स्वामीराया, तू स्वामीराया |
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां |
तुजसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया |
शरणागता तारी तूं स्वामीराया || ३ ||

अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरिले, जडमूढ उध्दरिले |
कीर्ती ऐकुनि कानी चरणी मी लोळे |
चरण-प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले |
तुझ्या सुता न लगे चरणांवेगळे || ४ ||

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था |
आरती ओवाळू चरणी ठेवूनियां माथा |
जय देव जय देव ||

@चैत्रा, नाही गं सुरु होणार वाद वगैरे,तू लिहि. आणी झालेचं तर स्वामी बघून घेतिल. Happy
आपण वादात पडायचं नाही मग एकटं कोण आणी किति वाद घालणार.

|| स्वामी अष्टक ||

असे पातकी दीन मी स्वामी राया | पदी पातलो सिध्द व्हा उध्दराया |
नसे अन्य त्राता जगी या दिनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||

मला माय न बाप ना आप्त बंधू | सखा सोयरा सर्व तू दिनबंधू |
तुझा मात्र आधार या लेकराला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||

नसे शास्त्र विद्या कलादिक काही | नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथा ही |
तुझे लेकरू ही अहंता मनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||

प्रपंची पुरा बध्द झालो दयाळा | तुझा दास मी ही स्मृती ना मनाला |
क्षमेची असे याचना त्वतपदाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||

मला काम क्रोधादिकी जागविले | म्हणोनी समर्था तुला जागविले |
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||

नको अंत पाहू त्वरे धाव घेई | तुझ्याविण नाही दुजी श्रेष्ठ आई |
अनाथासि आधार तुझा दयाळा | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||

कधी गोड वाणी न येई मुखाला | कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला |
कधी मूर्ति तुझी न ये लोचनाला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला || ७ ||

मला एव्हढी घाला भिक्षा समर्था | मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा |
घडो पादसेवा तुझ्या किंकराला | समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला || ८ ||

**********

श्री वटवृ़क्ष स्वामी मंदिरात साजरे होणारे उत्सव

१. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन चैत्र शुध्द द्वितीया

२. रामनवमी चैत्र शुध्द नवमी

३. हनुमान जयंती चैत्र शुध्द पौर्णिमा

४. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी चैत्र वद्य त्रयोदशी

५. वटसावित्री पौर्णिमा - ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा

६. गुरुपौर्णिमा (व्यासपूजा) आषाढ शुध्द पौर्णिमा

७. गोकुळाष्टमी श्रावण वद्य अष्टमी

८. नवरात्र महोत्सव अश्विन शुध्द प्रतिपदा ते अश्विन शुध्द पौर्णिमा

९. गुरुद्वादशी ( श्रीपाद श्रीवल्ल्भ पुण्यतिथी ) अश्विन वद्य द्वादशी

१०. श्री ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशी

११. श्री दत्त जयंती मार्गशीर्ष शुध्द पौर्णिमा

१२. श्री स्वामी नृसिंह सरस्वती जयंती ( कारंजा ) पौष शुध्द २

१३. गुरुप्रतिपदा (गाणगापूर यात्रा) माघ वद्य प्रतिपदा

१४. श्रीरामदास नवमी माघ वद्य नवमी

१५. महशिवरात्र माघ वद्य त्रयोदशी

१६. तुकाराम बीज फाल्गुन वद्य तृतिया

***********************************

Pages